शाळांना पालक अनुकूल?

jalgaon-digital
3 Min Read

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

नांदगाव (nandgaon) शहरासह ग्रामीण भागातीलही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा (schools) येत्या 13 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय (schools reopen) जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाने (Department of Elementary Education) घेतला आहे.

नांदगाव शहरासह तालुक्यातील शिक्षक-शिक्षकांची (teachers) येथील ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर तपासण्या (RTPCR test) करण्यात आल्या आहेत. तसेच नांदगाव तालुक्यात (nandgaon taluka) इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा (Zilla Parishad schools) एकूण 213 शाळा आहेत.तर नगरपरिषद व खाजगी शाळा (Private school) 52 आहे. शहरासह तालुक्यात एकूूूण 265 शाळा आहेत. शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत पालकांचे संमतीपत्र मागविले होते. त्यात सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. म्हणून शाळा विद्यार्थ्यांनी (students) गजबजणार आहेत.

त्यासाठी काही नियमावली ठरवून देण्यात आली असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिचोले (Group Education Officer Pramod Chichole) यांनी दिली नांदगाव शहरासह ग्रामीण भागातीलही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा जिल्हाधिकार्‍यांकडे झालेल्या बैठकीनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन वर्षांनंतर शाळांची घंटा वाजणार असून चिमुरड्यांच्या आगमनाने परिसरही गजबजणार आहे. करोना (corona) विषाणूच्या संसर्गामुळे मार्च 2020 पासून शाळांंना टाळे होते. लहान मुलांचा या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्याचा हेतू त्यामागे होता. पहिली लाट ओसल्यानंतर सरकारने लादलेले निर्बंध टप्प्याटप्याने शिथिल करण्यात आले होते. महाराष्ट्रातील (maharashtra) देऊळ, सरकारी, निम सरकारी कार्यालय, कारखाने उद्योग आदी विविध क्षेत्रातील कर्मचारी कामगार कामावर परतले होते. – दुसरीकडे शाळा सुरू करण्याबाबत मात्र सावध पवित्रा घेण्यात आला होता.

दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर म्हणजे दिवाळीच्या आधी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली होती. नांदगाव शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. ग्रामीण भागातील शाळांचा निर्णय मात्र प्रलंबित होता शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत पालकांचे संमतीपत्र मागविले होते.

त्यात सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. तसा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला होता. त्याआधारे ग्रामीण भागातीलह इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना संपूर्ण शाळा, खोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार असून एक बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जाणार आहे. हात धुवण्याची व्यवस्था, ताप मोजणी यंत्रे आदी व्यवस्थाही कराव्या लागणार आहेत. तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे लसीकरणही बंधनकारक करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *