त्रैमासिक भविष्य – धनु

त्रैमासिक भविष्य – धनु

मार्च -2020

ग्रहस्थिती – महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-गुरू-केतू-प्लूटो, द्वितीयात शनि, तृतीयात रवि-बुध-नेपच्यून,पंचमात शुक्र-हर्शल,सप्तमात राहू
अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – राशी चिन्ह शरीराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूष मुखरहित घोडयावर बसलेला असे आहे. राशी स्वामी गुरू, तत्व-अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभाव रास असल्यामुळे लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्व दिशा फायद्याची. लिंग पुरूषाचे त्यामुळे काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे. वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त-प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग पिवळा, शुभ दिवस गुरूवार, देवता विष्णू, शुभ अंक-3, शुभ तारखा-3/12/21/30. मित्र राशी-मेष व सिंह, शत्रु राशी-कर्क, वृश्चिक,मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता. व्यावहारिकता चांगली. स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण. मुडी स्वभाव.
तृतीयात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ-मोठ्या व्यापार्‍यांशी ओळख होईल. त्यामुळे उलाढालीत वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. भावी घटनांविषयी स्वप्नाद्वारे सूचना प्राप्त होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. साहसाकडे कल राहील. लोकहिताची कामे कराल.
स्त्रियांसाठी – महिलांचा धार्मिकतेकडे कल राहील. बोलतांना कटू शब्द वापउरण्याचे टाळल्यास घरातील वातावरण तणावरहित राहील. अपघातातून आश्चर्यकारकरित्या सुटका होईल. पतिराज तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत.
विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.
शुभ तारखा -3, 4, 5, 8, 11, 18 , 25, 26, 30, 31,

एप्रिल – 2020

ग्रहस्थिती -महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी केतू, द्वितीयात शनि-मंगळ-गुरू-प्लूटो, तृतीयात बुध-नेपच्यून, चतुर्थात रवि, पंचमात हर्शल, षष्ठात शुक्र, सप्तमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थात रवि आहे. राजकारणी लोकांसाठी चांगला आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारच्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीवाडीपासून चांगला फायदा होईल. वृद्धांसाठी हा महिना विशेषतः चांगला जाईल. शारीरिक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. बागाईतदारांना हा महिना प्रगतीकारक राहील. द्राक्षबागाईतदारांना परदेश संबंधित व्यापाराद्वारे आर्थिक लाभ होतील.
षष्ठात शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहाराविहारामध्ये फार जपून रहाल. विषयसुखाचा अतिरेक केल्यास स्वास्थ्य बिघडेल. एकांतवास प्रिय वाटणार नाही. द्वितीयात शनि आहे. आर्थिक आवक चालू राहील. परंतू गती मात्र धीमी राहील. शनिची तृतीय दृष्टी सुख स्थानावर आहे. घरातील वातावरणात तणाव राहू नये याविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांसाठी- हातात पैसा खेळता राहील. पतीराज खूश राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सख्या हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.
विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणक्ती यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्याना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.
शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 9,13, 14,15, 16, 18 , 19, 26, 28,29,30.

मे – 2020

ग्रहस्थिती – महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी केतू द्वितीयात गुुरु-शनि-प्लूटो तृतीयात मंगळ, पंचमात रवि-बुध-हर्शल, षष्ठात शुक्र, सप्तमात राहू, अशी ग्रहस्थिती राहील.
तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊ वृत्ती चांगली राहील्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचा भाग असेल. भावंडासाठी खर्च करावा लागेल. दैवी कृपेची प्रचिती येईल.
पंचमात हर्शल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा कारण त्यात यश मिळण्याची शक्यता नाही. संततीविषयक त्रास संभवतो. प्रेम व्यवहारात साावध रहावे. भावनेच्या भरात प्रेमप्रकरणात चूक होण्याचा संभव आहे. विवेकाची कास धरावी. संततीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक.
द्वितीयात गुरू आहे. शब्दाने लोकांवर हुकूमत गाजविता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. आर्थिक आवक विपुल प्रमाणात होईल. सुग्रास भोजन प्राप्त होईल. शब्दाने लोकांवर चांगली हुकूमत गाजविता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. द्वितीयात गुरू आहे हा भाग्यवृद्धीचा एक स्वतंत्रयोग आहे.
स्त्रियांसाठी – षष्ठातील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. द्वितीयातील गुरूची चांगली साथ मिळेल. स्त्रियांची सहनशीलता चांगली राहील.
विद्यार्थ्यांसाठी – मे महिना सुट्टीचा महिना त्यात पंचमेश शसंत बसू देणार नाही. विद्यार्थी मनाप्रमाणे खेळात, फिरण्यात, शारीरिक व्यायामात भाग घेऊ शकतील. अभ्यासाचे दडपण दूर राहील.
शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 18, 19, 24, 25, 27, 28, 29, 30

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com