Soya Granules Kachori : मस्त आणि कुरकुरीत बनवा ‘सोया ग्रॅन्युअल्स कचोरी’

jalgaon-digital
1 Min Read

साहित्य –

– एक वाटी सोया ग्रॅन्युअल्स अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथींबीर

– एक छोटा चमचा हिरवी मिरची-आलं पेस्ट

– एक टी-स्पून बडीशेप, चाट मसाला

– आमचूर पावडर

– किंचित साखर व ओवा

– एक टे-स्पून धणे-जिरे पावडर

– मीठ

– गव्हाचं पीठ व मैदा प्रत्येकी अर्धी वाटी

– तळण्यासाठी तेल

कृती –

प्रथम गव्हाचं पीठ व मैदा एकत्र करून, तेलाचं कडकडीत मोहन घेऊन, ओवा व मीठ घालून मळून घ्या आणि ते मस्त मुरू द्या. दरम्यान सोया ग्रॅन्युअल्स कोमट पाण्यात भिजत घाला. पाच मिनिटांनी ग्रॅन्युअल्स पाण्यातून काढून पिळून काढा (पाणी अजिबात राहायला नको). मग कढईत फोडणीसाठी तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला. छान परतून घ्या. नंतर भिजविलेले सोया ग्रॅन्युअल्स, चिरलेली कोथिंबीर, बडीशेप,चाट मसाला, आमचूर पावडर, धणे-जिरे पावडर, मीठ, साखर घाला. मिश्रण छान परतून घ्या, मग कढईतून काढून थंड करायला ठेवा. नंतर भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे करा, प्रत्येक गोळ्याची जाडसर पारी करून त्यात थंड झालेलं सारण थोडं थोडं भरुन जाडसर कचोर्‍या लाटून गरम तेलात मंद आचेवर लालसर रंगावर खरपूस तळून घ्या. या गरम गरम कचोर्‍या सॉसबरोबर मस्त लागतात.

– अपूर्वा लांडगे (अहमदनगर)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *