नव्या पोलीस आयुक्तांपुढे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

नव्या पोलीस आयुक्तांपुढे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक शहराच्या (nashik city) पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naiknavare) यांनी पदभार स्वीकारला. मात्र नाशिक शहरातील संघटित गुन्हेगारी (crime) रोखण्यासह कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित ठेवणे हे त्यांच्यापुढे आव्हान आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी त्यांच्या कार्यकाळात नाशिक शहरासाठी विविध उपक्रम राबवले व बरेच अध्यादेश देखील जारी केले. अवैध धंद्यांबाबत कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत हे सर्वप्रथम नाशिककरांना पटवून दिले. पोलिसांच्या तसेच नाशिककरांचे स्वास्थ्य निट रहावे, याकरिता ग्रिन ज्युस (Green juice) बनवून त्याची रेसिपी नाशिकरांना सांगितली.

संघटित गुन्हेगारी (crime) रोखण्यासाठी मोक्का या कायद्याचा वापर करून आनंदवल्ली (Anandavalli) येथील मंडलिक खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार रिम्मी राजपूत याच्यासह त्याच्या सहकार्‍यांवर कारवाई करत थेट तुरुंगात टाकल्याने शहरात काही अंशी संघटित गुन्हेगारीवर वचक बसला. त्यानंतर गुन्हेगार सुधार मेळावा घेऊन गुन्हेगारांना सुधरण्याची संधी दिली. त्यानंतर नाशिकचे नाव संपूर्ण भारतात (india) हेल्मेट (Helmet) वापराकरिता मोठे व्हावे, याकरिता हेल्मेट सक्तीची मोहीम राबवली.

त्यानंतर मात्र शहरात होणार्‍या सर्वच कार्यक्रमांसाठी मग ते लग्न कार्य का असेना त्याकरिता पोलीस आयुक्तांची परवानगी अनिवार्य (Permission is mandatory) केल्याने नाशिककरांचा त्यांच्या बाबत रोष वाढत गेला. त्यानंतर महसूल अधिकार्‍यांचे (Revenue officials) दंडाधिकारी पद (Magistrate's post) काढून घेण्याकरिता पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र व त्यानंतर भोंग्यांबाबत परिपत्रक काढले. पांडेय यांनी घेतलेले सर्व निर्णय हेच नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासमोर आव्हान आहे.

सध्या नाशिक शहरात भर दिवसा सोनसाखळी चोरी, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चोरी, भुरट्या चोर्‍या, दररोजच विविध गटांमध्ये होणार्‍या हाणामार्‍या यामुळे नाशिक शहराची (nashik city) शांतता भंग झाली असतांना मनसेना पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविण्याकरिता अल्टिमेटम दिल्याने तत्कालीन आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांसाठी परवानगी घेण्याचा अध्यादेश जारी केला होता.

त्यानुसार आता नवनियुक्त पोलीस आयुक्तांसमोर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये, याकरिता त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आगामी काळात मनपा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरवात होणार आहे. मनपा निवडणुकांमध्ये शांतता कशी ठेवता येईल व सध्याचे जातीय वातावरण बघता त्यावेळी राजकारण्यांची दिशा काय असेल व त्याकरिता पोलिसांना काय भूमिका घ्यावी लागेल, हे देखील महत्वाचे आहे.

सर्वसामान्य नाशिककरांना नाशिक शांत हवे आहे. महिलांना व मुलींना घराबाहेर जातांना आपण सुरक्षित आहोत याची शास्वती वाटली पाहिजे. वाहन चालकाला आपण गाडी लावत असल्याचे ठिकाण सुरक्षित आहे असे वाटले पाहिजे. नवनियुक्त पोलीस आयुक्तांसमोर आव्हाने तर खूप आहेत मात्र नाशिककरांचा रोष न पत्करता कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.