माणुसकीच्या शत्रु संंगे युध्द आमचे सुरु

माणुसकीच्या शत्रु संंगे युध्द आमचे सुरु

नाशिक | Nashik | नरेंद्र जोशी

नैसर्गिक आपत्ती (natural disasters), कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान (crop damage) झाल्यास शेतकर्‍यांना (farmers) विमा संरक्षण (insurance protection) देण्यासाठी गेल्या 2016 पासून पिकविमा योजना (crop insurance plan) सुरु झाली आहे. आता पर्यंंत 52 हजार कोटी रुपये 17 विमा कंपन्यांना देण्यात आले आहे. त्यांनी 42 हजार कोटीची नुकसान भरपाईही (indemnity) केली आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु आहे. मात्र नुकसान झाले नाही तर कंपन्यांंना फायदा होत असतांना सुध्दा शेतकर्‍यांचे नुकसान झाले असतांनाही ठरलेला भरपाई देण्यास हात आखडता घेणे त्या नुकासानीकडे जाणुनबुजुन कानाडोळा करणे. या अपप्रवृत्तीला शेतक़र्‍यांचा विरोध आहे.

माणुसकीच्या शत्रु विरुध्द त्यांचा लढा सुरु आहे. ज्याप्रमाणे विमा हप्त्यासााठी कृषी खाते (Department of Agriculture) जागृती करते. तशीच विम्याची रक्कम मिळवुन देण्यासाठी या खात्याने पुढाकार घेतला असता तर हे खाते शेतकर्‍यांभिमुख झाल्याशिवाय राहीले नसते. पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात.

शेतकर्‍यांनी खरिप हंगामातील पिकविमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के रक्कम भरावी लागतेे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचें नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, जमीन जलमय होणे, भुस्खलन होणं, पावसातील खंड, कीड, रोग यामुळे उत्पादनात आलेली घटक, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्याने होणारे नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते.

खरिप हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारे नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांचे नुकसान याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते. कारण शासकीय मदतीपेक्षा विम्याची रक्कम निश्चित तीप्पट असते. भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे.

त्यानुसार शेतकर्‍यांना 2 टक्के विमा हप्ता लागतो. भात पिकासाठी शेतकर्‍यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये त्यानुसार शेतकरी 2 टक्केने हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरतात. भुईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 रुपये आहे. त्यानुसार शेतकर्‍यांना 2 टक्केनें हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे.

त्यानुसार हेक्टरी 520 रुपये मुग आणि उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार मुग आणि उडीद पिकासाठी हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता आहे. नाशिक जिल्ह्यात (nashik district) गेल्या ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने (heavy rain) एक लाख 71 हजार 867 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असुन सव्वा दोन लाख शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला आहे.

त्यांंच्या मदतीसाठी शासनाकडून 147 कोटी 21 लाख 33 हजार रुपयांची अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. यंदा मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, पेठ तालुक्यातल्या गावांना जबर फटका बसला आहे. त्यामुळे 674 गावातील 224919 शेतकर्‍यांचे तब्बल 171867.53 हेक्टरवरील पीक मातीमोल झालेे. झाले. पावसाने भुईमूग, बाजरी, कापूस, मका, मूग,भात, मठ या पिकांचेही अतोनात नुकसान झाले.

जिल्ह्यात एक लाख 41 हजार शेतकर्‍यानी पिकविमा काढला आहे. बाकी शासनाच्या मदतीवर अवलंबुन आहेत. शासनाची मदत तटपुंजी मिळते. पिक वामा घेतला असता तर शासकीय मदतीच्या तिप्पट भरपाईचा अधिकार राहीला असता. मात्र वीमा न घेतल्याने त्यांचे नुकसान होण्याचीच भिती आहे. आता पाहुया विमा काढणार्‍यांना विमा कंपनी किती भरपाई देते यावेळी कृषी खात्याने समाधाानकारक भरपाईसाठी प्रयत्न केले नाही तर शेतकर्‍यांचा पिक विम्यावरील विश्वासाला तडा गेल्या शिवाय राहणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com