Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedसंगीत : भारतीय संगीतासाठी नवीन दालनं उघडणार

संगीत : भारतीय संगीतासाठी नवीन दालनं उघडणार

: डॉ. आशिष रानडे

करोना आणि लॉकडाउनचा भारतीय संगीत क्षेत्रावर देखील परिणाम झाला. तथापि भारतीय संगीत आव्हानांवर मात करण्याची ताकद देते. या काळाने पारंपरिक भारतीय संगीताला, कलेला आणि मनोरंजन क्षेत्राला नवे वळण दिले. आगामी 25 वर्षात या सर्व क्षेत्रांमध्ये नाशिक कसे कसे बदलेल?

- Advertisement -

भारतीय संगीत हे त्याच्या अभिजाततेसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये आयुर्वेद, निसर्गचक्र, रागांचे शास्त्रशुद्ध सादरीकरण, त्याचा योग्य वेळेला वापर, अश्या सगळ्याच पैलूंचा अभ्यास करण्यात आला आहे. गुरुकुल पद्धतीनुसार गुरूच्या सहवासातून, शिष्याकडे परावर्तित होणारी अशी ही गुरुमुखी विद्या. यात गुरू कडे राहून, त्यांच्याकडे जाऊन विविध पैलूंचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास, घराण्याची विशेष तालीम आणि एक कलाकार म्हणून परिपूर्णता याच टप्प्याने भारतीय संगीत चालत आलय.

पुढे महाविद्यालय, मग सांगीतिक अभ्यासक्रम, युवा महोत्सव, स्पर्धा, online हे सगळंच कलाकारांना घडवण्यासाठी मदत करत आहेत. मात्र कोरोना… या एका घटकामुळे संगीताची शिक्षणपद्धती, सादरीकरण पद्धतीच बदलणार आहे असं चित्र आहे. आता पुढचे 25 वर्ष संगीत क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत ते पाहू.

1. ऑनलाईन शिक्षण : यापुढे गुरूंबरोरचा प्रत्यक्ष सहवास कमी होऊन ऑनलाईन सहवास वाढणार आहे आणि त्याद्वारे जास्तीत ज्ञानप्राप्तीची संधी मिळणार आहे. जगातून कुठेही, कुणाही कडून व्यवस्थित शिक्षण घेता येऊ शकेल. ज्यामध्ये आधी अनेक मर्यादा होत्या, त्या असणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना किंवा शिष्याना सर्व साधनांच शिक्षण म्हणजे इलेक्ट्रॉनिक तानपुरा, तबला, याच ज्ञान असणे आवश्यक होणार आहे. हे जर ज्ञान असेल तर संगीत शिक्षणासाठी हा सुवर्णकाळ ठरू शकेल.

2. ऑनलाईन सादरीकरण : ऑनलाईन संगीत मैफिली. अर्थात ऑनलाईन संगीत मैफिलीना प्रत्यक्ष प्रेक्षक असण्याचं जे वातावरण असत ते मिळणं शक्यच नाही पण तिकीट बुक करून सभागृहात जाऊन एखाद्या कलाकृतीचा आनंद घेण्यापेक्षा स्वतःच्या घरी बसून, आपल्या आवडत्या कलाकाराना ऐकणं, पाहणं हा अतिशय वेगळा अनुभव असणार आहे. अर्थात या अनुभवात दर्जेदार रसिकांची खरी कसोटी आहे कारण कार्यक्रम किती वेळ सलग ऐकायचा की थोडे ऐकून थांबवायचा हे संपूर्णपणे रसिकांच्या हातात असणार.

3. ऑनलाईन कार्यशाळा, स्पर्धा : एका कार्यक्रमाच आयोजन करण मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे हे आता खूप सोपं झालं आहे. तज्ञांच मार्गदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्र इत्यादी अतिशय सहजपणे आयोजित करता येणं शक्य आहे. अंतर आणि प्रवास हे दोन फार मोठे मुद्दे कोविड च्या परिस्थितीमुळे जणू सोडवले. जगातून कुठल्याही कलाकारांचं मार्गदर्शन घरबसल्या हव्या त्या विषयावर मिळणं आता सोपं झालं आहे.

परिस्थितीमुळे जेव्हा एखाद्या कलेच स्वरूप बदलत अस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तेव्हा ते बदलत स्वरूप आपल्याला खूप नव्या संधी उपलब्ध करून देत असत. हे बदललेलं स्वरूप बर्यापैकी online पद्धती कडे झुकणार आहे. अभिजात कलेला नवीन online connectivity ची जोड द्यायला सांगणार आहे तेव्हा नवीन पिढीला त्यांच्या संगीत साधनेसोबत जगाच्या कानाकोपर्यात अगदी सहज पोहोचण्याची फार मोठी संधी यातून तयार होते आहे.

मात्र ही संधी तयार होत असताना आपला कल फक्त प्रसिद्धी कडे, लोकांपर्यंत पोहोचण्याकडेच तर होत नाहीये ना याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. कारण शिष्यांची तालीम जर योग्य सुरू असेल तर स्वतः ची तालीम, त्यावर वर्षानुवर्षे चालणार चिंतन, अभ्यास, गुरूंशी सुरू असणारी चर्चा ही मात्र त्याच दर्जाने कायम ठेवण्याची जबाबदारी ही नवीन पिढीवर आहे. तेव्हा हा समतोल राखण प्रत्येक कलाकाराला करावं लागणार आहे.

गायक स्वतः एक online : गायक हे एक परिपूर्ण online असण्याची गरज नक्कीच आहे. गायकाला स्वतः ची तालीम यासोबत, तंत्रज्ञानाची उत्तम जोड, त्याची माहिती, लोकांशी संवाद साधण्याची कला, आपलं गाणं घरी बसून लोक किती चांगल्या प्रकारे ऐकतील, लोकांना काय आवडेल; काय नाही आवडणार, internet ची fastest connectivity आणि इतर बर्याच गोष्टीच ज्ञान असणं क्रमप्राप्त झालं आहे . येणारा 25 वर्षाचा काळ हा भारतीय संगीतासाठी अनेक नवीन दालनं उघडणार आहेत हे नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या