Friday, April 26, 2024
HomeUncategorizedप्रतिकूल परिस्थितीत महिलांची यशोगाथा

प्रतिकूल परिस्थितीत महिलांची यशोगाथा

इगतपुरी । वाल्मिक गवांदे | Igatpuri

झेप घेण्याची इच्छा असतानाही सुमारे 95 टक्के महिला (women) नानाविध कारणे सांगून बाजूला होतात. नवरा, सासू, सासरे, मुले, समाज यांच्याशी संबंधित कारणांमुळे महिलांची उन्नती (Advancement of women) खंडित झाली आहे.

- Advertisement -

मात्र, या प्रतिकूल प्रतिस्थितीत महिलांची प्रयत्नशील राहण्याची वृत्ती (Attitude of women to be diligent) कायम असते. त्यातच त्यांची यशोगाथा (Success story) दडलेली असते. असे मत उद्योग क्षेत्रातून (Industry sector) महिलांच्या बाबतीत व्यक्त होते. असे महिलांसाठी काम करणार्‍या उद्योजिका मधुरा जाधव यांनी म्हटले.

संकटांचा सामना करून ज्या महिला आहे त्या क्षेत्रात टिकून राहतील अशा महिलांची समृद्धी कोणी रोखूच शकत नाही. महिलांसाठी सध्याच्या काळात प्रगती होण्यासाठी विविध संधी उपलब्ध असतांना त्या महिलांनी त्या स्वीकारल्या नाही तर ते मोठे दुर्दैव असेल. आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान असा निश्चय करून प्रगतीच्या दिशेने आगेकूच करा, असे प्रतिपादन जाधव यांनी केले.

सिसडी फाउंंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त (World Women’s Day) व सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या स्मृतिदिनानिमित्त महिलारत्न सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार (Mahilaratna Savitribai Phule Inspiration Award) देवून उद्योजिका मथुरा जाधव यांनी मार्गदर्शन करतांना बचतगटातील महिला, आरोग्य क्षेत्रातील महिला, आशा वर्कर, समाजकारण करणार्‍या महिला आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या महिलांचा त्यांनी गौरव केला. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यशोगाथा करणार्‍या छाया रोकडे, सुमन मुसळे, द्वारका धांडे, अलका गायकर, सुरेखा शिरसाठ, सरला सहाणे शांता गाडेकर,

सुमन सारूक्ते, मुक्ता सारकुठे, कमल जाधव, सीमा देवगिरे, शोभा मोंढे, कमल आरोटे, विजया जाधव, शिल्पा रोंगटे, मीरा बैरागी, मालन वाकचौरे, मंगला कणसे, सरला बिन्नर, छाया काजळे, राधिका दिवटे, प्रतिभा गाडे यांचा महिलारत्न सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या महिलांला इगतपुरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती जिजाबाई नाठे, घोटी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास आदींसह , विमा सल्लागार सुरेखा तुपे-गायकर, विधीतज्ञ मनीषा वारुंगसे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. वेदिका गवळी, विमा सल्लागार उर्मिला काजळे,

माजी सरपंच कुमुदिनी पागेरे, माजी पंचायत समिती सदस्य वैशाली सहाणे, सामाजिक कार्यकर्त्या पूर्वा मिठारी यांनी ही प्रोत्साहन दिली. महिलांसाठी वाहिलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन सिसडी फाउंंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सीमा श्रीकांत दिवटे, संयोजन समितीच्या शैलेजा मटाले, रुपाली घोडे, अर्चना मोरे, संगीता डांगे, प्रियंका दिवटे, अलका सहाणे, सुमन मुसळे, स्वाती धोंगडे, सोनी फर्नांडो, दुर्गा गोवर्धने, शोभा पाठक, योगिता धनवटे, सविता जमघडे, आशा शिरसाठ, मेघा कडभाने, जयश्री पागेरे, रत्ना जाचक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रुपाली घोडे व सोनी फर्नांडो यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या