Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकांद्यावर मावा, करपा

कांद्यावर मावा, करपा

निफाड। आनंद जाधव | Niphad

नगदी पीक म्हणून तालुक्यातील शेतकरी (farmer) उन्हाळ कांदा (Summer onion) लागवडीला सर्वाधिक पसंती देत आला आहे. मात्र यावर्षी कित्येक दिवस राहिलेले ढगाळ हवामान (Cloudy weather) अन् दाट धुके (fog) यामुळे कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याने कांदा पिकाची (onion crop) पात जळू लागली असून त्यामुळे कांद्याची वाढ खुंटली आहे.

- Advertisement -

साहजिक हा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बुरशीनाशके, पोषके आदी औषधांची फवारणी करतांना दिसू लागले आहे. मात्र असे असतांनाही हा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शेतकर्‍यांनी मागील वर्षी पिकविलेल्या उन्हाळ कांद्यासह यावर्षीच्या लाल कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी शेतकर्‍यांनी गहू (Wheat), हरभरा (Gram), भाजीपाला (Vegetables) पिकाचे क्षेत्र कमी करून कांदा लागवडीला पसंती दिली.

तर गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता अनेकवेळा कांदा बियाणे नित्कृष्ट निघत असल्याने यावर्षी शेतकर्‍यांनी घरगुती बियाणे खरेदीला पसंती दिली. त्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार, सोयरे मंडळी यांचेकडून बियाणे घेत रोपे तयार केली. त्यातही परतीच्या पावसाने या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी पुनश्च एकदा बियाणे व रोपांची शोधमोहिम राबवत शेतकर्‍यांनी कांदा लागवडीला पसंती दिली. यातही कांदा लागवडीसाठी खत अन् मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले. परिणामी बाहेरील गावातून महिला मजूर आणून कांदा लागवड (Onion planting) करण्यात आली.

यावर्षी नोव्हेंबर मध्ये सुरू झालेली कांदा लागवड आता जानेवारी संपत आला असतांनाही ही लागवड सुरूच आहे. तर ज्यांनी प्रारंभी कांदा लागवड केली अशा कांदा पिकाला आता मावा, करपाचा सामना करावा लागत आहे. दररोजचे ढगाळ हवामानाबरोबरच पहाटे पडणारे दाट धुके यामुळे कांदा पात जळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटली आहे. त्यातच विजेचे वाढते भारनियमन अन् खत टंचाई शेतकर्‍याची पाठ सोडावयास तयार नाही. त्यामुळे या रोगाचा अटकाव कसा करावा असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

त्यातच आता लागवड होत असलेला कांदा मे महिन्याच्या अखेरीस काढणीस येईल. परिणामी एप्रिल व मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे हा कांदा जमिनीत भाजणार असल्याने तो टिकावू राहणार नाही. परिणामी हा कांदा साठवणुकीच्या आशेवर शेतकर्‍यांना पाणी सोडावे लागणार आहे. यावर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाल्याने जर कांदा उत्पादन वाढले तर बाजारभावात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने कांदा पिकावर झालेला खर्च फिटेल की नाही याची चिंता शेतकर्‍यांंना आत्ताच भेडसावू लागली आहे.

परंतु कांदा पीक हे जुगारी पीक ठरू लागल्याने पुढे भाव मिळेल की नाही याची चिंता न करता कांदा पिकविण्यालाच शेतकरी पसंती देत आला आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती शेतकर्‍यांची पाठ सोडावयास तयार नाही. कधी अवकाळी तर कधी गारपीट. यावर्षी मात्र परतीचा पाऊस अन् आता ढगाळ हवामान, दाट धुके यामुळे प्रतिकूल हवामानाचा फटका कांदा पिकाला सर्वाधिक बसतांना दिसत आहे. मात्र त्याही परिस्थितीत महागडी औषधे फवारणीसह रात्रीचा दिवस करून कांदा पिकाला पाणी देत कांदा वाचविण्याला शेतकरी पसंती देतांना दिसत आहे. न संबधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या