Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवन विभागाकडून निसर्ग पर्यटनाला मुहूर्त लागेना

वन विभागाकडून निसर्ग पर्यटनाला मुहूर्त लागेना

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

जंगलातील (foress) प्राणी (Animals), पक्षी (birds), वनस्पती (Plants) आणि निसर्गदर्शन होण्यासाठी नाशिक दर्शनच्या (Nashik Darshan) धर्तीवर निसर्ग पर्यटनासाठी (Nature tourism) बससेवा (bus service) सुरू करण्याचा मानस वनविभागाचा (Forest Department) असला तरी त्याला मुहूर्त कधी सापडणार, हा प्रश्न कायम आहे.

- Advertisement -

नाशिक विभागाचे वनसंरक्षक (Forest Conservator of Nashik Division) (वन्यजीव) अनिल मोहन यांनी गेल्या जागतिक वनदिनानिमित्त (World Forest Day) वरील मानस व्यक्त केला होता. त्यानंतर पर्यटकांंच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, केवळ मानस व्यक्त करुन काहीही होत नाही, त्यासाठी ठोस पाठपुरावा आवश्यक असतो. शासकीय यंत्रणेच्या लालफितीच्या कारभरावर रामबाण उपाय शोधावा लागतो, तेव्हा कोठे मानस पूर्ण होतो. सध्या गिर्यारोहण (Mountaineering), जंगली प्राणी-पक्षी, औषधी वनस्पती (Herbs) यांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची (students) संख्याही वाढत आहे.

कळसूबाई (Kalsubai), भंडारदरा (bhandardara), नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar), रतनगड (ratangad), घाटघर (Ghatghar) येथे निसर्ग पर्यटन (Nature tourism) विकसित करण्याची गरज आहे. ‘शाळा (school), महाविद्यालये (college), सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जंगलाची माहिती भावी पिढीला दिल्यास कायमस्वरूपी उपयोग होईल. जंंगलांवरही ताण पडणार नाही, अशी काळजी घेऊन पाऊलवाटा तयार करून फलक लावणे, विशिष्ट क्षेत्राची निवड केल्यास नागरिकांच्या मनात जंगल आणि आदिवासी बांधवांविषयी आदराची भावना निश्चित तयार होईल. मुख्य म्हणजे आज आदिवासी दुर्गम भागात जो बेरोजगारीचा प्रश्न गहन होत चालला आहे. त्यावर एक चांगला उपाय सापडेल.

आदिवासी बांधवांना (tribal community) रोजगारासाठी निवडक जंगलात जाण्यासाठी प्रवेश फी, हॉटेल व्यवसाय, तसेच फिरण्यासाठी सायकली उपलब्ध करून दिल्यास सोय होईल. कळसूबाई, हरिश्चद्रगड अभयारण्य (Harishchandragad Sanctuary) परिक्षेत्रातील रतनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, कोकणकडा, अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर, घाटनदेवी, सामरथ येथील सांदण दरी, उंबरदरा येथील व्ह्यू पॉइंट, भंडारदरा अम्ब्रेला फॉल (धबधबा), धरण, रंधा फॉल, पावसाळ्यात नेकलेस फॉल, नानी फॉल, कातरूबाई फॉल,

नांदूरमध्यमेश्वर धरण (Nandurmadhyameshwar Dam) जलाशयाजवळ विविध पक्ष्यांसह फ्लेमिंगोचा (Flamingo) वावर, नांदूरमध्यमेश्वर मंदिर, खेडलेझुंगे येथील 111 फूट उंचीचा हनुमान मंदिर, दुगारवाडी धबधबा, हर्ष आणि वाघेरा किल्ल, भास्करगड ही पर्यटनासाठी निश्चित आवडणारी ठिकाणे आहेत. तेथे वनखाते व पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेेतल्यास निश्चितच प्रगती होईल. त्यासाठी अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मानस चांगला असला तरी त्याला कृतीची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या