Monday, April 29, 2024
HomeUncategorizedकुटुंबियांनी मानले आभार

कुटुंबियांनी मानले आभार

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

फेब्रुवारी महिन्यातील ती रात्र होती. एक 18 ते 20 वयोगटातील तरुणी (Young lady) रस्त्याने एकटी जात असतांना गस्तीवर असलेल्या सहाय्यक आयुक्त मधुकर गावीत (Assistant Commissioner Madhukar Gavit) यांनी परिस्थितीचे गांंभीर्य राखत तरुणीला तिच्या पालकांच्या हवाली सुखरूप केल्याने कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाचे (Police administration) आभार मानले.

- Advertisement -

गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्त मधुकर गावीत हे त्यांच्या पथकासह पंचवटी परिसरात (panchavati area) गस्तीवर असताना दिंडोरी रोडवरील (dindori road) फॉरेन्सीक लॅब ते तारवाला सिग्नल (Forensic lab to Tarwala signal) दरम्यान एक तरुणी रात्री साडेतीन वाजेच्या दरम्यान रस्त्याने पायी जात होती. गावीत यांनी त्या मुलीला हटकले असता तिने सांगितले की, मी स्वर्गात जात आहे. यावरून सदर मुलगी ही मनोरुग्ण आहे की आत्महत्या (Suicide) करायला चालली आहे, अशी संभ्रमावस्था त्यांची झाली. मात्र गावीत यांच्या समवेत महिला पोलीस (Women police) नसल्याने ते तिला ताब्यात घेऊ शकत नव्हते.

रात्रीच्या वेळी एकट्या तरुणीवर कुणी वाईट कृत्य (Bad act) करू नये, याकरिता पुढील मदत मिळेपर्यंत आपण या तरुणीच्या पाठीमागे जावे, असा विचार गावीत यांच्या मनात आला. अशातच समोरून एक ट्रक आला. पोलीस गाडीचा दिवा बघितल्याने त्याने गाडीचा वेग कमी गेला. यावेळी गावित यांनी सदर ट्रकला थांबण्यास सांगितले. सदर तरुणी त्या ट्रकच्या खाली शिरली. ट्रक बंद असल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर तरुणी ट्रकच्या मागील बाजूने बाहेर पडली व पुढे तारवाला सिग्नलच्या दिशेने चालू लागली.

यावेळी मात्र गावीत यांनी आपल्या सहकारी अंमलदाराला म्हसरूळ पोलीस ठाण्यातून (Mhasrul Police Station) महिला पोलीस (Women police) तत्काळ आणण्यास सांगितले व स्वतः एका सेवकासोबत तरुणीचा पाठलाग करत राहिले. सदर तरुणी ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती. म्हसरूळ पोलीस ठाण्यातून महिला पोलीस तत्काळ या ठिकाणी दाखल झाल्या. यावेळी गावीत यांनी सदर तरुणीला ताब्यात घेण्यास सांगितले.

महिला पोलीस तरुणीला ताब्यात घेण्याकरिता विरुद्ध दिशेला गेल्यानंतर मागून एक चारचाकी गाडी आली व त्यांनी याच तरुणीच्या वर्णनाची तरुणी आपणांस दिसली का, अशी विचारपूस केली. यावेळी समोर असलेली मुलगी ही आपलीच आहे हे त्यांच्या लक्षात आले. यावेळी महिला पोलिसांच्या मदतीने सदर तरुणीला तिच्या वडिलांच्या गाडीत बसवून पोलिसांच्या मदतीने गंगापूर रोड येथील तिच्या घरी सुखरूप पोहोचवले. यावेळी या तरुणीच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. सहाय्यक आयुक्त मधुकर गावीत यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे सदर तरुणी तिच्या घरी सुखरूप जाऊ शकली.

- Advertisment -

ताज्या बातम्या