सुगरण खोप्यासाठी व्यस्त

सुगरण खोप्यासाठी व्यस्त

पंचाळे । प्रभाकर बेलोटे | Panchale

पावसाळ्याचा (monsoon) काळ हा पक्षांचा घरटी बनवण्याचा काळ असतो. धरतीने हिरवा शालू परिधान केल्यानंतर या पक्षांना (birds) विनिच्या हंगामाचे वेध लागतात.

त्यामुळे सध्या ग्रामीण भागातील (rural area) शेतकर्‍यांच्या (farmers) विहिरींच्या (well) काठावर उगवलेल्या झाडांवर सुगरण पक्षांची (Sugaran bird) घरटी बनवण्याची लगबग सुरु आहे. त्यामूळे विहिरींच्या काठावर सध्या दिवसभर पक्षांचा किलबिलाट ऐकू येत आहे.

चिमणीचे घरटे (Sparrow's nest) आतून अत्यंत उबदार असते. मऊ कापूस, तलम धागे व गवत यांचा बिछाना असतो. या घरट्यात पिले सुखात वाढतात. मात्र, या मुलायम बिछान्याखाली खाली काही काटेही असतात. पिल्लांचे वजन जशे जशे वाढते तसतसे त्यांना काटे टोचू लागतात. अखेरीस काट्यांचे टोचणे सहन न झाल्यानेही पिले धडपडून घरट्याच्या बाहेर पडतात व गगन भरारी घेतात.

पिल्लांना स्वावलंबी बनवण्याचा हा मार्ग पक्षांकडून माणसांनी घेणे गरजेचे आहे. या हंगामात नराचे डोके पिवळे दिसतात व पाठीवर तपकिरी रेषा, छातीचा भाग पिवळा, उर्वरित भाग फिकट रंगाचा दिसून येतो. दहा ते पंधरा घरटी विणण्याचे काम झाल्यानंतर नर सुगरण घरट्याजवळ बसून छान गाणी गुणगुणत असतो. प्रत्येक घरटे तपासून पाहिल्यानंतर मादीला घरटे पसंत पडते.

नंतर मादी अपुरे राहिलेले घरटे पूर्ण करते. एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर तो नर घरटी व परिसर सोडून दुसरे ठिकाण शोधतो असे जाणकार सांगतात. मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत घरटे विणीचा काळ असतो. सुगरण पक्षामध्ये (Sugaran bird) नर हा मुख्य घरटे विणण्याचे काम करतो. घरटे गवताच्या काड्या, गवत, कापूस, पाने व इतर वनस्पतींच्या काड्यांपासून बनवले जाते. त्यामुळे सध्या बर्‍याच विहिरींच्या कठड्यांवर असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात घरटे दिसून येतात.

घरट्याचे स्वरूप व दिनचर्या

एकावेळी मादी तीन ते चार पांढर्‍या शुभ्र रंगाची अंडी देतात. अंड्यांना उब देणे व व पिल्लांना खाऊ घालणे ही कामे मादीला करावी लागतात. असे सौंदर्य सध्या ग्रामीण भागामध्ये विहिरींच्या काठावर असलेल्या झाडांवर विणलेल्या घरट्यांमध्ये दिसत आहे. घरट्याच्या खालून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग असतो. खालून निमुळते व लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार असते. एका घरट्यामध्ये दोन किंवा जास्त कप्पे केलेले असतात. घरट्याच्या गोलाकार भागामध्ये थोड्या प्रमाणात मातीचा गिलावा लावलेला असतो. त्यातून पिल्लांना उब मिळते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com