
लखमापूर । राजेंद्र जाधव | Lakhmapur
दिंडोरी तालुक्यात (dondori taluka) गेल्या आठदिवसांपासुन पावसांचा हाहाकार सुरु होता. त्यामुळे शेती कामे, जनजीवन, व व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर विपत्ती निर्माण झाली होती. परंतु आता पावसाने थोड्याफार प्रमाणात विश्रांती घेतल्याने सर्वाची आपआपल्या कामांची लगीनघाई सुरु झाली आहे.
यंदा तालुक्यात जवळपास एक ते दिड महिना पावसांला (rain) सुरुवात झाली. परंतु यंदा पहिल्याच्या पावसाने तालुक्यातील धरणे (dam) मनसोक्त भरून दिल्याने शेतकरी (farmers) वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज जवळजवळ आठदिवसानंतर दिंडोरीकरांना सुर्यदर्शन घेण्याचा योग मिळाला.आता पावसांचा जोर ओसरल्याने शेतकरी वर्गाची खरीप हंगामातील (kharif season) पेरणीची एकच गर्दी उठाली आहे.
त्यासाठी बळीराजां पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे खरेदीची घाई करीत असुन दुसर्या टप्प्यातील पाऊस येई पर्यंत पेरणी कशी पुर्ण होईल. याचे नियोजन करण्यात शेतकरी (farmers) वर्ग व्यस्त झाला आहे. यंदा खरीप हंगामांला (kharif season) उशीरा सुरुवात झाल्याने कमी कालावधीत कोणते पिक लवकर येईल यांचा अंदाज घेऊन शेतकरी पेरणीचे नियोजन करीत आहेत. यंदा पाऊस मुबलक प्रमाणात पडल्याने जमिनीत ओल चांगल्या प्रतिची आहे. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगाम पेरणीक्षेत्रात मका, सोयाबीन, भुईमूग, आणि भात पिकांचे क्षेत्र वाढणार असे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
साचलेल्या पाण्याची आडकाठी
गेल्या आठ दिवसांपासुन तालुक्यात पावसांने आपले रौद्र रूप दाखवल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी करून टाकले. व प्रत्येक शेतकरी वर्गाच्या शेतीत सध्या वावरांना तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. आता पावसाने विश्रांती घेतली पण शेतातील साचलेले पाणी शेतातुन बाहेर काढतांना मात्र बळीराजांची चांगलीच दमछाक होत आहे.
पेरणीतील कल
मका 65.00 %
सोयाबीन 60.00 %
भुईमूग 40.00 %
भात 70.00 %
इतर पिके 50.00 %
भाजीपाला 40.00 %