येता काळ अत्याधुनिक दुचाकींचा

दै. देशदूत वर्धापनदिन विशेष
येता काळ अत्याधुनिक दुचाकींचा

विजय ओस्तवाल

आगामी काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असला तरी पॉवर बाईक सेंगमेंटमध्ये पेट्रोल गाड्यांना पर्याय नाही. कारण इलेक्ट्रॉनिक गाडीचे मायलेज अधिक करायचे तर वजन हलके असते.

मात्र रेसिंग आणि पॉवरचा प्रश्न येतो तेव्हा पॉवर बाईक्सची सर दुसर्‍या कोणालाच येत नाही. येत्या 25 वर्षांत कस्टमाईज्ड पॉवर बाईक विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल असणार आहे.

दुचाकी (बाईक्स) हा केवळ तारण्याबांड तरुणाईचाच आवडता विषय नसून अनेकांना दुचाकी चालवायला आवडते. त्यातही स्पोर्टस्, पॉवर बॉईक्सला आकर्षक अ‍ॅक्सेसरीजने सजवून इतरांपेक्षा ङ्गहटकेफ दिसणे हा फंडा खूपच प्रचलित होत आहे.

तरुणाईसह उद्योगपती, व्यावसायिक, खेळाडू, अभिनेते, साहसाची आवड असणारे लोक हटके आणि कस्टमाईज्ड बाईक तयार करुन घेतात. त्यात दुचाकीचे इंजिन कायम ठेऊन इतर सर्व भाग बदलून त्याजागी नवे भाग बसवणे याला गाडीचे मॉडिफिकेशन म्हणतात. दुसर्‍या प्रकारात आकर्षक नव्या अ‍ॅक्सेसरीजची भर टाकून दुचाकीची आकर्षकता वाढवली जाते.

कस्टमाईज्ड बाईक्स

2021 सालानंतर पॉवर बाईक्स श्रेणीत कस्टमाईज्ड बाईक्सचे पर्व अवतणार आहे. 2045 पर्यंत वाहन उद्योगात लक्षणीय बदल संभवतील. इ-वाहनांचा काळ असताना मॉडीफाय आणि कस्टमाईज्ड गाड्यांची क्रेझ निर्माण होईल. कंपनीनिर्मित नवीन अ‍ॅक्सेसरीज आणि स्थानिक पातळीवर डिलर्सकडून गाडीत नंतर वापरावयाच्या अ‍ॅक्सेरिज असे प्रकार पाहावयास मिळतील.

करोना संकट ओसरताच म्हणजे साधारणत: पुढील वर्षी जानेवारीनंतर रॉयल एन्फिल्ड गाडीत कस्टमाईज्ड बाईक्स अवतरणार आहेत. म्हणजे ग्राहकांच्या आवडी-निवडी आणि पसंतीनुसार बुलेटमध्ये हवे ते अभिनव आणि कल्पनातीत बदल पाहायला मिळतील. असे ग्राहक ङ्गविशेष ग्राहकफ म्हणून ओळखले जातील.

स्पेसिफिक प्रीमियमम ग्राहकांकडून त्यांना कस्टमाईज्ड करावयाच्या सर्व गोष्टी कंपनी समजून घेणार आहे. त्यानुसार कंपनीमेड कस्टमाईज्ड पॉवर बाईक्स रस्त्यावर धावतील. पेट्रोल पॉवर बाईक्सला इलेक्ट्रिक गाड्यांचे पर्व अवतरल्यानंतर काहीच फरक पडणार नाही.

कारण अशा गाड्यांचा ग्राहक हौसेसाठी व रुबाबदारपणासाठी गाडी खरेदी करतो. त्यावेेळी त्याच्या मनात पैशांची बचत, काटकसर असे विषय नसतात. त्यामुळे येत्या काळात कस्टमाईज्ड पॉवर बाईक्सचे पर्व येणार हे निश्चित!

मॉडिफाय बाईक्स

या प्रकारात अशाच प्रीमियम पॉवर बाईक्सचा सर्व कायापालयट करून त्या मॉडिफाय केल्या जातात. या गाड्यांचा ग्राहक हाय ईलिट-प्रीमियमम असतो. त्यात रॉयल एन्फिल्ड किंवा बुलेट या आणि अशा मजबूत गाड्यांचे इंजिन सोडून बाकी सर्व भागांची रचना, आकार, रुप बदलून त्या बाईक चांगल्या अर्थाने जशी आहे तशी बदलून ड्रास्टिक चेंजफ केली जाते.

म्हणजे गाडीचा एक टायर लहान तर दुसरा मोठा, हॅण्डल्स आहे त्यापेक्षा मोठे किंंवा आहे त्यापेक्षा त्याचा अँगल बदलणे, गाडीचा रंग, हेडलाईट, इंडिकेटर्स बदलणे, बैठकीचे आसन, चाकांतील डिझाईन बदलून एकदम हटके करणे असे प्रकार करुन संपूर्ण गाडी मॉडिफाईड केली जाते.

मुंबईतील अक्षय वर्दे या तरुणाने हॉटेलची नोकरी सोडून हौसेखातर सुरू केलेल्या छंदाला मोठे यश मिळाले. या दशकाच्या प्रारंभी म्हणजे 2010 पासून वर्दे यांनी अशा मॉडिफाय बाईक्स तयार करुन देण्यास प्रारंभ केला आणि बघता-बघता अशा गाड्यांची मागणी वाढली. मॉडिफाय बाईक्स उद्योगात कोणीही स्पर्धक नसलेले ते एकमेव पवर्तक ठरले.

अशा बाईक मॉडिफाय करण्यासाठी कल्पक, अभिनव सर्जनदृष्टी आणि डिझायनर्सचे मनुष्यबळ हाताशी लागते.

हल्ली तर बाईक्स मॉडिफाय करण्याचे शिक्षणक्रम उपलब्ध झाले आहे. यंत्र अभियंता याप्रमाणे गाड्यांची डिझाईन शिकवणारे कोर्स आहेत. पुण्यातील एमआयटी आणि अहमदाबादमधील एनआयडी येथे शिकवल्या जाणार्‍या कोर्समधील युवा ङ्गटॅलेंन्टफ मस्त कामगिरी करीत आहेत.

मोठे उद्योगपती, चित्रपट कलाकार, सेलिब्रेटी, कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्ह, गायक, साहसी पर्यटक आणि ज्यांच्याकडे भारीतील भारी कार असतात, पण विकेंडला, कुठेतरी फिरून येण्यासाठी गर्दीत उठून दिसणारी पॉवर बाईक्स हवी असते. असे ङ्गबाईक वेडेफ ग्राहक यांच्यासाठी येणार्‍या काळात मॉडिफाय बाईकचा काळ अधिक जोमाने येण्याची शक्यता आहे.

आज मुंबई, गोवा, पुणे, दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी, दिब्रगड, त्रिसूर, चेन्नई येथे अशा मॉडिफाय केलेल्या गाड्यांच्या फ्रेंचाईजी हळूहळू विस्तारीत होत आहेत. येत्या दोन दशकांत यांची संख्या मोठ्या महानगरांसह दुसर्‍या श्रेणीतील शहरात वाढण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com