Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपर्यटनासाठी नाशिक 'उत्तम डेस्टिनेशन'

पर्यटनासाठी नाशिक ‘उत्तम डेस्टिनेशन’

गेल्या काहीच वर्षांत नाशिकने केलेला ‘तीर्थाटन ते पर्यटन’ हा प्रवास उल्लेखनीय आहे. तीर्थस्थळ म्हणून नाशिकचे नाव कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे कायमच भारताच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून राहिले आहे.

पण अलीकडे निसर्ग पर्यटन, साहस पर्यटन, वीकएंड डेस्टिनेशन, वेलनेस टूरिझम व वाईन टूरिझम यांसारख्या पर्यटनाच्या इतर शाखांमध्येही नाशिकने नावलौकिक मिळवला आहे.

- Advertisement -

गेल्या काहीच वर्षांत नाशिकने केलेला ‘तीर्थाटन ते पर्यटन’ हा प्रवास उल्लेखनीय आहे. तीर्थस्थळ म्हणून नाशिकचे नाव कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे कायमच भारताच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून राहिले आहेच, पण अलीकडे निसर्ग पर्यटन, साहस पर्यटन, वीकएंड डेस्टिनेशन, वेलनेस टूरिझम व वाईन टूरिझम यांसारख्या पर्यटनाच्या इतर शाखांमध्येही नाशिकने बराच नावलौकिक मिळवला आहे.

नाशिकच्या देन प्रमुख नद्या… गोदावरी व गिरणा. शहराभोवतीची 13 मोठी आणि आठ मध्यम आकाराची धरणे, 25 ऐतिहासिक किल्ले, त्र्यंबकेश्वराजवळची पर्वत शिखरे, धबधबे आणि येथील सुखद हवामान या सर्वांमुळे पर्यटनाचा वेगवान विकास आपल्या शहराला प्राप्त झाला. त्यातच खूप सारे खासगी रिसॉर्टस् नाशिक परिसरात विकसित झाले आहेत. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात राहण्याची पर्यटकांची इच्छा आता पूर्ण होत आहे.

यंदा ‘करोना’ साथीमुळे पर्यटन ठप्प असले तरी एका छोट्याशा विरामानंतर नाशिकची पर्यटन घोडदौड चालूच राहील. मुंबईच्या पर्यटकांना एकेकाळी छोटी सुटी मिळाली तरी मुंबईकर मुंबई-पुणे मार्गावरील सृष्टीसौंदर्याकडे धाव घेत. माथेरान, खंडाळा, लोणावळा ही मुंबईकरांची आवडीची पर्यटन स्थळे असायची. पुणेकर व नाशिककरदेखील पूर्वी याच भागात पर्यटनाचे पर्याय शोधत असत. कालांतराने पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुविधांच्या मागणीमुळे या ठिकाणी व त्याच्या अवतीभोवती हॉटेल्स, रिसॉर्टस् व थीम पार्क्सची संख्या इतकी वाढली की निसर्ग कुठेतरी हरवून गेला.

मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही शहरांचा विस्तार वाढत जाऊन मुळातच गावाबाहेरील रस्ता छोटा झाला. त्यामुळे सगळी गर्दीमध्येच आणि महामार्गापासून आत फार कमी पोहोचून आनंद घेता येतील अशी ठिकाणे! पर्यायाने मुंबई आणि नाशिकचा पर्यटक पर्याय शोधू लागला. इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर या त्रिकोणात खूप मोठ्या क्षेत्रावर पसरलेले सृष्टीसौंदर्य दात्यांना दिसू लागले. हा परिसर क्षेत्र यादृष्टीने मोठा आहेच, पण या क्षेत्रात असलेली आकर्षणेदेखील संख्येत खूप आहेत.

कधी पिकनिक स्पॉट, कधी धबधबे, कधी किल्ल्यांवर ट्रेकिंगचा साहसी अनुभव, कधी धरणांच्या बॅकवॉटरचे नितळ-शांत सुख, कधी नांदूरमध्यमेश्वरचे आकर्षक पक्षी, कधी फ्लॉवर गार्डन, कधी अ‍ॅडव्हेंचर पार्क, कधी वायनरी व्हिजीट तर कधी वॉटरपार्कची धमाल! असे अनेक अनुभव एकाच दिशेने निघून घेता येणे शक्य झाल्याने आता मुंबई-नाशिकचे पर्यटक नाशिक परिसराकडे आकर्षित होऊ लागले आहेत. सरकारच्या प्रोत्साहनाने व खासगी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतून उभ्या झालेल्या आकर्षणामुळे व सर्व सुख-सुविधांनी सुसज्ज नवनवीन रिसॉर्टस्मुळे पर्यटकांना आता नाशिक हे टूरिझम हब म्हणून दिसू लागले आहे.

दिवसेंदिवस पर्यटकांची मागणी नाशिकसाठी वाढतच जाणार आहे आणि नजीकच्या भविष्यात नाशिककडे एक मोठे टूरिझम डेस्टिनेशन म्हणून पाहिले जात आहे. याचे प्रमाण आपल्याला शहरात येणार्‍या मोठमोठ्या हॉटेल चेनच्या हॉटेल्सच्या सुरू असणार्‍या बांधकामातून दिसते. बरेच आंतरराष्ट्रीय हॉटेल ब्रॅण्डस् लवकरच नाशिकमध्ये सुरू होत आहेत. नाशिक विमानतळ आणि जवळच असलेले शिर्डी आणि मुंबई विमानतळांमुळे मुंबईपलीकडूनदेखील पर्यटक नाशिककडे पर्यटनासाठी एक चांगला पर्याय म्हणून पाहू लागले आहेत.

नाशिकची वाईन भारतातल्या श्रीमंतांसाठी मोठे आकर्षण आहे. फ्लॉवर गार्डन, फूलपाखरू उद्यान, थीम पार्क्स या नवीन आणि कल्पक उपक्रमांत आलेले खासगी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित करू लागले आहेत. आता ही आकर्षणे अनुभवायला विदेशात जाण्याची गरज नाही. नाशिकसारख्या सहज पोहोचू शकणार्‍या ठिकाणी ती लिलया उपलब्ध आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या