आदिशक्तीचं स्मरण करताना...

आदिशक्तीचं स्मरण करताना...

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं. देवांनी आणि मानवांनी; मग ते महिशासूररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो तिच्या अनुपम रूपांचे गोडवे नेहमीच गायिले गेलेे. कधी ती सौम्य रूपात कधी उग्र रूपात पण नेहमीचं आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे. या आदिशक्तीचे पुरूषभक्त महिलांहून अधिक आढळतात. मात्र नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करणारे हे पुरुषभक्त इतर वेळी इतर दिवशी स्त्रियांशी वेगळे का वागतात? इथं त्यांची सौहार्दता का दिसून येत नाही. आदिशक्तीचं स्मरण करावं मनोभावान स्त्रीला आदरानं, किमानपक्षी माणूस म्हणून वागवांव असा पण करावा.

त्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवता: असं म्हणतात. ज्याठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते, ज्याठिकाणी स्त्री ही वंदनीय आहे, जिथे तिच्या मताला किंमत आहे, तिच्या स्वाभिमानाचे रक्षण केले जाते त्या ठिकाणी देवांचे वसतिस्थान असते, त्या ठिकाणी देव रमतात असा या ओळीचा अर्थ होतो. हे आठवायचे कारण पुन्हा नवरात्रीचे दिवस येतात. दरवर्षी येणार्‍या आदिशक्तीचे आगमन. मनाला पुन्हा विचार करायला भाग पाडते. या आदिशक्तीचीचं रूपं असणारी आजची स्त्री. कशा प्रकारचं जिणं जगतेयं! आजच्या कलियुगात तिचा योग्य तो मान राखला जातो का? वर वर पाहता समसमानतेच्या युगात जरी समान हक्क दिला गेलेला आहे तरी मनापासून तो ग्राह्य आहे का? अगदी ऐरणीच्या टोकावरचा प्रश्न जरी नसला तरी पुन्हा नव्यानं विचार करणं गरजेचं ठरू पाहतयं हे नक्की.

देवानं जग निर्माण केलं पुरुष निर्माण केला तरीही जगाला पूर्णता आली नाही, काही त्रुटी देवाला जाणवल्या मग त्यानं पुरूषाच्या अर्ध्या अंगापासून स्त्री निर्माण केली. अशी रूपककथा आहे. म्हणूनचं तिला अर्धार्ंंंगी म्हटलं जातं पण हे अर्धार्ंंंग पूर्ण आहे. या पूर्णत्वाची जाणीव वेळोवेळी जगाला झालेली आहे अनुभवाला आलेली आहे असं असतांना मग ही आज होणारी वंचना तिच्या वाटेला का यावी.? आणि हा अनुभव दर काळात दर युगात तिच्या वाटेला आलेला आहे कधी सिता कधी द्रौपदी तर कधी अहल्या. म्हणून स्त्री ही आदिशक्ती मानली जाते तर मग अस का? ह्याची उत्तर काळात दडलेली आहेत की पुरूष प्रधान संस्कृतिच्या अंर्तमनात?

आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची सुरवात होते. याला शारदीय नवरात्र देखील म्हणतात. नवरात्रीचेंं दिवस मोठे छान असतात. नऊ दिवसात आदिशक्तीचे 9 रूपात पूजन होते पहिले 3 दिवस महाकालीपूजन नंतरचे 3 दिवस महालक्ष्मीपूजन आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीपूजन पूर्णता चैतन्यमय दिवस आल्हादकारक वातावरण अिाण निसर्गाचं विलोभनिय सक्रिय समर्पण. सकाळच्या कोवळया वेळी सूर्याच्या सोनेरी किरणात उगवलेली पहाट हरी ओम् हिरण्यवर्णाम् ....... अशा मंगलमय पवित्र स्वरानीं अधिकचं पवित्र होते. मागच्या बंगाली घरातून धुपाचा वास, शंखध्वनी वातावरणात भिनू लागतो. अिाण खर्‍या अर्थानं नवरात्र सुरू होत असल्याची जाणीव होते.......आ्ॅिॅफसला जाताना रस्त्यावर देखील नवरात्र विविध रंगाच्या सुदंर रेशमी साड्यामधून जाणवत राहतं माणसाचं मन असचं असतं जे आज आहे जे ताजं ते आपलसं करायचं आणि येणार्‍या दिवसाचं स्वागत करायचं ही वृत्ती स्त्रीमध्ये तर जास्तच प्रकर्षानं जाणवते.

दु:ख सोसण्याची जबरदस्त ताकद तिच्यात आहे. पुरूषानं कितीही नाकारलं कितीही त्रास दिला तरी तिच्यात पुनश्च ताकदीनं उभी राहण्याची शक्ती आहे साधसं उदाहरण, काही दिवसापुंर्वी माझ्या कामवालीनं सागितलं बाई, घरवाला काही काम करत नाही.

नुस्ता पितो आणि घरात दंगा करतो. दोन मुल त्यातील मुलगी वयात आलेली कस साभांळू? खूप सोसलं पण आता नाही घराचे दारचं आता त्याला बंद. नेहमीचीच कथा आणि आज ? तिचं नवरात्रात 9 दिवस उपास करणार नवर्‍यासोबत जावून देवीची ओटी भरणार का ग असं मी विचारताचं ती म्हणते जावू द्या बाई आपला जन्म असाच नवर्‍याला माफ करायचं झालं गेल विसरायचं आणि पूढं चलायचं तेच तेच धरून का कुठं चालतयं चार वर्ग सुध्दा शिकली असेल असं वाटत नाही पण ही विचार करण्याची तिची ताकद तिच्यात उपजत आहे. सोशिकता हा गुण निसर्गानं तिला जन्मत: दिेलेला आहे.

जेव्हा जेव्हा पृर्थ्वीवर संकट आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं देवानीं आणि मानवांनी मग ते महिशासूररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो तिच्या अनुपम रूपाचें गोडवे नेहमीचं गायिले गेलेले आहे. कधी ती सौम्य रूपात कधी उग्र रूपात पण नेहमीचं आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे.

तिचे स्त्रीभक्तापेक्षा पुरूषभक्त अधिक भाविक आढळतात नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करतानां इतर वेळी इतर दिवशी स्त्रीयांशी वेगळे का वागतात त्यांची सौर्हाद्रतता का दिसून येत नाही. लहानपणची एक आठवण दर नवरात्रात मला होते. समोर राहणारे काका नवरात्रात नऊ दिवस उपास करत रात्री आरतीच्या वेळी काकुंच्या अंगात देवीचा संचार होत आरतीला खूप लोकं जमत असे त्यावेळी काका काकुला अगदी वाकून नमस्कार करत अगदी भक्तीभावानं! आरती संपल्यावर मात्र जेवण वाढायला उशीर झाला की ऐवढे मोठ्यानं ओरडत सगळया आळीला ऐकू जायचे. शेजारची मथी आजी म्हणायची काय मेला हा माणूस आधी मारे फुलांनी पूजा करतो आणि मग...... मी एकदा असं म्हटलं होत की, मग काकूंनी नेहमीचं देवी म्हणून राहावं. बाई तू राहशील हो तशी ! काय सागांव जमाना बदलला.....पण अजून तरी चित्र बदललं नाहीयं थोडा बदल आहे, नाही असं नाही. समसमान विचाराचा पगडा नविन पिढीत जाणवतोयं. मुलंमुली बरोबरीनं शिकतात. पण तो पूर्ण समाधानकारक नाही.

वास्तविक पुरुषप्रकृति, एकाचं रथाची दोनं चाक, वाचून देवून गुळगुळीत झालेल्या उपमा. सवयीनं त्याच त्या ओठावर येतात. परुष श्रेष्ठ की स्त्री ! कशासाठी वाद घालायचा. केवळ रोजच्या जिवनात नाही तर पूजेच्या अगदी नवरात्रीत देवीच्या पूजेच्या वेळी दोघांची सारखी गरज असते तेव्हा हा वाद आता नको. सुंदर दिवस आहेत मनात आदिशक्तीचं स्मरण करावं मनोभावानं तिला नमन करावं जमल्यास पुढच्या सर्पूण जीवनात स्त्रीला आदरानं, किमानपक्षी माणूस म्हणून वागवांव असा पण करावा. आदेश नाही आग्रह आहे.

Related Stories

No stories found.