Friday, April 26, 2024
HomeUncategorizedफड बागायतीचे पुनरूज्जीवन व्हावे

फड बागायतीचे पुनरूज्जीवन व्हावे

अंबासन । प्रशांत भामरे | Ambasan

कधी काळी मोसम नदीवर बांधलेल्या 18 बंधार्‍यांमुळे मोसमखोरे सुजलाम् सुफलाम् झाले होते. या बंधार्‍यांच्या पाण्यामुळेच सेकंडक्लास फड बागायत पध्दती विकसित होवून हजारो एकर शेती फुलली होती.

- Advertisement -

तत्कालीन समाजधुरिणांनी लोकसहभागातून उभारलेल्या या बंधार्‍यांपैकी काही नामशेष झाले असून काहींचे अस्तित्व आजही शिल्लक आहे. त्यापैकीच दुरूस्तीलायक बंधार्‍यांचे पुनरूज्जीवन (Revival of dams) झाले तर मोसम खोर्‍यातील शेतीला पूर्ववैभव प्राप्त होण्याबरोबरच पिण्याच्या पाणीटंचाईतूनही (Water scarcity) जनतेला मुक्ती मिळू शकणार आहे. यास्तव बंधारे दुरूस्तीची मागणी (Demand for repair of dams) अलिकडे जोर धरू लागली आहे.

सन 1944 च्या महापुरात फुटलेला बंधारा (dam) आज गलीतगात्र अवस्थेत दिसून येत आहे. या बंधार्‍यामुळे कधीकाळी किमान पाच कि.मी. परिसर पाण्याने सुजलाम् सुफलाम् व्हायचा. आज मात्र बंधारा फुटला असल्याने अंबासनसह (Ambasan) मोराणे-सांडस, बिजोरसे परिसरात शेतीच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. 1944 पूर्वी याच बंधार्‍यावरून अंबासन (Ambasan) येथील 130 एकर फड बागायत जिवंत होते. या बंधार्‍यांची नोंद सर विश्वेश्वरय्या (Sir Visvesvaraya) यांच्या डायरीत सुद्धा सापडते. कमी खर्चात पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक (Eco-friendly and natural) साधन संपत्तीचा वापर केलेली पद्धत जगात कुठेही सापडत नाही.

अंबासन येथे कोळी समाजाचे वतनदार होते. त्यांनी या बंधार्‍यांची निर्मिती (Construction of dams) केली होती. त्या काळात त्यांच्याकडील साधन सुविधेचा वापर करून पहिल्या टप्प्यात कामास सुरुवात झाली. त्यांनंतर पाण्याची मागणी आणि लोकसंख्या वाढत गेली. त्यानुसार बंधार्‍याचा विस्तारही होत गेला. मुख्यत: बंधारा तीन टप्प्यात बांधण्यात आला आहे.

बंधार्‍यावर 130 एकर सेकंडक्लास एरिगेशन सिस्टीम (Second class irrigation system) त्या काळात फक्त आरम, मोसम व पांझरा नदीवरच बघायला मिळते. बागलाण (baglan) परिसरात 1606 मध्ये पहिला बंधारा बांधण्यात आला होता. त्याच धर्तीवर अंबासनचा बंधारा बांधण्यात आला होता. आजमितीस मोसम नदीवर 18 बंधारे आहेत. त्यात काही बंधार्‍यांची पडझड झाली असून

अंबासनचा जुना बंधारा तुटल्याने नवीन बंधारा बांधण्यात आला. नामपूरच्या पूर्वेस तो बांधत असतांना अंबासनचे क्षेत्र कमी असल्याने त्यात काकडगाव, अंबासन ही दोन्ही गावे मिळून बंधारा बांधण्यात आला. पूर्वीचा अंबासन बंधारा मात्र दुर्लक्षित झाला. जो बंधारा अंबासनची फड बागायत जीवंत ठेवत होता, त्याचा मोठा फायदा मोराणे गावापर्यंत मिळत होता.

मोसम नदीच्या दक्षिण व उत्तर भागात किमान चार ते पाच कि.मी. परिसर पाण्याने सुजलाम् सुफलाम् झाला होता. हे बंधारे फुटण्यास 80 ते 85 वर्षे झाली तरी कुणालाच काही देणे-घेणे नाही. अंबासन ग्रामस्थांनी स्वखर्चाने हा बंधारा बांधला होता. त्यात विशेषत: घरटी चुना, कापूस, गुळ यांचे मिश्रण करून प्रत्येक घरी वाटले जायचे.

त्याचा लगदा करून उखळात कुटून एकजीव केले जायचे व हा लगदा डोक्यावर घेऊन बंधार्‍याजवळ घेऊन जायचे. कुठे तडा गेला तर पुन्हा लगदा उखळात चेंदून एकजीव करायचा. चांगला लगदा झाला की त्यात वाळू, खडी मिसळून बांधकामात वापरला जायचा. एवढे अपार कष्ट करून पूर्वजांनी बांधलेला हा बंधारा आज मात्र तुटलेल्या अवस्थेत आहे. कमी खर्चात बंधारा दुरूस्ती (Dam repair) होऊ शकते किंवा त्याचा केटीवेअर म्हणून सुद्धा उपयोग करता येऊ शकतो.

माजी खा. प्रतापदादा सोनवणे (former MP Pratapdada Sonawane) यांनी तापी खोरे महामंडळाकडून (Tapi Valley Corporation) मोसम नदीवर तीन केटीवेअर बंधारे मंजूर करून घेतले आहेत. त्यासाठी पाणी उपलब्धतेचा दाखला सुद्धा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. या बंधार्‍यावर एक मोठा केटीवेअर झाल्यास अंबासनप्रमाणेच मोराणे, बिजोरसे आदी गावांनाही मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होऊन हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊ शकते.

काही दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) अधीक्षक अभियंत्यांसह द्वारकाधीश साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत (Shankarrao Sawant, Chairman, Dwarkadhish Sugar Factory) यांनी या बंधार्‍याची पाहणी केली होती. माजीमंत्री स्व. दौलतराव आहेर हे तापी विकास महामंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांनी देखील पाहणी केली होती. सदर बंधार्‍याच्या मागणीसाठी खा.डॉ. सुभाष भामरे, माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्याकडेही सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिक्पाल गिरासे यांनी पाठपुरावा केला होता.

आता बागलाणचे आ. दिलीप बोरसे यांनी याप्रश्नी लक्ष घालावे आणि राज्यकर्ते व संबंधित अधिकार्‍यांना सदर बंधार्‍यास शासकीय मान्यता देऊन दुरूस्तीचे काम मार्गी लावण्यास भाग पाडावे, अशी शेतकरी व ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ​जातात याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या