Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनिवडणूक मनपाची, लक्ष विधानसभा, विधानपरिषदेकडे

निवडणूक मनपाची, लक्ष विधानसभा, विधानपरिषदेकडे

नाशिक । Nashik | फारूक पठाण

राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक (Municipal elections) नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. यामध्ये नाशिक मनपाचादेखील (Nashik Municipal Corporation) समावेश आहे. नाशिक मनपाची निवडणूक (election) सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची असली तरी या निवडणुकीत काही नेत्यांचे ‘लक्ष’ थेट विधानसभा व विधानपरिषद निवडणुकीवर (Assembly and Legislative Council elections) असल्याने त्या दृष्टीने देखील ‘नियोजन’ सुरू असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

सध्या प्रशासकीय पातळीवर प्रभाग आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून रचना जाहीर झाल्यावर अनेक ठिकाणी ‘राजकीय बॉम्ब’ फुटण्याची शक्यता आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Nationalist Congress Party) कमान एकहाती असली तरी सध्या मनपात पक्षाचे फक्त 6 नगरसेवक (corporator) आहे. तर पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) एकदा खासदार झाले, मात्र नंतर ती जागा दोन्ही भुजबळांना परत घेता आली नाही.

जिल्हा परिषदेवर (zilha parishad) तर भगवा फडकलेला आहे. यामुळे आता संपूर्ण लक्ष मनपा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत चमकदार कामगिरी करुन पक्षाचे अधिकाअधिक सदस्य मनपात पाठवण्याचे नियोजन राष्ट्रवादी करीत आहे. जिल्ह्यात येवल्यामधून भुजबळ तर नांदगांव (nandgaon) मधून मुलगा पंकज भुजबळ (pankaj bhujbal) आमदार होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत नांदगावची जागा देखील गेली.

त्या ठिकाणी निवडून आलेले शिवसेनेचे (shiv sena) आ. सुहास कांदे (mla suhas kande) सतत भुजबळ यांना ‘टार्गेट’ करीत असल्याने तोही एक वेगळा विषय चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा नांदगांवची जागा घेणे कठीण मानले जात असले तरी ‘आर्मस्ट्राँग’ (Armstrong) असलेल्या भुजबळांसाठी ‘अशक्य’ काही नाही, असे बोलले जाते. म्हणून नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी आता मनपा निवडणूक महत्वाची बनली आहे.

मात्र यासाठी पक्षाच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी कसून कामाला लागण्याची गरज असताना तसे चित्र अद्याप दिसत नाही. शहरात निवडणूक होणार असली तरी शहराध्यक्ष ‘अ‍ॅक्टिव्ह’ मूडमध्ये दिसत नाही. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी ‘ग्राऊंड’ वर त्याची तयारी मात्र दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मनपा निवडणुकीची तयारी सध्या तरी शिवसेना (shiv sena) पक्ष आघाडीवर दिसत आहे. गत एक वर्षात पक्षाने जोरदार काम करुन इतर पक्षांमध्ये देखील ‘सुरुंग’ लावल्याचे दिसत आहे.

यासाठी ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत (mp sanjay raut) जोमाने काम करीत आहे. करोनाची पहिली लाट संपल्यानंतर खा. राऊत यांनी नाशिक दौरा करुन भाजप प्रदेश पदाधिकारी असलेले व पूर्वीचे कट्टर शिवसैनिक माजी आ. वसंत गिते (vasant gite) व सुनील बागुल (sunil bagul) या दोघांची ‘घर वापसी’ करून घेत भाजपला (bjp) मोठा धक्का दिला. यानंतर सतत त्यांनी दौरे करून पक्षातील गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करीत बर्‍यापैकी ती कमी केली.

शहराध्यक्षपदी अभ्यासू नगरसेवक मानले जाणारे व संघटन कौशल्य असलेल्या सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) यांची नेमणूक केली. यानंतर शहरात संघटन मजबूत करण्यास सुरुवात अधिक गतीने सुरू झाली. रक्तदान शिबिरे, करोना काळात मदत, शिवभोजन असो की लसीकरण अशा सर्व कामांमध्ये शिवसैनिक अग्रसेर दिसले. खा.राऊत यांना भेटणार्‍यांमध्ये इतर पक्षातील नेत्यांचा देखील समावेश असतो.

मात्र त्यांचा प्रवेश कधी होणार याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात येते. नाशिक मनपाची सत्ता काबीज करण्यासाठी पक्षाच्या वतीने कोअर कमिटी तयार करण्यात आली असून यामध्ये ज्येष्ठ व युवा यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहे. तर 2023 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे काही नेत्यांची आतापासून नजर असल्याने त्या दृष्टीने कामाला लागल्याचे दिसत आहे.

सेनेचे काम व संघटन दिवसेंदिवस भक्कम होताना दिसत असल्याने मनपात सेनेच्या सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही इतर पक्षांचे नेते विधान परिषदेसाठी सेनेकडून ‘फिल्डिंग’ लावत असल्याची चर्चा आहे. यामध्ये मनपातील भाजप पदाधिकारी यांच्या नावाचा उल्लेख देखील काही जण करीत आहे. त्याचप्रमाणे मनपात सदस्य वाढल्यावर विधानसभा निवडणूक देखील काहीशी सोपी होणार, हे नक्की असल्याने माजी आमदार त्या दृष्टीने कामाला लागले आहे.

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनेकडून निवडून आलेले ज्येष्ठ नेते वसंत गिते यांचा 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला. यानंतर ते भाजपात गेले, मात्र 2019 साली झालेल्या निवडणूक त्यांना ऐनवेळी मध्य नाशिकमधून उमेदवारी नाकारण्यात येऊन आ.देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्या निवडूनही आल्या. 2020 च्या सुरुवातीला गिते यांनी मिसळ पार्टी आयोजित करुन सर्वपक्षीय नेत्यांची गर्दी गोळा करीत आपली ताकद दाखवून दिली व यानंतर काही दिवसांनीच ते पुन्हा आले.

आता 2024 साली होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी मध्य नाशिकमधून सेनेचा उमेदवार गिते असण्याची चर्चा असल्याने त्यांच्यासाठीही मनपात आपले जास्त सदस्य रवाना करणे महत्वाचे झाले आहे. त्याचप्रमाणे सत्ताधारी भाजपा, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांनी देखील पूर्ण शक्तीसह मनपा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे.

मनसेनेची कामान यंदा युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे असणार आहे. तर शहराध्यक्षपदी मनपा कामकाजाचा अभ्यास असणार्‍या दिलीप दातीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दुसरीकडे धडाडीचे युवा नेते म्हणून परिचीत अंकुश पवार यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बढती देत जिल्हाप्रमुख केल्याने मनसैनिकांमध्ये जोश वाढल्याचे दिसत आहे. एकूण पाहिले तर यंदाची मनपा निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची ठरणार आहे.

फडणवीसांनी दाखवला होता झेंडा, पंकजाताईंनी केला प्रवास

2017 सालच्या मनपा निवडणूक प्रचारात त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. तर मनपात भाजपची एकहाती सत्तादेखील आली. शहर बससेवा मनपाच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन भाजपने पूर्ण केल्यानंतर 8 जुलै 2021 रोजी याचे उद्घाटन फडणवीस यांच्याच हस्ते झाले.

कालिदासमध्ये सोहळा झाल्यावर बाहेर येऊन त्यांनी बसला झेंडा दाखवत सुरुवात केली होती, तर नुकताच नाशिक दौर्‍यावर आलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट मनपा बसमधून प्रवास केल्याने फडणवीसांनी झेंडा दाखवला होता व ताईंनी प्रवास केला. अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या