जुनाट बसगाड्या जीवावर बेतणार

जुनाट बसगाड्या जीवावर बेतणार

नाशिक | सोमनाथ ताकवाले | Nashik

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सप्तश्रृंगी देवी (Saptasrungi Devi) दर्शन हे वर्षभर गर्दीने गजबजलेले असते.

यंदा तर करोना (corona) हटवल्यामुळे गडावर नवरात्रोत्सवात (navratrotsav) भाविकांची मांदियाळी एवढी होती की, प्रशासनाला गडावर घाटातून भाविकांना जाण्यासाठी खासगी वाहनांना नेहमीप्रमाणे प्रतिबंंध करून फक्त एसटी महामंडळाच्या (ST Corporation) गाड्यांना मुभा देण्यात आलेली होती.

एसटीच्या बसेसमधून (buses) गडावर प्रवाशी वाहतूक (passenger transport) करताना नाशिक (nashik) विभागातील सर्व आगारातील गाड्यांची जमवा-जमव करून भाविकांना देवदर्शन घडवण्याची सुविधा प्रशासनाने केली. तसेच वाहतुकीतील खोळंबा टाळण्यासाठी वाहनांची थांबण्याची व्यवस्था नांंदूरी (nanduri) गावाच्या हद्दी करण्यात आलेली होती.

त्यामुळे गडावर दहा किलोमीटर घाटातून वाहतूकीचा एकमेव पर्याय म्हणून एसटीच्या गाड्यांना प्रशासनाने परवानगी दिलेली होती. पण, ही परवानगी देताना भाविक, प्रवाशांच्या सुरक्षेची किती काळजी प्रशासनाकडून घेतली गेली, त्यात एसटी महामंंडळाच्या (ST Corporation) गाड्याची सक्षमता किती खात्रीशीर आहे, याकडे दुर्लक्ष केल्याचे यंदाच्या नवरात्रात आले.

भाविकांना गडावर जाताना एसटीच्या जुनाट गाड्यांमध्ये बिघाड होऊन त्या मार्गातच बंद पडण्याच्या आणि त्यामुळे मनस्ताप सहन करण्याचा अनुभव आला. ऐन नवरात्रात गर्दीचा उच्चांक असताना एसटी सेवकांनी खासगी वाहनचालकांच्या अरेरावीमुळे गाड्या बंद ठेवून संप करण्याचा प्रकारही भाविकांच्या सहनशीलतेचा कडेलोट करणारा ठरला. पण त्यावर वरकडी म्हणजे, कोजागिरीच्या पार्श्वभूमी गडावर एसटी बस (ST Bus) पेटून भस्मसात झाली.

या गाडीतून भाविकांची संख्या अधिक होती. रस्त्यातच गाडी पेटल्याने त्यांंना भर दिवसा आकाशात तारे दिसले. सुदैवाने जिवित हानी झाली नाही, पण एसटीच्या जुनाट गाड्यांंची गडावरील घाटात वापर करण्याची मर्यादा किती संपली आहे, याचा प्रत्यय मात्र आला. यानंतरही एसटी महामंडळ जुन्याच गाड्या गडावर वापरून भाविकांच्या जीवाशी असेल, तर ही बेपर्वाई कोणाची जबाबदारी असेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गडावर चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सव (navratrotsav) तसेच कोजागिरी पौर्णिमा उत्सव (Kojagiri Purnima festival) या कालावधी यात्रा नियोजन करताना जिल्हा प्रशासन सुमारे 24 शासकीय विभागाच्या प्रमुखांची नियोजन बैठक घेऊन भाविकांना केंद्रस्थानी ठेवून सोई-सुविधा, सुरक्षित वाहतूक (Safe transportation), कायदा सुव्यवस्था (law and order), पर्यावरण (environment) आदी बाबींचा विचारपूर्वक ऊहापोह जातो. भाविकांची वाहतुक करण्याचा एकमेव पर्याय हा एसटी महामंडळ असतो.

यासाठी एसटीच्या विभागीय नियंत्रकांंना गाड्यांची व्यवस्था करून त्या गडावर सज्ज करण्याचे सूचीत केले जाते. त्याचबरोबर नांदूरी आणि गडावर तात्पुरते बसस्थानके उभारून तेथे प्रवाशांची ने-आण करण्याचे नियोजन असते. घाटात खासगी वाहनांमुळे वाहतूकीचा खोळंबा नको, आणि घात-अपघात टाळण्यासाठी ही व्यवस्था असते.

कळवण, पेठ, लासलगाव, दिंडोरी, नाशिक, पिंपळगाव, मालेगाव आदी आगारातून बसगाड्यांची जमवा-जमव करावी, असे त्या-त्या आगारांच्या प्रमुखांंना जबाबदारी दिली जाते. आगारांच्या इतर मार्गावरील फेर्‍यांशिवाय गडावर यात्रेसाठी बस देताना सर्व गाडयांची चाचपणी करावी लागते. त्यानंतर गाड्यांची देखभाल दूरूस्ती, तांत्रिक निगा आणि कागदोपत्री सोपस्कार करून गाड्या गडावर भाविकांच्या वाहतूकीसाठी रवाना केल्या जातात.

गत काही यात्राकाळात गाड्यांमध्ये ऐन घाटात बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात या गाड्या जुन्या आणि कालबाह्य झालेल्या असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे या गाड्यातून भाविकांंना प्रवाश करतान बिघाड होऊन ऐन घाटात अडकून पडावे लागते. त्यात गाडी रस्त्याच बंद पडल्याने वर्दळीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होण्याची भिती असते.

नागमोडी जुन्या गाड्यांची वहनशक्ती खालावत असल्याने प्रवाशांच्या पोटात भितीचा गोळा उठतो. त्यामुळे हा प्रवाश नकोशा वाटतो. गाड्याची तांत्रिक अडचण प्रवाशांच्या जिवावर बितू शकते, याची झलक गडावर काल पेटलेल्या घटनेतून दिसून आली आहे, त्यामुळे प्रशासन एसटीची व्यवस्था करताना भाविकांच्या सुरक्षेची खबरदारी कटाक्षाने घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com