Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअद्ययावत तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती

अद्ययावत तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती

डॉ. राज नगरकर

सद्यस्थितीत बदलत्या जीवनशैलीसोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी यांच्या जोरावर अद्ययावत तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. ज्याचा विशेष फायदा वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. त्यामुळे किचकट व भयावह अशा वैद्यकीय उपचारांत सुलभ व चांगल्या प्रतीचे उपचार उपलब्ध झाले आहेत.

- Advertisement -

जीवनशैली सुधारण्यासाठी आपल्या देशात पुढील 25 वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होतील. बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन ज्ञान शाखांचा फार मोठा प्रभाव औषधांच्या क्षेत्रावर पडेल.

सद्यस्थितीत बदलत्या जीवनशैलीसोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी यांच्या जोरावर अद्ययावत तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. ज्याचा विशेष फायदा वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. त्यामुळे किचकट व भयावह अशा वैद्यकीय उपचारांत सुलभ व चांगल्या प्रतीचे उपचार उपलब्ध झाले आहेत.

गंभीर आजारांपैकी कर्करोग हा एक मोठा आजार आहे. पूर्वी कर्करोगाचे उपचार किचकट होते. त्या उपचारांचे परिणाम रुग्णांवर होत असत. त्यामळे कर्करोगाचे उपचार गंभीर व भयावह वाटत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर कर्करोगाच्या निदानासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यात 3डी इमेजिंग, 3डी, एआई (ख) यांचा समावेश होतो. त्यामुळे अचूक व नेमके निदान होणे शक्य झाले आहे. पूर्वी शस्रक्रिया हातांनी व किचकट पद्धतीने केली जात होती. त्यामुळे जास्त प्रमाणात टाके, रक्तस्राव होत असे. रुग्णालयात जास्त वेळ दाखल राहावे लागत होते.

परंतु आताच्या काळात अद्ययावत शस्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. त्यामुळे कमी टाके, कमी जखम, अचूक शस्रक्रिया तसेच संसर्गबाधितांचा धोका कमी झाला आहे. पूर्वी ब्लड कॅन्सरवर पुरेशा प्रमाणात उपचार उपलब्ध नव्हते. उपचार करताना वैद्यकीय क्षेत्रात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत होत्या.

अद्ययावत तंत्रज्ञानासोबत बीएमटी (बोन मॅरो ट्रॅन्सप्लान्ट) या उपचार पद्धतीमुळे ब्लड कॅन्सरच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. अद्ययावत उपचार प्रणालीमुळे क्रॉसमॅच झालेल्या डोनर व्यक्तीच्या शरीरातील हेल्दी ब्लड स्टेमसेल्स दिल्यावर रुग्णाच्या शरीरात शुद्ध रक्त बनण्याची प्रक्रिया सुरू होते. नव्या संशोधनानुसार ‘कार्ट टी सेल्स थेरपी, डी जेन थेरपी’ उदयास येत आहे. पुढील दहा वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध असतील.

किरणोपचार पद्धतीत अद्ययावत तंत्रज्ञानात लिनियर अ‍ॅक्सिलेटर, टोमो थेरपी एच, व्हर्सा एचडी, ब्रॅकी थेरपी कॉन्व्हेंशनल, थ्रीडी सीआरटी, इजीआरटी, आयएमआरटी, व्हीएमएसटी यांसारखे अद्ययावत तंत्रज्ञान उदयास आले आहे. त्यामुळे पेशींची वाढ लक्षात घेता त्रिमितीय तसेच सर्वांगीण अचूक उपचार रुग्णाला देणे सहज शक्य झाले आहे. स्तनांच्या कर्करोगात पूर्वी पूर्ण स्तन काढावे लागत होते. परंतु ब्रॅकी थेरपीसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्तनांतील कर्करोगबाधित पेशींनाच रेडिएशन देऊन कर्करोगावर उपचार केले जात आहेत.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीसारख्या आभासी आणि मिश्रीत वास्तविक तंत्रज्ञानामुळे मानवी संवेदनांसोबत वैद्यकीय तंत्रज्ञानाचे नवे जग उदयास येत आहे. रुग्णांना होणार्‍या फायद्याबरोबरच तरुणांना संशोधनाची आवड निर्माण करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे वास्तविक चित्र समोर येत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात 3डी इमेजिंग, 3डी प्रिंटिंग, एआई (ख), व्हीआर, 5जी रोबोटिक्स तंत्रज्ञान, जिनोमिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग-डीएन सिक्वेन्सिंग, डिजिटल टाट्यूज, प्रिसिजन मेडिसीन आदी व अशा अनेक विषयांना अनुसरून तंत्रज्ञानाची नवीन कवाडे खुली होऊन रुग्णहिताला उपकारक ठरून उत्तम जीवनशैली प्रदान करत आहेत.

उपचारांची किंवा निदानाची दिशा ठरवताना बहुआयामी पद्धतीने विचार करणे ही काळाची गरज आहे. जगात सुरू असलेल्या संशोधनांत प्रामुख्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर माणसाच्या दैनंदिन गरजा, आजाराची तीव्रता व पुरवलेल्या माहितीआधारे सर्वोत्तम तंत्रज्ञान सर्वांच्या आवाक्यात उपलब्धतेवर आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर शस्रक्रियेदरम्यान नेव्हिगेशनसोबत जटिल शस्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे करण्यासाठी होत आहे. 5जी स्पीड व 3डी इमेजिंगच्या सहाय्याने शस्रक्रियातज्ज्ञ कमीत कमी टाक्यांसह अवघड अशी शस्रक्रिया निष्णातपणे करून रुग्णांना निरोगी जीवनशैली प्रदान करत आहेत.

जनुकीय (जेनेटिकल इन्फॉर्मेशन) माहिती संकलित करून त्याच्यावर विविध प्रकारचे शोध करून शास्रज्ञांनी निदान व उपचारांची गुणवत्ता अधिक सुधारली आहे. अधिक प्रगल्भतेने वैद्यकीय तंत्रज्ञान उदयास येत आहे. जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून व आजारांची तीव्रता लक्षात घेऊन नवनवीन औषधांचे उत्पादन शास्रज्ञ करत आहेत. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर सध्या न्यू ड्रग डिलिव्हरी सिस्टिम, कॅन्सर ट्रिटमेंट किंवा प्रिसिजन मेडिसीन म्हणून होईल.

सध्याच्या ‘कोविड-19’ महामारीच्या काळात हॉस्पिटलमध्ये संक्रमणाचा धोका रुग्ण किंवा इतर वैद्यकीय सेवकांमुळे वाढतो. तेथे सर्जिकल सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्ण व सर्जन यांच्यात अंतर ठेवून योग्य शस्रक्रिया केली जाते.

3डी बायो प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे सिंथेटिक टीशूज रिकॉन्स्ट्रशन – पेशींतील बदल घडवून नवीन कृत्रिम पेशी उत्पादित केल्या जातात.

अद्ययावत किरणोपचार (रेडिओ थेरपी) प्रणालीमुळे सामान्य पेशींचा बचाव करून फक्त कर्करोग पेशींनाच व दूषित, अकार्यक्षम पेशींनाच किरणोपचार केला जातो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापरामुळे किरणोपचार अत्यंत प्रभावीपणे सिटी स्कॅनच्या मदतीने फक्त कर्करोग पेशींनाच मिळतात. मेडिकल ट्रायकोडस – इ-स्किन सेन्सरच्या मदतीने शरीरातील विविध घटकांचे अवलोकन करून शरीरातील तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी आदी मोजता येते.

3 डिमेन्शनल होलोग्राफिक इमेजमुळे एमआरआय पेट सिटी स्कॅनसारख्या व इतर होलोग्राफिक इमेजेस मिळतील. त्यामुळे निदानात्मक व शैक्षणिकदृष्ट्या वैद्यकीय तंत्रज्ञानाला प्रबळ बनवले आहे. शस्रक्रियातज्ञ अत्यंत प्रभावीपणे जटील शस्त्रक्रियाही (मेंदूच्या, पोटाच्या, आतड्याच्या व हृदयाच्या आदी) करू शकतील. ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसिंगद्वारे विकलांग व्यक्तींना किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. क्वांटम कॉम्प्युटिंग-डीएन- सिक्वेन्सिंगची माहिती (इ-सिलिकॉन स्टडीद्वारे) मिळवून निदानात्मक टेस्ट करून भविष्यात कुठले आजार उद्भवू शकतात या विषयावर शास्रज्ञ सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने शोध लावत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील उत्क्रांतीमुळे काळाची गरज व रुग्णांचे हित ओळखून वेगवेगळ्या प्रकारचे शोध सुरू आहेत. कर्करोगासारखा भयावह आजारसुद्धा आता रुग्णांना आयुष्यातील एक गतिरोधकापेक्षा जास्त वाटत नाही. आपल्या देशात पुढील 25 वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानात आमूलाग्र असे जीवनशैली सुधारण्यासाठी बदल होतील, यात काही शंका नाही. म्हणजे स्वमग्नता आणि आपल्या अस्मितेवर वाजवीपेक्षा जास्त प्रेम करणे नव्हे, हेही समजून घ्यावे लागेल. इतर देशातील कंपन्या अगदी चिनी कंपन्यांबरोबरसुद्धा सहकार्याचे करार करावे लागतील.

बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन ज्ञानशाखांचा फार मोठा प्रभाव औषधांच्या क्षेत्रावर येत्या 25 वर्षांत पडेल. भारत या दोन क्षेत्रात किती मूलभूत संशोधन करतो यावर भारतीय औषध उद्योगाचे भवितव्य अवलंबून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या