वाचन संस्कृतीचे जतन

वाचन संस्कृतीचे जतन

कळवण । किशोर पगार | Kalwan

कळवण (kalwan) शहर व तालुक्याने औद्योगिक प्रगती (Industrial progress) केली नसली तरी राजकीय (political), सामाजिक (social), शैक्षणिक (Academic), सहकार, क्षेत्रात मात्र उत्तुंग प्रगती केली आहे बौद्धिक (Intellectual), शारीरिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक विकासात सहभाग म्हणून वाचन संस्कृतचे जतन (Preservation of reading) करणारे पंडु बाबाजी बेजकर सार्वजनिक वाचनालय (Public Library) हे नाशिक जिल्यातील (nashik district) एक आदर्श वाचनालय आहे 1947 साली या वाचनालयाची स्थापना झाली आहे. कळवण (kalwan) शहराच्या मध्यभागी वाचनालयाची वास्तू दिमाखात उभी आहे.

वाचनालयाच्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून कळवण तालुक्यासारख्या आदिवासी (tribal) व अतिदुर्गम भागात कळवण शहरातील सर्वं नागरिक, मुले, यांचा बौद्धिक विकास (Intellectual development) व्हावा यासाठी वाचना लयाने विविध उपक्रमांद्वारे जन जागृतीचे कार्य केलेले आहे. शहराच्या नावलौकिकात भर टाकली आहे 1947 ते 1989 पर्यंत वाचनालय अनंत अडचणींना तोंड देत भाड्याच्या खोलीत होते.

अपूर्ण जागेमुळे दुर्मिळ ग्रँथ जतन करणे कठीण झाले होते. सन 1955 मध्ये एस. एम. जोशी यांनी ह्या कळवणच्या वाचनाल्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी अभिप्राय दिला होता की गाव झपाट्याने प्रगती पथा वर वाटचाल करीत आहे याचे चिन्ह म्हणजे हे वाचनालय आहे. वाचनाल्यास स्वतंत्र इमारतीची गरज आहे. गावातील तरुणांनी पुढाकार घेतल्यास ही इमारत उभी राहील व ती उभी राहून सुशिक्षित आणी समाजहित दक्ष मंडळींना जमवण्याचे ते एक केंद्र होईल, त्यासाठी तरुणांनी या वाचनालयाची।धुरा सांभाळली पाहिजे.

आज एस. एम. जोशींचे स्वप्न साकार झालेले आहे. वाचनालय सांस्कृतिक प्रभोधनाचे केंद्र असावे म्हणून अ‍ॅड. परशुराम पगार, प्रा. के. के. शिंदे, नंदकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनाल्याने वाटचाल सुरू केली संचालक मंडळाने स्वतःची इमारत मध्यवर्ती ठिकाणी असावी म्हणून ग्रामपंचायतीच्या ताब्यातील भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या प्रयत्नाने शासन स्तरावरुन वाचनाल्यास भूखंड मिळवून दिला.

संचालक मंडळाने पुढे मोठया परिश्रमाने इमारती चे बांधकाम करण्याचा निर्धार केल्याने तत्कालीन कळवण तालुक्याचे धुरंधर आमदार ए. टी. पवार इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. निधी कमी पडू लागल्याने कळवण मर्चंट ब्यांकेने त्यांच्या धर्मदाय निधीतून 1 लाख 20000 रुपये दिले. कळवण शहरातील दानशूर व्यक्तीकडून निधी जमा करून नवीन इमारत बांधकाम सुरू झाले.

वाचनालयाची चांगली कामगिरी पाहून नाशिक येथील प्रा. सुरेश मेने यांनी वाचनालयाला वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ 1 लाख रुपयांची देणगी वाचनाल्याला दिली. तत्कालीन खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी वाचनाल्याला 6 लाख रुपयांचा निधी उदार अंतकरणाने दिला. त्यामुळे आज वाचनालयाची इमारत कळवण शहराच्या वैभवात भर टाकणारी व समाज प्रभोधनाचे सांस्कृतिक चळवळीचे व वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे एक महत्त्वाचे उधभोधन केंद्र वाचनालय ठरले आहे.

कळवण शहरातील उद्योजक, विविध सहकारी संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, लागूंउद्योजक, ठेकेदार, व्यापारी, शिक्षक, समाज सेवक, दानशूर व्यक्ती, या सर्वांनी वाचनालयाच्या पदरात दान टाकले आहे. त्यामुळे आज शून्यातून विश्वनिर्मिती या संकल्पनेने हे वाचनालय ब वर्गातून अ वर्गात आलेले आहे आज वाचनालयात ग्रँथ दालन, बालविभाग, श्रीविभाग, वाचन कक्ष, संदर्भ ग्रँथ, साखळी योजना सुरू आहे.

वाचनाल्याने नेहमी नवनवीन उपक्रम राबविले आहेत सलग 25 वर्षे वक्तृत्व स्पर्धा, कवी संमेलन, ग्रँथ उत्सव, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, मान्यवर व्याख्याने, कथाकथन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कराटे शिबीर, पारायण सोहळा, आरोग्य निदान शिबिरे, रांगोळी स्पर्धा, सामान्य न्यान स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कळवण वासीयांना व तालुक्यातील कला रसिकांना सांस्कृतिक उपक्रमांचा एक अनमोल साहित्याचा नजराणा प्राप्त करून दिलेला आहे. वाचनाल्याने बेज , पाळे, विसापूर, शिरसमणी आदी ग्रामीण भागातही साखळी योजनेद्वारे ग्रँथ पुरविले आहे.

कळवण सारख्या आदिवासी भागात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका गरजेची आहे. हे महत्व ओळखून कळवण चे गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय डॉ. सुभाषचंद्र न्याती यांच्या समरणार्थ त्यांचे सुपुत्र डॉ. स्नेहल न्याती यांनी वाचना लयाला 20 लाख रुपयांची देणगी देऊन आज वाचनालयाची सर्व सुविधांनी उक्त अभ्यासिका साकार झालेली आहे.

या अभ्यासिकेत 100 विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था केलेली असून या अभ्यासिकेत अभ्यास करून बहुतांश विध्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवूनव मोठ्या पदावर कार्यरत आहे. ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, अशा विविध विषयांवरील सर्व प्रसिद्ध लेखकांची पुस्तके, कादंबरी, कथा संग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह, नियतकालिके,

साप्ताहिके, स्पर्धा मार्गदर्शन पुस्तके, आदींनी वाचना लयाचे भांडार समृद्ध आहे. वाचनालल्याच्या प्रगतीमध्ये दानशूर व्यक्ती, छोटे मोठे दाते, सर्व सहकारी संस्था, सर्व सामाजिक कार्यकर्ते, संचालक मंडळ, हेच शिल्पकार आहे. यात शनका नाही अशा प्रकारे कळवण तालुक्याच्या सांस्कृतिक संवर्धनात अग्रेसर असणारे वाचक चळवळ जागृत ठेवणारे मनामनात मशागत करणारे कळवण चे सार्वजनिक वाचनालय कळवणची ज्ञान गंगाच ठरले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com