Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनाशिकचे उद्योग क्षेत्र स्मार्ट होणार

नाशिकचे उद्योग क्षेत्र स्मार्ट होणार

उद्योग क्षेत्रात येत्या काळात अतिशय वेगाने विकास होणार आहे. अस्तित्वातील उद्योग आपल्या मनुष्यबळाचा कमीत कमी वापर व जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या आधारावर उत्पादन प्रक्रिया राबवतील. ‘सेल्फ एम्प्लॉईड’चे प्रमाण वाढणार आहे. आज बहुतेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. भविष्यात ‘बाईंग फ्रॉम होम’ ही कल्पना अस्तित्वात येऊ शकते…

कुणाल चंगराणी | नाशिक

- Advertisement -

उद्योग क्षेत्रात येत्या काळात अतिशय वेगाने विकास होणार आहे. अस्तित्वातील उद्योग आपल्या मनुष्यबळाचा कमीत कमी वापर व जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या आधारावर उत्पादन प्रक्रिया राबवतील. यासोबतच आयटी उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. उत्पादनाची व उत्पादकतेची गती मोठी राहणार आहे.

70 टक्के यंत्रणा अथवा तंत्रज्ञान आणि 30 टक्के मनुष्यबळावर उत्पादन घेतले जाईल. येणार्‍या काळात ‘सेल्फ एम्प्लॉईड’चे प्रमाण वाढणार आहे. आज बहुतेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेखाली काम करत आहेत. भविष्यात ‘बाईंग फ्रॉम होम’ ही कल्पना अस्तित्वात येऊ शकते.

उद्योगांना पतपुरवठा मिळवण्यासाठी आज बँकांच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत. येणार्‍या काळात ‘क्राऊड फंडिंग’ संकल्पना उदयास येऊ लागली आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या भिशी संकल्पनेप्रमाणे ती कार्य करते.

उद्योगांच्या कल्पनाशक्ती प्रचंड वेगाने विस्तारीत होण्याची शक्यता आहे. चालकाशिवाय वाहन नोटेशनवर निर्धारित स्थानावर पोहोचेल. ट्रकमध्ये लोड केलेल्या मालाचा अहवाल एकाच जागेवर मिळेल. कंपनीने पाठवलेल्या वाहनातील मालाची सगळी माहिती बारकोडमधून उपलब्ध होईल. चालकाशिवाय कार कार्यालयात जाऊ शकेल.

परदेशात झालेल्या संशोधनानुसार यंत्राने आपण वेगवेगळ्या सुगंधाचा आनंद घेऊ शकतो. कारखान्यांमधून बाहेर पडणारे कामगार स्वतःचा उद्योग स्थापन करून रोजगार देतील. भविष्यात कामगार चारचाकी वाहनांतून कामावर येतील. यातून स्मार्ट एम्प्लॉयमेंट, स्मार्ट प्रॉडक्शन प्रक्रिया दिसून येईल.

भविष्यातील उत्पादन दिवसांऐवजी तासावर होऊन वेतनही उत्पादनाच्या पट्टीवर मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामगार जबाबदारी ओळखून काम करेल. उद्योगांमध्ये कामगार संख्या 30 टक्क्यांवर येईल. पूर्वी यंत्राचे 30 टक्के तर 70 टक्के काम कामगार करत होते. आता हे गणित उलट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात यांत्रिक कामातून ‘झिरो एरर’च्या दृष्टीने वाटचाल सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या