Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedवारकरी शिक्षणाचा संस्कार

वारकरी शिक्षणाचा संस्कार

बेलगाव कुर्‍हे । लक्ष्मण सोनवणे | Balegaon Kurhe

शाळेची सुट्टी (School holidays) म्हणजे मुलांचा जीव की प्राण असतो. या सुट्टीत टीव्ही (TV) पाहणे, मोबाईल (mobile) हाताळणे तर नदीवर पोहण्यासाठी देखील मुले जातात. यात विपरीत घटना देखील घडल्या जातात.

- Advertisement -

मुलांचा वेळ परमार्थिक कार्यात सार्थकी लावण्यासाठी तसेच खेळण्याच्या नादात होणार्‍या घटनांना आळा घालण्यासाठी लहान वयातच मुलांना वारकरी संप्रदायाची (Varkari sect) गोडी लागावी, या हेतूने दरवर्षी उन्हाळी सुट्टीत (Summer vacation) आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर (Spiritual Childcare Camp) भरवले जाते. हरिपाठ, पखवाज वादन, गायन आदी शिक्षण (education) पाचवी ते दहावीच्या मुलांना संस्कार शिबिरात दिले जाते. त्यामुळे मुले विठू नामाच्या शाळेत रमले आहेत.

साकूरभूषण ह.भ.प. पंढरी महाराज सहाणे यांच्या सखोल मार्गदर्शनातून सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) बेलू येथील जगद्गुरु तुकाराम महाराज आध्यात्मिक शैक्षणिक गुरुकुलमध्ये (Tukaram Maharaj Spiritual Educational Gurukul) मुलांना वारकरी संप्रदायाचे धडे गिरविण्यासाठी बालसंस्कार शिबिर भरवले गेले आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आध्यात्मिक, शैक्षणिक गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली तुपे, भूषण महाराज जाधव, राहुल महाराज लहवीतकर यांच्या मधुर वाणीतून अभंग शिकविले जातात.

विठू नामाच्या गजरात मुलांना टाळ, चाली, हरिपाठ पाठांतर, हनुमान चालीसा, पखवाजवादन, हार्मोनियम, सुभाषिते, श्लोक, गीतेतील पंधरावा अध्याय, लाठीकाठी, शिवाजी महाराज कथा आदी वारकरी शिक्षण देण्यात येऊन संस्काराचे जतन केले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील पालक आपल्या मुलांना संस्कार शिबिरात दाखल करतात.

दिव्यांग असूनही ह.भ.प. पंढरीनाथ महाराज सहाणे मुलांना संस्काराची शिदोरी देत आहेत. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून अनेक मुले घडली गेली आहेत. कुणी कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल नामाचा जयघोष करीत आहे तर कुणी संतांच्या मधुर वाणीतील अभंग गात आहे याचा सार्थ अभिमान आहे. शाळेच्या सुट्टीत बालसंस्कार शिबिराचा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे रतन सहाणे यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या