
पाव किलो उडिद डाळ, पाव किलो मक्याचे दाणे, दोन मध्यम आकाराचे कांदे, चार मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, हळद, जिरे, मीठ.
- प्रथम उडीद डाळ स्वच्छ धुऊन रात्रभर (किमान 5 ते 6 तास) पाण्यात भिजत घाला.
- मक्याचे दाणे उकडून घ्या.
- आता भिजलेली उडीद डाळ आणि मक्याचे उकडलेले दाणे एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- त्यानंतर कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्याही बारीक चिरून घ्या.
- सर्व मिश्रण एका पातेल्यात एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार हिंग, हळद, जिरे, मीठ एकजीव करून घ्या.
- आता गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवा. मग त्यात मेदू वडे तळून घ्या. हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा.
- दिपाली अग्रवाल (औरंगाबाद)