आज ११ सप्टेंबर : स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील ऐतिहासिक भाषण वाचा

jalgaon-digital
3 Min Read

अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण हे जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानले जाते. या भाषणाने जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो’ अशी त्यांची सुरुवातच होताच ‌उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता व सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. तसेच सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेचा विरोध केला. ११ सप्टेंबर १८९३ रोजी केलेले हे त्यांचे हे भाषण…

अमेरिकेतील माझ्या बंधूंनो, आणि भगिनींनो

आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागताने माझे हृदय हर्षामुळे भरून आले आहे. जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीने मी आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीने मी आपणास मन:पूर्वक धन्यवाद देतो. माझे आभार त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी या व्यासपीठवरुन म्हटले की, पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे. मला अभिमान आहे की मी अशा धर्मातून आहे, ज्याने जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असे नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून आम्ही स्वीकार करतो.

मला अभिमान आहे की मी अशा धर्मातून आहे ज्याने जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय दिला आहे. मला हे सांगताना गर्व वाटतो की, रोमन हल्लेखोरांनी ज्या इस्रायलींच्या धर्मस्थळांची तोडफोड केली त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचे पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.

बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या एका श्लोकाच्या काही ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचे पारायण करतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.

वर्तमान संमेलन आजपर्यंतच्या सर्वात पवित्र सभेपैकी एक आहे, भगवद्गगीतेमधील या सिद्धांताचाच एक प्रमाण आहे, जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा पर्यंत पोहचतोच. लोकांनी कुठलाही मार्ग निवडला तरी अखेरीस ते माझ्यापर्यंतच पोहचताच. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेने बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकले आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचाराने भरून टाकले आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्ताने लाल झाली आहे. कितीतरी संस्कृतींचा विनाश झाला आहे आणि कितीतरी देश नष्ट झाले आहेत. जर हे भयानक राक्षस नसते तर मानव समाज आज कितीतरी प्रगत झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे आजच्या या परिषदेनंतर सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना मग त्या तलवारीने झालेल्या असोत की लेखणीने सर्व माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *