Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवेब भविष्यातील नवीन परिमाणे

वेब भविष्यातील नवीन परिमाणे

: ओमकार वाळिंबे

वेबसाईटस्मुळे आपण घरबसल्या जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचू शकतो आणि हे सर्व शक्य आहे वेबसाईट डेव्हलपर्समुळे.डब्ल्यू3सी कडून एचटीएमएल (एचटीएमएल 5) आणि सीएसएस (सीएसएस 3), नवीन जावास्क्रिप्ट, एपीआय ही नवीन परिमाणे अस्तित्वात आल्यामुळे याचा वापर सर्वांना करता येणे शक्य झाले.

- Advertisement -

एकेकाळी व्यवसाय सुरू करणे म्हणजे दुकान अथवा स्थायी मालमत्ता घेऊन तिथे आपला कारभार सुरू करणे असा काहीसा समाज होता. व्यवसाय कुठे आहे याला एक पत्ता असणे गरजेचे होत. पण गेल्या दोन दशकांत हाच पत्ता स्थायीवरून आभासी म्हणजेच व्हर्चुअल झाला, ज्याला आपण म्हणतो वेबसाईट.

आज वेबसाईटस्मुळे आपण घरबसल्या जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचू शकतो आणि हे सर्व शक्य आहे वेबसाईट डेव्हलपर्समुळे. जसा स्थावर मालमत्ता किंवा दुकान बांधायला सिव्हिल इंजिनिअर गरजेचा असतो त्याच प्रकारे वेबसाईटसाठी वेब डिझायनर गरजेचा असतो.स्वतःकडे उपलब्ध असलेल्या कौशल्याचा वापर करून ऑनलाईन वेबसाईट/पोर्टल तयार करणे आणि त्यानंतर त्याची देखभाल करण्याला वेब डिझायनिंग असे म्हणतात.

वेब ग्राफिक डिझाईन, इंटरफेस डिझाईन, युजर एक्सपिरीअन्स डिझाईन आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इत्यादी आणि याचसारख्या काही बाबी वेब डिझायनिंगमध्ये समाविष्ट आहेत. या प्रत्येक पातळीवर वेगवेगळया व्यक्तींकडून कामे केली जातात. वेब डिझायनरला ग्राहकांच्या मनात येणारे प्रश्न कोणते असतील याचा दूररर्शीपणा असणे आवश्यक आहे.

त्यातूनच ग्राहकांना मदत करणारे आणि विविध व्यक्ती किंवा संस्था यांचे प्रश्न सोडवू शकणारे संकेतस्थळ किंवा वेबसाईट ते साकारू शकतात.इंटरनेटशिवाय हलते ग्राफिक्स, टायफोग्राफी, संगीत इत्यादी गोष्टींची कल्पना करता येणे अशक्य आहे. हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झालेला आहे.

वेब आणि वेब डिझाईनची सुरुवात

1989 मध्ये टीम बर्न्सस-ली यांनी सीईआरएन या संस्थेमध्ये काम करत असताना वर्ल्ड वाईड वेब तयार केले. जे नंतर सर्व जगात वापरले गेले. 1991 – 1993 च्या दरम्यान संपूर्ण जगात वापरता येण्यासारख्या अनेक वेबसाईट तयार झाल्या. त्याकाळात साध्या ओळींनी बनवलेले ब्राऊझर वापरून पानांवरील मजकूर बघता येत होता.

1993 मध्ये मार्क र्न्डसीन आणि एरिक बिना यांनी तयार केलेल्या मोझॅक ब्राऊझरमुळे पूर्वी बनवण्यात येणार्‍या आवाजाशिवाय आणि ग्राफिकशिवायच्या ब्राऊझरचे जग संपूर्णपणे बदलून गेले. 1994 मध्ये तयार झालेल्या डब्ल्यू3सी या तंत्रामुळे जावा स्क्रिप्ट, एचटीएमएल, कॅसकॅडिंग यांसारख्या संपूर्ण जगात वापरता येण्यासारखे ब्राऊझर तयार झाले.

वेब डिझाईनिंगमधील क्रांती

1996 च्या सुमारास मायक्रोसॉफ्टने पहिले स्पर्धात्मक ब्राऊझर तयार केले. यानंतर वेब डिझायनिंगमध्ये क्रांती घडून अनेक ब्राऊझर तयार करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा घडू लागली. 1996 मध्ये सुधारित झालेल्या फ्लॅश या तंत्रज्ञानामुळे ब्राऊझरची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली आणि साईट विकसित करण्यासाठी याचा खूप उपयोग झाला.

पहिल्या बॉऊझर युद्धाची समाप्ती

2000 मध्ये मायक्रोसॉप्टने विकसित केलेल्या इंटरनेट एक्सप्लोररमुळे नेटस्केपसारख्या कंपनीची मायक्रोसॉप्टबरोबर असलेली स्पर्धा संपुष्टात आली आणि नेटस्केपला या युद्धातून माघार घ्यावी लागली. इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राऊझरमुळे मायक्रोसॉप्टची वेब डिझायनिंगच्या क्षेत्रामधील मक्तेदारी कायम राहिली.

2001-2020

21 व्या शतकाच्या सुरुवातीस वेबच्या तंत्रज्ञानामध्ये जसजसे बदल होत गेले तसतसे लोकांच्या आयुष्यामध्ये वेबचे महत्त्व आणि रोजच्या आयुष्यतला वापर हा वाढत गेला आणि वेबसाईट हा रोजच्या जीवनाचा अविभाज्या भाग झाला.

मॉर्डन ब्राऊझर

मायक्रोसॉप्ट इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा चांगल्या प्रतीचे नवीन ब्राऊझर क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स अस्तित्वात आल्यामुळे त्यांच्यामधील स्पर्धा कमी झाली आणि हळूहळू इंटरनेट एक्सप्लोर हे या स्पर्धेत बाजूला झाले.

भविष्यातील नवीन परिमाणे

डब्ल्यू3सीकडून एचटीएमएल (एचटीएमएल 5) आणि सीएसएस (सीएसएस 3), नवीन जावा स्क्रिप्ट, एपीआय ही नवीन परिमाणे अस्तित्वात आल्यामुळे याचा वापर सर्वांना करता येणे शक्य झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या