विश्रांती : शरीराची अतीमहत्त्वाची गरज

विश्रांती : शरीराची अतीमहत्त्वाची गरज

- सौ. सुधा डोके

आपण आतापर्यंत आहार, विहार या गोष्टीबद्दल बरीच चर्चा केली, बरीच महिती जाणून घेतली. पण त्याचबरोबर वरील सुभाषिताप्रमाणे आपल्याला तेलढीच विश्रांतीची निवांत गरज असते. आहार, विहार आणि विश्रांती या त्रिगुणाने शरीर व्यवस्थित रहाते. पण आपण आपल्या आयुष्यात विश्रांतीला अजिबात महत्त्व देत नाही. त्याची उपयोगिता जाणून घेत नाही. आपले शरीर, मन थकते, त्याला विश्रांतीची गरज आहे हे सुद्धा आपण जाणून घेत नाही. आपल्या दैनंदिन कामात शेकडो गोष्टी घडतात, पण विश्रांतीला स्थान- किंमत देण्याचे आपण पूर्णपणे विसरतो. त्याने कुरकुर केली तरी त्याकडे थोडा कानाडोळाच केला जातो. परिणामी दिवस आळसवाणा होतो. बरे थोडी विश्रांती घ्यावी म्हटले तर वेळ फुकट घालविला असे वाटते, त्यावेळेत किती लाभ झाले असते, अशी मनाची धारणा होते. एवढा कामाचा ढीग दैनंदिन कार्यक्रमात असतो की त्यात विश्रांती घेण्याचा कोण विचार करतोय! त्या कामाने आपले मन इतके गुंतलेेले असते की कोणत्याच आनंदांचा आपण उपभोग घेवू शकत नाही. शरीराकडून नुसतेच काम करून घेतले जाते.

आता विश्रांती घेणे म्हणजे पाय सोडून आरामात झोपून राहणे नव्हे. सकाळी आरामात चहाचे घोट पीत बसणे किंवा 10-15 मिनिटे पेपर चाळणे यामुळे दिवसाची सुरूवात छान होते. दिवसभरात विश्रांती घेण्याचे अनेक पर्याय आहेत.

थोडावेळ गच्चीत उभे राहून शेजारणीचा हालहवाल विचारणे किंवा बागेत फिरून फुले तोडणे, झाडाला पाणी घालणे याने मनाचे लक्ष निसर्गाकडे वळून मन प्रसन्न होते आणि त्याला त्याच्या कामातून सुटका होऊन विश्रांती मिळते. अधून मधून टीव्ही लावून मॅच बघणे, रेडिओवर आवडती गाणी ऐकणे, अगदीच हे सर्व नाही जमले तर पाच मिनीटे डोळे बंद करून आरामात बसल्यानेही विश्रांती मिळते. कामगार लोक दुपारी कोठेही आडवे होऊन विश्रांती घेतात. फेरीवाले सकाळपासून फिरल्यामुळे झाडाच्या सावलीत थोडावेळ विश्रांती घेवून परत कामाला लागतात.

थोडक्यात काय विश्रांती घेतल्याने कार्यक्षमता वाढते, कामात एकाग्रता येते. उर्जा मिळते आणि शारीरिरक मानसिक आरोग्य सुधारते, कामाचा कंटाळा कमी होतो आणि काम अधिक चांगले होते. उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर लहान मुलांची भरपूर छान झोप झाल्यावर उठल्यानंतर गोड हसून छान विश्रांती मिळाल्याची पावती देतात. आजारी माणसाला 15 दिवस 1 महिना झोपून विश्रांती घेण्यास सांगतात. याचे कारण त्याच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे, नव्हे विश्रांती हेच त्याचे औषध असते. येथे मला एक गोष्ट सांगाविशी वाटते. माझ्या टेलरचे दुकान अगदी छोटे. त्यात दोन मशीन, कपडे ठेवायला भिंतीवर एक छोटे कपाट, माप घ्यायला एक टेबल असून बसायला जेमतेम थोडी जागा आहे. सकाळपासून काम केल्यानंतर दुपारी विश्रांतीसाठी पाळीपाळीने शटर बंद करून दोघेजण अर्धा-अर्धा तास विश्रांती घेतात. पहा शरीराची किती मोठी मागणी असते विश्रांतीची. शेवटी विश्रांती मार्ग ज्याचा त्यानेच शोधायचा असतो. सतत कामात व्यग्र असणे ही जरी सन्मानाची गोष्टी असली तरी शरीराच्या मनाच्या विश्रांतीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. विश्रांतीमुळे मिळालेली ऊर्जा बर्‍याच वेळ उत्साही ठेवते. ती फारच महत्त्वाची शरीराची गरज आहे. ती घेवून तुम्ही आयुष्य आनंदाने घालवू शकता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com