Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअत्याधुनिक उपचार पध्दती रुग्णांसाठी वरदान

अत्याधुनिक उपचार पध्दती रुग्णांसाठी वरदान

अशिष कटारिया,संचालक अशोका ग्रुप

‘आरोग्यम् धनसंपदा’ अर्थात ‘आरोग्य हेच खरे धन’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण ते जपण्याचा, शरीर संपदा सदृढ आणि सशक्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. तब्बेतीत थोडा बदल जाणवू लागला तरी रुग्णालय हेच संबंधित नागरिक आणि रुग्णांना जवळचे वाटू लागते. पण आता माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील अफाट प्रगतीमुळे आरोग्यविषयक उपचार पद्धतीत खूप मोठे बदल झाले आहेत. भविष्यातील आरोग्यविषयक काळजी घेणारी ही उपचार पद्धती आणि त्यातील बदलांचा वेध!

- Advertisement -

रुग्णाला बरे नसल्यास त्याची अधिक काळजी घेऊन अथवा त्याला केंद्रभूत ठेवून तो बरा होण्यासाठी उपचार करण्यास डॉक्टर प्राधान्य देतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत रूढ आहे. पण काळानुरूप या आरोग्यविषयक निदान आणि उपचार पद्धतीत थक्क करणारे मोठे बदल झाले आहेत. काळजीवाहू ठरणार्‍या या बदलांमध्ये रचनात्मकता दिसत नाही. एखाद्या रुग्णाला बरे नसल्यास तो संबंधित रुग्णालयाच्या यंत्रणेशी संपर्क साधतो. नंतर संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यासाठी पूर्वनोंदणी (अपॉईंमेंट) करतो. तपासणीनंतर त्याला विविध चाचण्या, स्कॅन करण्यास सांगितले जाते.

पुढे त्या चाचण्यांचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आणि त्यानंतर पुढे प्रत्यक्ष उपचार पद्धतीला सुरुवात होते. हे सारेच खूप वेळखाऊ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण नव्या काळात या पद्धतीत आता बदल होऊ लागला आहे. भविष्यात रुग्णांची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणा तयार होऊ लागली आहे. रुग्णांकडून नेमके त्यांच्या आजाराबद्दल जाणून घेऊन ‘करोना’सारख्या आजाराबाबत बिकट परिस्थितीत त्याला चांगले उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने नियोजन होत आहे. यात डॉक्टरांचा सहभागही महत्त्वाचा असतो.

रुग्णांना अशक्तपणा, त्याला होणार्‍या त्रासाबद्दल मार्गदर्शन करण्याबरोबरच पुरेसे झोपणे, आहार, विहार, व्यायाम, पाणी पिणे आदी मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि कशा पद्धतीने नियोजन करायला हवे याबद्दल सांगण्यात येते. हा वैद्यकीय उपचार पद्धतीचा एक भाग मानला जातो. आजारी व्यक्तीला होणार्‍या त्रासापासून मुक्तता मिळवून देण्याबरोबरच तो सदृढ राहावा हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो. आपण काय करत आहे ते माहीत असूनही ते तशी कृती करतात. (बहुतांश लोकांना धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे हे माहीत असते.) अशांना हुशारीने हाताळणे महत्त्वाचे असते.

त्यांच्याशी जवळीक साधण्याबरोबरच नियंत्रण, देखरेख ठेवणेदेखील कळले पाहिजे. उपकरण वा स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे चाचण्यांच्या चढउतारांच्या नोंदी ठेवणे आणि त्या नोंदीनुसार आरोग्यविषयक उपचार पद्धतीस रुग्ण किती साथ देतो हे पाहू शकतो किंवा त्याला उपचार करत असलेल्या पद्धतीत कशा पद्धतीने गरजेनुसार बदल करता येईल, हेही पाहिले जाते.

24 तास संवाद प्रक्रिया : उदा. एखाद्या रुग्णाला झटका आला किंवा त्रास जाणवू लागला तर अशा दोन्ही व्यक्तींसाठी स्वतंत्र काळजी घेणारे पथक (रिमोर्ट केअर टीम) हे आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होतात. रुग्णाला सोशल नेटवर्क, गेम्स, कॉम्पिटिशनसारख्या कामात व्यस्त ठेवून ‘केअर हब’द्वारे कंट्रोल सेंटरमधून त्याला योग्य त्या निदान व उपचारांची माहिती देण्याबरोबरच भक्कम आधार दिला पाहिजे.

त्यातून आपल्याला हव्या असलेल्या नोंदी ठेवता येतात. तसेच रुग्ण उपचारास साथ देण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर केअर हबद्वारे व्हिडिओ कन्सल्टंटेशन किंवा भेटीतून उपचारांची माहिती देता येऊ शकते. आम्ही अशा ‘करोना’ रुग्ण आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम तैनात केली आहे. ही टीम सर्व प्रकारच्या संवादाची प्रक्रिया आणि अपडेट देण्याचे काम पार पाडते.

हृदयाशी संबंधित उपचार पद्धती : विविध उपचार पद्धती आणि नियंत्रण-देखभाल ठेवणार्‍या प्रक्रियेतील बदलामुळे रुग्णांच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणे सोपे बनले आहे. त्यात मोठ्या संख्येने आकडेवारी नोंदी ठेवता येणे शक्य झाले आहे. याचा उपयोग रुग्णाला वैयक्तिक औषधपुरवठा आणि उपचार देणे सुलभ होऊ लागले आहे. शिवाय विश्लेषणासही उपयुक्त ठरत आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज संदर्भातील हे संशोधन येत्या काळात खूप महत्त्वाचे मानले जात आहे.

रोबोटिक्सचा वापर महत्त्वाचा भाग : रोबोटिक्सचा वापर तसा आताच सुरू झाला आहे. बेडवरून उठवणे आणि एका रुग्ण कक्षातून दुसर्‍या रुग्ण कक्षात नेण्यासाठी याचा वापर होऊ लागला आहे. या क्षणाला ही खर्चिक आणि रिमोट कंट्रोलने नियंत्रण ठेवणारी (ऑपरेट) आणि स्वयंशिस्त यंत्रणा आहे. त्यात एकाच बटणाने एका हाताची नव्हे तर एकावेळी वेगवेगळी कामे करणारी यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे उपचार पद्धतीत रोबो रुग्णालयाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

फुप्फुसांच्या आजारांवर तंत्रज्ञान उपचार : साधारणतः वीस वर्षांपूर्वीच्या जुनाट, दीर्घकालीन आणि गंभीर स्वरुपाच्या आजारात लक्ष ठेवणे जिकिरीचेच ठरत होते. त्यातही फुफ्फुसासारखे आजार असतील तर अवघड होऊन बसत असे, पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलामुळे अशा जुनाट, दीर्घकालीन आजार नियंत्रण आणि देखरेख ठेवून योग्य उपचार मिळवून देणे डॉक्टरांना शक्य झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या