दखल: तुमचे भोंगे थांबवा; आमचे प्रश्न सोडवा

दखल: तुमचे भोंगे थांबवा; आमचे प्रश्न सोडवा

नाशिक | विजय गिते | Nashik

राज्यातील सत्ताधारी काय अन् विरोधक काय आपआपले राजकीय भोंगे वाजविण्यात दंग आहेत. कोणालाच शेतकरी (farmers), बेरोजगार युवक (Unemployed youth) आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे काहीच सोयरसुतक नाही. अशा प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचाच हा एक डाव आहे, असा आरोप हा वर्ग आता करत आहे.

राज्यातील सरकार ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) चक्रव्यूहात अडकले आहे. शेतकर्‍यांना तर कोणी वाली नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला कोणी तयार नाही. जातीयवादी नेत्यांच्या तोंडाचे भोंगे बंद करण्यात आणि हिंदुत्वाचे रक्षण (Protection of Hindutva) करण्यातच सरकार गुंतले आहे. राज्यामध्ये विजेचा (electricity issue), उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नावर राजकीय नेत्यांपासून (political leaders) समाजातील नेतेही मौनी बाबा झाले आहेत. शेतकर्‍यांबरोबरच, सुशिक्षित तरुणांचे, बेरोजगारांचे आणि सामान्याचे प्रश्न आणि वेदना वेगवेगळ्या आहेत.

तुमचे राजकीय भोंगे (loudspeakers) थांबवा अन् शेतकरी आत्महत्या (Farmer suicide), भ्रष्टाचार (Corruption) थांबवा. तरुणांच्या प्रश्नाकडे बघा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच तर सत्ताधारी आणि विरोधकांनी भोंग्याचा डाव रचला आहे, असा आरोप करत शेतकर्‍यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती मागील आठवड्यात करत आपल्या भावनांना वाट करून दिली.

एवढ्यावरच हे शेतकरी (farmers) थाबले नाही. तर मुख्यमंत्री (Chief Minister), विरोधी पक्षनेत्यांसह (Leader of the Opposition) प्रमुख राजकीय नेत्यांच्या नावाने धान्य, फळे आणि मिठाची टोकरी पाठवली. शेतकरी धान्यच देऊ शकतो, त्याला तरी जागा आणि तुमचे राजकीय भोंगे थांबवून आमचे प्रश्न सोडवा, अशी मागणी शेतकर्‍यांनी यावेळी केली.

महाराष्ट्राच्या (maharashtra) विविध भागांतून आलेल्या शेतकर्‍यांच्या पथकाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्च काढला. यात बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana), शेतकरी वारकरी संघटनांसह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. गांधीजींच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis),

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray), शिवसेना नेते खा. संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांच्या नावाची धान्याची टोकरी गांधी पुतळ्याच्या पायरीवर ठेवण्यात आली. तसेच, प्रार्थनासभेतून राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि शेतकरी समस्यांकडे त्यांचे लक्ष जावो, अशी प्रार्थना केली. याबरोबरच महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी चालीसाही म्हटली. सगळीकडे महाआरती,हनुमान चालीसा लावण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे शेतकरी वेदनाच्या महाआरतीसाठी आम्ही मुंबईत आलो असल्याचे या शेतकर्‍यांनी आवर्जून सांगितले.

भारत कृषिप्रधान देश असला, तरीही आपले प्रशासन आणि सरकारचे निर्णय मात्र, कृषिपूरक नाहीत. ते शेती आणि शेतकर्‍यांच्या विरोधी आहेत. यामुळेच देशभरात गत काही वर्षाची आकडेवारी पाहता काही लाख कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दुष्काळ (Drought),अतिवृष्टी (Heavy rain), गारपीट (Hail), अवकाळी पाऊस (Unseasonal rain), पिकांवरील रोग, उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न शेतमालाच्या विक्रीतून न निघणे आणि व्यापार्‍यांकडून फसवणूक होणे. अशा कारणांमुळे वर्षाला सरासरी पंधरा हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतात.

शेतकरी या दुष्टचक्रातून बाहेर पडणार नाही; कारण आपली सर्व यंत्रणा शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीची मागणी झाली रे झाली की तत्काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या मोठ्या बँकाचे अध्यक्ष कर्जमाफीला विरोध करतात आणि अर्थशास्त्राचे दाखले देतात.शेतकरी आत्महत्या, उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात शेतमाल विक्री यांबाबत मात्र हे अर्थतज्ज्ञ मूग गिळून गप्प बसलेले असतात.

अमेरिका, जपान, फ्रान्स या देशांत हंगामातील शेतमाल विक्री योग्य होण्यापूर्वीच त्यांची आधारभूत किंमत जाहीर केली जाते. भारतात केवळ आठ-दहा शेतमालांची आधारभूत किंमत जाहीर केली जाते आणि ती देखील शेतकर्‍यांना मिळत नाही. इतर देशांमध्ये शेतीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते; पण आपल्याकडील अर्थव्यवस्था कृषी आधारित असूनही शेतीकडे दुर्लक्ष केले जाते, ही शोकांतिका आहे.

Related Stories

No stories found.