मेंढपाळांना परतीचे वेध

मेंढपाळांना परतीचे वेध

शिरवाडे वणी । दिलीप निफाडे | Shirvade Vani

परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी (heavy rain) झाल्यामुळे राहायला जागा नसल्याकारणाने खानदेश भागातून आलेली मेंढपाळ आता परतीच्या मार्गाची वाट धरू लागल्याचे दिसून येत आहे.

टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळताना दिसत असून स्वतःची शेती (farming) नसल्याकारणाने मेंढ्या पाळणे हा व्यवसाय खानदेश भागातून आदिवासी लोक (tribal community) बहुतांशी प्रमाणात करतांना आढळून येत आहे.

मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी स्वतःचे घरदार सोडून खाण्या पिण्याचे सर्व साहित्य बरोबर घेऊन विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर या म्हणी प्रमाणे घरून निघतात. तसेच रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्या जवळ बैलगाडी असते. तर सामानाचा बोजा वाहण्यासाठी खेचरांची आवश्यकता असते. मेंढ्यांची लोकर काढून विकणे, मेंढ्यांचे दुधाची विक्री करून तसेच मास तयार करण्यासाठी मेंढ्यांची विक्री करून त्यापासून उत्पादन मिळवणे.

त्याबरोबर गावठी कोंबड्या (Chickens) पाळून त्यापासून अंडे मिळवणे हा एक मेंढपाळ व्यवसायाला जोडधंदा देखील करतात. हा मुख्य व्यवसाय मेंढपाळांचा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी एक भाग ठरतो. मेंढपाळी चा व्यवसाय करणे तेवढे सोपे राहिले नसून दिवसेंदिवस जिरायती क्षेत्राचे रूपांतर बागायती क्षेत्रात झाल्यामुळे मेंढ्या पाळण्यासाठी पाहिजे तितके रान मोकळे मिळत नाही.

या जनावरांना एकाच जागी चारा घालून त्यांचे पोट भागत नसल्यामुळे त्यांना रानावनात अनेक झाडपाल्यांचा आधार ठरू लागल्याने इतर विविध प्रकारच्या गवत खाण्याची सवय असल्याने रस्त्याच्या कडेला अथवा शेताच्या बांधालगत मेंढ्या चारतांना लोकांचे बोलणे खाण्याबरोबरच अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

उन्हाळ्यात मका व कांद्याचे तसेच गहू, हरभर्‍याची शेती मोकळी राहत असल्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असते. परंतु आता पावसाळा लागल्यामुळे व सर्व दूर भरमसाठ पाऊस झाल्यामुळे मेंढ्या बसविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे तसेच पावसापासून संरक्षण करण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही. परिणामी पावसाळा संपेपर्यंत त्यांना निवारा शेड देखील उपलब्ध करीत नसल्यामुळे मेंढपाळांना त्यांच्या खानदेश मधील घराची वाट धरावी लागत आहे. साहजिकच तालुक्यातून मेंढ्यांचे मोठ्या प्रमाणात कळप परतीच्या मार्गाने त्यांच्या गावाकडे जातांना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com