चंद्रकांत भंडारी

कोरोना काळात सर्वांप्रमाणे मीही तसा अस्वस्थ होतो. मनात भीतीही होतीच. त्यावर मात करण्यासाठी घरातल्या घरात खाण्यापिण्यासह बायकोबरोबर काही बैठै खेळही ‘प्रयोग’ करुन पाहिले.

दुसरीकडे मी मी शिक्षणक्षेत्रात असल्याने काही शैक्षणिकि उपक्रमांवर आधारित 3 ते 4 मिनिटांपासून 10-12 मिनिटांपर्यंतचे व्हीडीओ बनवत तेही पालकांपर्यंत पोहचवून झाले वा व्हॉटसअॅपद्वारा काही लेखही दिले गेले. (आनंदाची गोष्ट म्हणजे हे सारे उपक्रम, मार्गदर्शनपर व्हीडीओ तब्बल 3 हजार पालकांसह विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पाहोचले) असो.

एकेदिवशी, म्हणजे ऑगस्ट महिन्यात 15 तारखेनंतर माझे ज्येष्ठ मित्र, मार्गदर्शक सुनील कर्णिक यांनी ग्लोबल टिचर पुरस्कार (2019) विजेत्या केनियन पीटर ताबीची याची एक छोटेखानी बातमी मला पाठवत ‘लिहा यावर थोडं’ असं सहज सुचवलं,. पुढे एक महिना मी पीटर ताबीची या प्रयोगशील शिक्षकाची माहिती मिळवत ती माझ्या पध्दतीने कागदावर उतरवू लागलो. हळूहळू त्या लिखाणाला पुस्तिकचिे स्वरुप येत गेले. या कामी मला जळगाव शहरातील कचरा-वेचक तसेच बाल-मजूर मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावे, यासाठी अहोरात्र झटणार्या प्रणाली व अद्वैत दंडवते यांची छानशी मदत झाली आणि नोव्हेंबर महिन्यात ‘पीटर ताबीची’ (...आग्रह जीवन शिक्षणाचा) हे पुस्तक जळगावच्या प्रशांत पब्लिकेशन्सतर्फे (छोटेखानी समारंभात) प्रकाशित झाले व जवळपास 200 शिक्षणप्रेमींपर्यंत पोहचत वाचले गेले.

‘कोरोना’ काळ काहीतरी नवं, तेही लिखाणाचं काम घेऊन येतोय व त्यासाठी माझी लेखणी पांढर्यांवर काळे करत पळतेय हे बघून मला अजून उत्साह, हुरुुप आला आणि तिथेच अर्धवट लिहिलेली ‘कंदीलकलब’ ही कादंबरी मी हाती घेत लिहू लागलो. या दरम्यान मान-पाठ दुखीचा, त्रास वाढत होता, त्यासाठी औषधोपचार सुरु होते. बाहेर कोरोनामुळे ज्यांना आपलं जीवन अर्थहीन झालेय असं सारखं वाटत होतं ‘त्या’ (साठीपार केलेल्या व्यक्तींशी वा वैतागलेल्या पालकांशी) व्यक्तींशी विविध विषयांवर संवाद सुरु होता. दररोजचं जगणं तसं (नोकरी करत असल्याने) व्यवस्थित सुरु होतं.

पण त्यात तशी धावपळ नव्हती. पण त्याच धावपळीत मी एकेदिवशी कंदीलकलबचं (अर्धवट) लिखाण वाचायला घेतलं आणि ज्या ज्या दिकाम्या जागा भरायच्या होत्या त्या भरत गेलो. म्हतणजे घटना-प्रसंगाची त्यात भर टाकत गेलो. हळूहहळू कादंबरी (तिला मी लघुकादंबरी म्हणतो) आकारास येऊ लागली. 100 पानांपेक्षा जास्तीचे लिखाण झाले. या दरम्यान पानांची जुळवाजुवळ, मजकुरात फेरबदल असे सुरु होते. साठीपार केलेल्या व माता मुलाबाळांच्या संसारात रमलेल्या पण तरीही कार्यरत असलेल्या कंदीलकलब मधील सात-सात भिंडूंचे (मित्रमैत्रिणींचे) व्यक्तिचित्र कागदांवर वेगवेगळ्या अँगलने उमटत होते.

चारयदोन महिन्याच्या ‘कोरोना काळात मी जवळपसा 600 ते 700 पानाचं (विविध विषयांवर) लिखाणं केलं होतं. कंदीलकलवच्या दरम्यान मी कृतज्ञतेची रोजनिशी नामक लिखाणही करत होतो (एका दिवाळी अंकासाठी त्यातील 5/6 लेखही पाठवित होतो) एकंदरीत लिखाणचे काम बर्यापैकी जोरात सुरु होते. नोव्हेंबरअखेर कदीलकलवचे लिखाण पूर्ण झाले. या जानेवारी महिन्यात ती (प्रशांत पब्लिकेशन्सतर्फे) प्रकाशित होईल. पण या 6/7 महिन्यात अर्थहीन जगण्यातला ‘अर्थ’ मी त्या लेखनाद्वारे जाणून घेतला. तेव्हा साठीपार केलेले माझे (थोडेसे भित्रे, घाबरलेले ) मन खरंच आनंदी झाले. याच दरम्यान मला एका (वेगळ्या) पुस्तकाचेही काम मिळाले, जे सध्या मी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

यात अजून एक गोष्ट.. लिखाण/वाचन करतांना शरीरासह हाती घेतलेला पेन खूपदा ‘साथ द्यायचा नाही. अशावेळी हिंदी-मराठी गाणी ऐकत, म्हणतत मी होणारा त्रास विसरायचो. मोबाईलवर नतोवाईंकांसहमित्र-मैत्रिणींशी बोलतं कंदीलकलवचं राहिलेलं लिखाण कसिं पूर्ण करता येईल याचंं (उगाचच) नियोजन करायचो. पण सारं (विसरत) व्हाचं ते लिखाण पूर्ण झालं!’