सर्व पक्षांसाठी मनपा निवडणूक प्रतिष्ठेची

सर्व पक्षांसाठी मनपा निवडणूक प्रतिष्ठेची

नाशिक | फारूक पठाण | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipality) निवडणुकीची (election) प्रशासकीय पातळीवर तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

आता फक्त तारखांची घोषणा होणे बाकी आहे. पावसाळ्यानंतर तसेच दिवाळीत (diwali) नाशिक महापालिकेची निवडणूक (election) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सर्व राजकीय पक्षांसाठी (Political parties) नाशिक महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार आहे.

नाशिक महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणुकीची (election) तयारी प्रशासकीय पातळीवर जोमाने सुरू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने त्या दृष्टीने तयारीला प्रारंभ केला आहे. महापालिकेत लवकरच स्वतंत्र आचारसंहिता कक्ष (Code of Conduct Room) सुरू होणार आहे, तर निवडणूक तसेच मतदान (voting) व मतमोजणी आदी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण दहा हजार अधिकारी व सेवक लागणार आहे. याबाबतची मागणी महापालिकेच्या वतीने इतर विभागांकडे करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे 2017 च्या निवडणुकीत साठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च आले होते, मात्र पाच वर्षात वाढलेली महागाई (inflation) व इतर कारणांनी यंदा 2022 च्या निवडणुकीसाठी तब्बल 15 कोटी रुपये निवडणुकीसाठी खर्च लागणार आहे. याबाबतची तरतूद अंदाजपत्रकात देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालय, वैद्यकीय,

दंत महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठ, एलआयसी, आयकर विभाग आदींकडे असलेल्या अधिकारी आणि सेवक यांची माहिती नाशिक महापालिकेने मागवली आहे. मुदतीत माहिती द्यावी अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यंदा एकूण अकरा नगरसेवक (Corporator) संख्या वाढली आहे. मागच्या वेळेला 122 नगरसेवक होते तर 2022 मध्ये एकूण 133 नगरसेवक राहणार आहे. शहरात यंदा त्रिसदस्यी प्रभाग रचना (Ward composition) करण्यात आली आहे.

यामुळे एकूण 43 प्रभाग हे त्रिसदस्यीय राहणार असून एक प्रभाग जो पंचवटी विभागात (Panchavati section) राहणार आहे तो चार सद्यस राहणार आहे. शहरात एकूण 44 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. करोनामुळे (corona) जनगणना (Census) झालेली नसल्यामुळे 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे पंधरा लाख 84 हजार लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे. दरम्यान मतदार संख्या यंदा वाढणार आहे. प्रशासकीय पातळीवर मतदार संख्या निश्चित झाली असून प्रभाग रचना अंतिम झाल्यावर त्याला जोडणी करून मतदार यादीत देखील घोषित होणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील सहाही विभागातील प्रभाग महापालिका प्रशासन जाहीर करणार आहे.

मतदान केंद्रावर अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची आवश्यकता भासणार असल्याने जवळपास 450 विविध शासकीय, निमशासकीय खासगी आस्थापनांना नाशिक महापालिकेने पत्र पाठवले असून तात्काळ त्यांच्याकडे असणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची यादी पाठवण्याची मागणी केली आहे. यामध्ये खाते प्रमुख यांचे नाव, मोबाईल नंबर, कार्यालयाचा ई-मेल आयडी तसेच सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जे आस्थापना प्रमुख या संदर्भात माहिती देणार नाही त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. दिव्यांग कर्मचारी वगळून ही माहिती दोन दिवसांत मेलवर किंवा प्रत्यक्षात द्यावी असेही म्हटले आहे.

मनपाचे 1500 सेवक

2017 च्या निवडणुकीत सुमारे चौदाशे मतदान केंद्र तयार करण्यात आले होते तर यंदा त्यात 200 नी संख्या वाढणार असल्यामुळे निवडणुकीसाठी एकूण सोळाशे मतदान केंद्रे असण्याची शक्यता असून यासाठी प्रत्येक प्रति मतदान केंद्रासाठी एकूण पाच अधिकारी आणि सेवक असतील. याप्रमाणे एकूण आठ हजार कर्मचार्‍यांची गरज आहे. तर दहा टक्के राखीव असे दोन हजार कर्मचारी असे मिळून दहा हजार अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. नाशिक महापालिकेचे सर्व शिक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी मिळून मनपाचे दीड हजार कर्मचारी निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com