शिवसेनेत गटबाजी संपून एकजुट

शिवसेनेत गटबाजी संपून एकजुट

नाशिक | Nashik | रवींद्र केडिया

शिवसेनेतील (shiv sena) गटातटाच्या राजकारणामुळे (Politics) दिग्गज पदाधिकारी एकतर पक्ष सोडून गेले होते. तर काही निष्क्रीय झाले होते. मोजक्या लोकांच्या गटबाजीत उरलेली संघटना त्रस्त झालेली होती. यामुळेच मागिल निवडणूकीत सत्तेचे सोपान हातातून निसटले होते.

याद्वारे परस्परांच्या शक्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या बेदिलीची नोंद शिवसेना भवनाने घेतली. आगामी महापालिका निवडणूकांच्या (municipal elections) पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधण्याचा प्रयत्न वर्षभरापूर्वी पासूनच सूरू करण्यात आला. दस्तूरखूद्द संजय राऊत (sanjay raut) यांनी उत्तर महाराष्ट्राची (north maharashtra) जबाबदारी स्विकारली व नाशिकची जबाबदारी विशेष अधिकारात चौधरी यांच्याकडे दिली. यातून पहिली मोहीम बाहेर गेलेल्यांना सन्मानाने परत आणण्यात झाली.

त्यात माजी आमदार वसंत गिते (mla vasant gite), माजी जिल्हाप्रमुख सुनिल बागूल (sunil bagul) यांच्या घरवापसीने या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. पक्षांतर्गत पडत असलेली गटबाजी नष्ट करण्यावर दूसर्‍या मोहीमेचे लक्ष केंद्रित करण्यात आले. आणी महानगर प्रमुख पदावर सुधाकर बडगूजर (sudhakar badgujar) यांची नेमणूक करताना दूसर्‍या गटाला विश्वासात घेण्यात आले.

मागिल निवडणूकांमध्ये विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत विरोधातून उमेदवाराचा पाडाव झाल्याने पक्षाच्या ढासळलेल्या प्रतिमेला झळाळी देण्याची जबाबदारी सर्वच पदाधिकार्‍यांवर देण्यात आली. संजय राऊत यांच्या करामतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून झाडून सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या सहभागातून पक्षनिष्ठा व्यक्त करताना दिसून येत आहेत.

पक्षाच्या नेत्यांमध्ये पून्हा नव्याने उत्साह संचारताना त्यांच्यात निवडणूकीच्या तयारीसह मोर्चेबांधणीवर काम उभे राहताना दिसून येते.संजय राऊत यांनी पक्षाला दिलेल्या नवसंजिवनीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर पहिला गुन्हा नाशिकला दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेने पहिल्यांना आक्रमक रुप धारण करुन पक्षाचे आव्हान निर्माण करण्यासोबतच शिवसेना पून्हा आपल्या जुन्या रुपात अवतरल्याची चूणूक दाखवून दिली.

नेत्यांतर्गत नव्याने चूरस आगामी निवडणूकीत मनपावर (NMC) भगवा फडकवण्याच्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी शहातील नेत्यांमध्येच वेगळी चूरस लावण्यात आली असल्याची चर्चा आहे. नाशिकच्या सहा विभागाची जबाबदारी इच्छूक सहा नेत्यांवर देण्यात आलली आहे. ज्या विभागातून जास्त नगरसेवक त्या विभागाला महापौर पद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com