दखल: असेही बंधुप्रेम

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | विजय गिते | Nashik

अतिशय अभ्यासु (Studious) आणि प्रचंड वाचन (reader) वेडा माणुस, अशी ओळख निर्माण करणार्‍या मनोहर निळकंठ पाटील (Manohar Nilkanth Patil) यांनी मागील वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी अवेळी घेतलेला हा निरोप सर्वांनाच चटका लावणारा ठरला.

सिक्स सिग्मा (Six Sigma) येथे मॅनेजर (Manager) म्हणुन कार्यरत असलेले मनोहरच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्या, यासाठी त्यांच्या भगिनी प्रा.जयश्री पाटील यांनी निर्‍हाळे (ता.सिन्नर) शाळेला (shcool) पुस्तके भेट (Books gift) देत मनोहरच्या आठवणी चिरंतर ठेवल्या आहेत. प्रा.पाटील या नाशिकमधील (nashik) व्ही.एन. नाईक सिनियर कॉलेजला (V.N. Nike Senior College) प्राध्यापिका (Professor) आहेत. त्याही तशा पट्टीच्या वाचक. विद्यार्थ्यांना (students) समुदेशन करण्याचे कामही त्या विनामुल्य करत असतात.

आदिवासी भागात जाऊन तेथिल मुलांचे कौन्सिलिंगही (counseling) त्या करतात. त्यांचा लाडका भाऊ मनोहरने जगाचा निरोप घेतला अन त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही दु:खी झाले. या घटनेला आता वर्ष झाले. मनोहर यांची नुकतीच म्हणजेच दि.14 ऑक्टोबरला जयंती झाली. या दिवशी आपल्या लाडक्या भावाचा वाढदिवस तो स्मरणीय व्हावा, असे प्रा.जयश्री पाटील यांना वाटले.

मग या दिवशी काय करावे,असे विचार त्यांच्या मनात घोळत होते.अशा वेळी त्यांना एक कल्पना सुचली.आपला भाऊ मनोहर हा अतिशय अभ्यासु आणि प्रचंड वाचन वेडा. ही गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर चटकन उभी राहिली. आणि यातूनच आपल्या भावाच्या स्मृती कायम रहाव्या यासाठी त्यांना एक कल्पना सुचली. मनोहरच्या आठवणी कायम रहाव्या, यासाठी त्यांनी शाळेला पुस्तके भेट (Books gift to school) देण्याचा निर्णय घेतला.

सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) निर्‍हाळे शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे (Headmaster Sahebrao Kute) यांच्याकडे त्यांनी आपली ही कल्पना मांडली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने (kusumagraj foundation) ‘ग्रंथ आपल्या दारी’ हा उपक्रम राबवितांना त्यांनी पाहिले होते. निर्‍हाळे शाळेच्या विध्यार्थ्यांनी पुस्तक वाचुन झाल्यानंतर त्या पुस्तकात आपण काय वाचले याची टाकलेली प्रतिक्रिया प्रा.पाटील यांनी व्हाट्सअपवर ऐकली त्यामुळे पुस्तकांचा खरा उपयोग याच शाळेतील विद्यार्थी करतील, असा ठाम विश्वास त्यांचा झाला.

अन पुस्तके भेट देण्याचा मुहूर्तही त्यांनी शोधला. या शाळेतील मुलांना वाचनासाठी ‘वाचन प्रेरणा दिन’ या दिवशी त्यांनी शाळेला पुस्तके दान केली. पुस्तके दान करताना मात्र,प्रा.पाटील यांनी मुख्याध्यापक कुटे यांना एक अट घातली. ती म्हणजे माझे नाव कुठेही प्रसिद्ध करू नका, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता हल्ली सगळीकडे नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी दानधर्म करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र,येथे विरोधाभास दिसून आला हे विशेष.

अशाप्रकारे समाजामध्ये आपल्या भावाचा स्मृतिदिन साजरा करताना भावाच्या आवडीच्या विषयाची पुस्तके खेड्यापाड्यातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे. ही प्रा.पाटील यांची भावना खरोखरच इतरांना देखील प्रेरणादायी अशी आहे.याबरोबरच अनेक आदिवासी पाड्यांवर त्यांनी वह्यांचेही वाटप केले. परंतु, कुठेही फोटो नाही की, प्रसिद्धीचा गवगवा नाही.अशा या प्रा.जयश्री पाटील व त्यांचे बंधू मनोहर पाटील या दोघांनाही सलाम.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *