Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवाहन उद्योगांंपुढील नवीन आव्हाने

वाहन उद्योगांंपुढील नवीन आव्हाने

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

नाशिकच्या (nashik) उद्योग क्षेत्र (Industry sector) हा ऑटो इंजिनीअरिंग हब (Auto Engineering Hub) म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

या ठिकाणी अभियांत्रिकी उत्पादने (Engineering products) व वाहनाला आवश्यक असणारी उत्पादने मोठ्या प्रमाणात केली जातात. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) या उद्योगामुळे नाशिकच्या उद्योगक्षेत्राला मोठी गती मिळाली आहे. काही अंशाने नाशिकच्या उद्योगक्षेत्राची रक्तवाहिनी म्हणून महिंद्रा कडे पाहिले जाते.

गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगचा (Global warming) मोठा फटका उद्योगक्षेत्राला बसत आहे मध्यंतरी बी एस फोर (BS Four) व बी एस सिक्स इंजिन प्रणालीचा वापर आल्याने अनेक उद्योगांना आपली उत्पादन प्रक्रिया बदलावी लागली होती. बोश उद्योग समूहाला त्यांच्या प्रमुख उत्पादन प्रक्रियेला फाटा देत नवीन प्रणाली हाताळण्यास प्रारंभ केला आहे. डिझेल इंजिन (diesel engine) ला लागणारे कॉमन रेल इंजेक्टर (Common rail injector) बनवणार्‍या बॉस उद्योगाला आपले उत्पादनच बंद करावे लागले. त्यामुळे अनेक उद्योगांना मनुष्यबळ कपातीचा झटकाही सोसावा लागला होता.

यातून उद्योग क्षेत्र काही अंशाने सावरत असतानाच गगनाला भिडणार्‍या इंधनाला पर्याय म्हणून विजेवर चालणार्‍या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती (Electric vehicle manufacturing) उद्योगांना केंद्रासह राज्य शासनाच्या प्रोत्साहन दिले आहे देशभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicle) संख्या वाढू लागली आहे. केवळ संख्या वाढत नसून उत्पादकही वाढू लागले आहेत अनेक प्रस्तापित वाहन उद्योग देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिर्ती करु लागले आहेत.

त्यांच्या निर्मितीकडे वळले आहेत. टीव्ही संच निर्मिती करणार्‍या सोनी हा उद्योगही ईलेक्ट्रिक कार निर्मितीचा प्रकल्प (Electric car manufacturing project) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडी उत्साहवर्धक असल्या तरी उद्योग क्षेत्रासाठी एक आव्हानात्मक आहेत येणार्‍या काळात उद्योगक्षेत्राला खुप काही तयारी करावी लागणार आहे आतापर्यंत उद्योगाने पेट्रोल व डिझेलवर चालणार्‍या वाहनांची सुट्टे भाग बनवले होते.

आता मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया बदलली जात आहे. खरंच उद्योजक उद्योग यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी पूर्व तयारी केल्याचे दिसून येत नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांच्या निर्मितीला चायनाहून येणार्‍या चिप्सच्या तुटवड्यामुळे उत्पादन प्रक्रिया संथ करावी लागली होती.

त्यामुळे येणार्‍या काळात या चीपवर इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मदार अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने ही तयारी करण्याची गरज असून, वाहन उद्योग निर्मितीला व त्याचे सुटे भाग बनवणारे उद्योगांना नव्या दिशेने तयारी करावी लागणार आहे. यासाठी नवे स्त्रोत, नव्या संकल्पना, नव्या अभ्यासाची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या