Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसुरगाण्याला विकास होईना

सुरगाण्याला विकास होईना

खोकरविहीर । देवीदास कामडी | Khokarvehir

प्रजासत्ताकात देशात विकासाची गंगा सर्व भागात पोचणे अपेक्षित असताना सुरगाणा तालुक्यात विकास गंगेची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

सुरगाणा (surgana) केम पर्वतावरून पार, नार, पाटी, कादवा, गिरणा खापरी, गारडी याा नद्या तसेच अंबिका, वाझडी, औरांगा असेच वाकी सारख्या उपनद्या (tributaries) व पेठ (peth) त्रंबकेश्वर (Trambakeshwar) मध्ये दमणगंगा अशा महा नद्या असून पावसाळ्यात महापूर येत आहे. परंतु या आदिवासींना (tribal) केंद्र आणि राज्य यांनी गुजरातच्या (gujrat) धर्तीवर योजना कार्यानिवीत करणे आवश्यक आहे.

छोटे छोटे सिमेंट प्लग बंधारे बांधून कोरड वाहू शेतीला उंच सखल भागात साठा करून शेतीला उचल पाणी दिल्यास या तालुक्यातील शेतकरी (farmers) मजूर सदन बनेल आणि काही अंशी मजुरीची प्रमाण कामी होऊन स्थानिक रोजगार मिळेल या पेठ (peth), सुरगाणा (surgana), त्रंबकेश्वर, पश्चिम दिंडोरी भाग यांना निसर्गाने भरभरून निसर्ग संपत्ती दिली आहे. याबाबत राजकीय लोकप्रतीनीधीनी यावर विचारमंथन करणे आवश्यक आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर इत्यादी तालुक्याचा अनेक राजकीय पक्षीय सत्ता उपभोगल्या परंतु पाहिजे असे लक्ष देण्यात आलेले नाही.

महाराष्ट्र (maharashtra) आणि गुजरात (gujrat) हे दोन्हीही राज्य सीमांना जोडलेले आहेत परंतु दोन्ही राज्यात फार मोठी विकासाच्या बाबतील तफावत आहे याचे महाराष्ट्र सरकारणे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून विकासाच्या दिशेन जाने महत्चावाचे ठरेल. या तालुक्यात काही खेडेगावात जाण्यासाठी रस्ते नाही, पिण्यासाठी पाण्यासाठी ठोस अश्या उपाययोजना केलेल्या दिसत नाही. गावात वैधकीय सुविधा नाही काही ठिकाणी आहेत तर कोसो दूर आहेत, शैक्षणिक सुविंधाचा अभाव आहे. स्थानिक रोजगारची साधने नाही, मालविक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही, प्रवासासाठी दळणवळण साधने नाहीत, पर्यटन विकास नाही,

या तालुक्यात नदी नाले मोठया प्रमाणात आढळतात. या नदी नाल्याचे पाणी पावसाळ्यात पाणी समुद्रात वाहून जाते. परंतु या भागात कुठेही पाणी अडववलेले दिसत नाही. वर्षाचे 4 महिने शेतकरीशेती करतात नंतर इतर महिने उत्पन्ननाचे साधन नसल्याने द्राक्ष बागांवर, इतर छोटे मोठे कामासाठी मोल मजुरीसाठी नाशिक व इतर तालुक्यात, जिल्ह्यात जातात. या तालुक्याना, गावकर्‍यांना गावात तंत्रज्ञानाच्या आधारे नवी आणि उदरनिर्वाहाची सक्षम तसेच शाश्वत प्रणाली निर्माण करून दिली तर गाव आणि शहर ही दरी संपेल.

प्रजासत्ताकात विकासाची गंगा सर्व भागात पोचणे अपेक्षित असते. परंतु तसे झाले नाही. गावकर्‍यांना गावात तंत्रज्ञानाच्या आधारे नवी आणि उदरनिर्वाहाची सक्षम तसेच शाश्वत प्रणाली निर्माण करून दिली तर गाव आणि शहर ही दरी संपेल.पिढीजात शेती आणि जुजबी इतर उद्योग असे देशातील गावांचे स्वरुप असले तरी नव्या पिढीला ते मान्य नाहीत. हाती मिळणारा पैसा आणि त्यामुळे सुधारणारे जीवनमान अशा अपेक्षेने गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराची वाट धरत आहेत.

वार्‍याच्या वेगाने विस्तारणारी शहरे त्यांना रोजगाराची साधने मिळवून देण्यास सक्षम आहेत. मात्र, एकाच देशात उत्पन्न अथवा रोजगार यांच्यात भेद का असावा? शहराकडे स्थलांतर वाढले असले तरी अद्याप साठ टक्के लोकसंख्या गावात राहते. ग्रामीण विकासासाठी शासनाने अनेक योजना अमलात आणल्या. आरोग्य, शेती, शेतीपूरक उद्योग, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात सुधारणा होत असल्या तरी आर्थिक स्थितीत मात्र मोठी तफावत आढळते. 2011च्या सर्वेक्षणानुसार खेड्यातील लोकसंख्याच्या 30 टक्के जनता ही केवळ शेतीवर अवलंबून आहे. तब्बल 50 टक्के हे उदरनिर्वाहासाठी कामगार म्हणून काम करत आहेत. अवघ्या दहा टक्के जनतेने नोकरी करणे स्वीकारले आहे.आकड्यांचा हा खेळ काहीसा बदलणे गरजेचे आहे.

खेड्यातील जनतेकडे शिक्षण आणि कौशल्य हा दोन्हींची वानवा नाही. मात्र, त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार पुरेशा सक्षम संधी नाहीत. खेड्यातील जनतेला तंत्रज्ञानाची तोंडओळख होणे सर्वाधिक गरजेचे आहे. मनोरंजनाचे तंत्रज्ञान आज गावागावात पोहोचले आहे. मात्र, मनोरंजनासह अर्थार्जनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी होऊ शकतो, हा नवा मंत्र तेथील लोकांना शिकता यावा. सध्या शहरात अथवा काही प्रमाणात गावी येणारे तंत्रज्ञान हे देशातील प्रमुख शहरे अथवा परदेशात निर्माण झालेले असते. सुरवातीला त्याचे प्रशिक्षण देत, नंतर त्याचा वापर व्यवसायात केला जातो. मात्र, रोज नवे रुप घेणारे तंत्रज्ञान अपडेट केले गेले नाही तर तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवसायांचा विकास होत नाही.

आजपर्यंत यामुळे अनेक व्यवयास काळाच्या ओघात बंद पडले. त्यामुळे, जगातील तंत्रज्ञानाचा वापर करतानाच गावासाठी पूरक तंत्रज्ञान अस्तित्वात आणणे गरेजेचे आहे. शहर आणि गाव यांच्या गरजा वेगळ्या असून दोन्हीकडे एकाच प्रकारातील तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य ठरणार नाही. जगाच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेध घेताना खेड्यातील स्थानिक पातळीवर तंत्रज्ञान कसे फायदेशीर ठरू शकते हे अभ्यासणे आज महत्त्वाचे आहे. असे तंत्रज्ञान शहरात उद्योगांसाठी काम करू लागले तर शेतीच्या पलीकडे जाऊन अनेक नवे उद्योग खेड्यात निर्माण होतील.

पेठ आणि सुरगाणा या दोन्ही तालुक्यात बघितलं तर पेठ तालुका विकसित दिसतो पाणी, दळण वळण याबाबतीत विकास झालेला दिसतो, परंतु सुरगाणा तालुक्यात अद्याप एसटी डेपो नाही काही खेडेगावात एसटी पोहचली नाही अशी तफावत का? पेठ तालुक्यात आश्रम शाळा भले मोठ्या इमारती आणि सुरगाणा तालुक्यातील आश्रम शाळेची बिकट अवस्था आहे. जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत कुठेही ठोस अशी इमारत बाधलेली नाही का? विकास आणि ज्ञान यांची सांगड घालणे जरुरीचे आहे. तंत्रज्ञानामुळे शहरांचा विकास होत आहेच, पण त्याचा वापर खेड्यातील ज्ञानासाठी आणि उद्योगासाठी केला तर खेड्यांचे एक नवे चित्र उभे राहू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या