सावन कृपाल रूहानी मिशनचे प्रमुख संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी परम संत कृपाल सिंह जी महाराज(6 फेब्रुवारी,1894 - 21 ऑगस्ट, 1974) यांच्या 127 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आपला पावन संदेश समस्त मानव जातीला दिला. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या शिकवणुकीला पुन्हा एकदा ताजे केले.

विशेष ऑनलाइन कार्यक्रमात संत राजिंदर सिंह जी महाराज आपला पावन संदेश देतांना म्हणाले, परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी विश्वभरात हजारो-लाखो आत्म्यांना अध्यात्म आणि प्रेमाचा संदेश दिला आणि पिता परमेश्वराशी एकरूप होण्याकरिता मार्गदर्शन केले.

शिकागो, अमेरिकेतून युट्युब वर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशातून संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी उद्बोधन केले की, परम संत कृपाल सिंह जी महाराज विश्वशांती आणि मानव एकता यासाठी समर्पित होते. त्यांनी विभिन्न जाती, भाषा आणि धर्म मानणार्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण केले आणि संदेश दिला की आपण सर्वजण एकाच पिता परमेश्वराच्या परिवाराचा भाग आहोत.

या ऑनलाईन कार्यक्रमाच्या प्रारंभी पूजनीय माता रीटा जी यांनी गुरू अर्जन देव जी महाराज यांची दिव्य वाणी, ठाकूर जिओ तुहारो परना या भक्तीगीता ने केली.

परम संत कृपाल सिंह जी महाराज यांना ङ्गमानव एकतेचे पितामहफ असे सुद्धा म्हटले जाते, त्यांची आठवण करताना संत राजिंदर सिंह जी महाराज म्हणाले की, त्यांची इच्छा होती की आपण सर्वांनी शांती, खुशी तसेच एक दुसर्यांवर प्रेम करुन जगावं. लहानपणापासूनच त्यांचे लक्ष पिता परमेश्वराचे ध्यान करण्याकडे होते. त्यांची इच्छा होती की आपण आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजावून घ्यावा, जो आत्मा आणि परमात्मा यांच्या एकरुपते चा आहे आणि त्यांनी याचा निज अनुभव सुद्धा करुन दिला.

ते पुढे म्हणाले की, ते मागील शताब्दीचे शांती आणि मानव एकतेचे प्रकाश स्तंभ होते. परम संत कृपाल सिंह जी महाराज विश्वधर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते. ही संघटना मानव ऐक्यासाठी कार्यरत आहे. याकरिता त्यांच्या सानिध्यात 1974 मध्ये मानव एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची इच्छा होती की आपण सर्वांनी सचोटीने आणि एकतेने जीवन जगावे. आपण त्यांनी दिलेली शिकवणूक आपल्या जीवनात उतरवू या आणि आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश स्वतःला ओळखणे व प्रभु परमात्म्याला प्राप्त करणे याच जीवनात पूर्ण करूया.

परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी आपल्या जीवनात मानव एकते करिता अथक प्रयत्न केले. त्यांनी संपूर्ण विश्वाला ध्यान-अभ्यासातून अध्यात्मिक शांतीचा संदेश दिला. आज विश्वभरात लाखो लोक त्यांना मानव एकतेचे जनक आणि या शतकातील महान संतांच्या रूपात त्यांचे स्मरण करतात. त्यांचा अध्यात्मिक कार्यकाल सन 1948 ते 1974 पर्यंतचा होता, या कालावधीत त्यांनी आपले अध्यात्मिक प्रेम, शांती आणि आशेचा संदेश संपूर्ण विश्वभरात दिला.

विभिन्न धर्मातील संत-महात्म्यांना एकाच मंचावर बसविण्याचे श्रेय परम संत कृपाल सिंह जी महाराज यांना जाते. यांच्या अध्यक्षतेखाली 4 विश्वधर्म संमेलने जी 1957, 1960, 1965 आणि 1970 मध्ये आयोजित केली गेली. या संमेलनामध्ये विविध धर्मातील अनेक संत-महात्म्यांनी आपसात विचारविमर्श करून असा अनुभव केला की, भले आपण वेगवेगळ्या धर्माशी निगडीत असू, परंतु आपण एकाच परमपिता परमेश्वराची संतान आहोत या नात्याने आपण सर्व वास्तवतः एक आहोत. त्यांच्या या महान योगदानाला सदैव स्मरणात ठेवले जाईल. फेब्रुवारी, 1974 मध्ये त्यांच्या सानिध्यात मानव एकता संमेलन आयोजित करण्यात आले होते. परम संत कृपाल सिंह जी महाराज असे पहिले महापुरुष होते ज्यांनी 1 ऑगस्ट, 1974 रोजी भारतीय संसदेला संबोधन केले.

परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या या अध्यात्मिक कार्याला दयाळ पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज (14 सप्टेंबर,1921 ते 30 मे,1989) यांनी पुढे चालविले. विद्यमान संत राजिंदर सिंह जी महाराज हे परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी सुरू केलेल्या अध्यात्मिक कार्याचा प्रसार तेज गतीने करीत आहेत.

मिशनचे अध्यक्ष संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी विश्वभरात प्रवास करून लोकांना ध्यान-अभ्यासाचे तंत्र शिकवत आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मनुष्य जीवनाचे ध्येय ङ्गस्वतःला ओळखणे व परमपिता परमेश्वराची प्राप्ती करणेफ याला याच जीवनात पूर्ण करू शकतो.

ध्यान-अभ्यासाकरिता विश्वविख्यात अध्यात्मिक गुरु संत राजिंदर सिंह जी महाराज आज संपूर्ण विश्वात ध्यान-अभ्यासाद्वारे परस्परातील प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करीत आहेत. विभिन्न देशांनी त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ अनेक शांती पुरस्कारांनी तसेच पाच डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. अध्यात्म आणि ध्यान-अभ्यास या विषयावर त्यांनी लिहलेली पुस्तके विश्वभरात मोठ्या प्रमाणावर विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये गणली जातात.

सावन कृपाल रुहानी मिशन ची आज संपूर्ण विश्वामध्ये तीन हजारपेक्षा अधिक केंद्रे स्थापन झालेली आहेत. तसेच या मिशनचे साहित्य विश्वातील 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. मिशन चे मुख्यालय विजयनगर, दिल्लीमध्ये आहे. तसेच अंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले अमेरिकेत आहे.

सावन कृपाल रुहानी मिशन

मीडिया प्रभारी

सौरव नरूला