Friday, April 26, 2024
HomeUncategorizedग्रीनफिल्ड महामार्गामुळे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क

ग्रीनफिल्ड महामार्गामुळे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क

नाशिक | Nashik

समृद्धी महामार्गानंतर (samruddhi highway) नाशिकच्या (nashik) दळणवळणाला बूस्ट देणार्‍या भारतमालांतर्गत ‘ग्रीनफील्ड महामार्ग’ (Greenfield Highway) संंकल्पनेनुसार सूरत-चेन्नई (Surat-Chennai) हा ग्रीनफील्ड महामार्ग (Greenfield Highway) नाशिक जिल्ह्यातून (nashik district) जाणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 609 गावांमधून जाणार्‍या या महामार्गासाठी 996 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. नाशिक-सूरत अवघे 176 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. 2022 पर्यंत भूसंपादन प्रक्रिया (Land acquisition process) पूर्ण करून 2024 मध्ये हा महामार्ग खुला करण्याचे नियोजन आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीे मुंबईत (mumbai) एका कार्यक्रमात नाशिकमध्ये एक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क (Multi-model logistics park) बनवण्याची घोषणा केली होती. नाशिक मध्ये आले असताना त्यांनी याबाबत चर्चा देखील केली होेती. नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने या योजनेला मदत करण्याचे आश्वासित केले होेते.

या पार्श्वभूमीवर महापा-लिकेच्या मालकीच्या आडगाव शिवारात अनुक्रमे 50 व 13 एकर, असे एकूण 63 एकर जागेत लॉजिस्टिक पार्क (Logistic Park) तयार करण्याचा होकार मनपाने कळवल्याने लवकरच लॉजिस्टिक्स पार्क आकारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक जिल्ह्यातून जाणार्‍या 122 किलोमीटरच्या सूरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गावरील महापालिका हद्दीतील आडगाव शिवारात शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आली होती. लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे (central government) अनुदानासाठी सादर केला होता. नाशिक दौर्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात नाशिकबद्दल प्रेम व्यक्त करताना शहर विकासात इकॉनॉमिक्स व इकोलॉजीचा समतोल राखण्याचे आवाहन केले होते.

अखेर गडकरी यांनी नाशिकमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क साकारणार असल्याची घोषणा मुंबईत केली. नाशिकसोबतच मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि दिघी बंद येथेही हे पार्क साकारले जाणार असल्याची माहिती त्यांनी मुंबईत दिली होती. शहराचा विस्तार होत असताना वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. नाशिकमधून सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड मार्ग जात असल्याने या 122 किलोमीटर महामार्गाच्या शहर परिसरात महापालिकेने जागा खरेदी करून रस्ते विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्यास लॉजिस्टिक पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. अखेर त्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला असल्याचे वृत्त आहे.

नाशिकला ठरेल वरदान

नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात देशात अव्वल आहे. देशात एक जिल्हा एक उत्पादनात नाशिक जिल्हाच्या द्राक्ष उत्पादनाचा समावेश करण्यात आलेला आहे. नाशिकला देशाची वाईन कॅपिटल म्हंटले जाते. त्यामुळे या क्षेत्राला या कॉरीडॉरमुले मोठा लाभ होणार आहे. नाशिकला उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादन प्रक्रीया होत असते. त्या उद्योगांच्या उत्पादनांची वाहतूक करणे या दोनही कॉरीडॉरमुळे सूलभ होणार आहे. त्यासाठी हा लॉजिस्टिक पार्क महत्वाचा दूवा ठरणार आहे..

लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय?

औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होणारे उत्पादन लॉजिस्टिक पार्कमधील गोदामामध्ये ठेवण्यात येते. कार्गोची सुविधा, उत्पादनाचे ग्रेडिंग, वितरण, साठवणूक, फ्रेट स्टेशन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पार्क मध्ये प्रामुख्याने फ्रेट स्टेशन, भंडारगृह, वितरण व्यवस्था, उत्पादनांची ग्रेडिंग, कार्गो आदी सूविधा असतात. या सोबतच लॉजिस्टिक्स हबमध्ये ट्रक टर्मिनल, कूलिंग, प्लांट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन उभारण्यात येणार आहे.अर्थात राज्य सरकारने तयार केलेल्या धोरणामध्ये या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

उद्योग व शेती मालाच्या वितरणासाठी हे उपयुक्त राहणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन शहर प्रदूषण मुक्त ठेवणे शक्य होणार आहे. शेतीमाल व उद्योगांच्या उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी दिल्ली-मुंबई डेडिकेटेड इंडस्ट्रियल कॉरीडोर बनवण्यात येत आहे. तो देखिल नाशिक मधूनच जाणार आहे. हे दोन्ही कॉरिडॉर जिल्ह्यातून जाणार असल्याने या लॉजिस्टिक पार्कमुळे नाशिकच्या शेतीमालासह औद्योगिक उत्पादनांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रत्यक्षात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर अटेली, नारनौल, निजामपुर शहरांतून येणारा आहे. तर सूरत चैन्नई पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जाडणार मार्ग ठरणार आहे त्यामुळे कॉरिडॉरमुळे उत्तर भारत व दक्षिण भारतासह पूर्व व पश्चिम गारतात मालवाहतूक करणे सोयीचे करणार आहे.

जिल्ह्यातील स्थिती

हैदराबाद येथील आर्वी असोसिएट्स आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. (Arvi Associates Architecture Designer Consultant Pvt. Ltd.) या कंपनीला रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. ग्रीनफील्ड प्रकल्प दीड वर्षात जमीन अधिग्रहण करणे व अधिग्रहणानंतर पुढील तीन वर्षांत हायवे कार्यान्वित करण्याचे नियोजन देण्यात आलेले आहे. या ग्रीनफील्ड महामार्गासाठीे नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटर अंतर राहणार आहे. त्यात 997 हेक्टर जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नरमधून जाणार्या मार्गावर जिल्हातील 69 गावांचा समावेश राहणार आहे.

दिंडोरीतील सर्वाधिक 23 गावांचा या मार्गावर समावेश राहणार आहे. सुरत-चेन्नई हा ग्रीनफील्ड महामार्ग सिन्नरमधील वावी येथे समृद्धी एक्स्प्रेसला छेदणार आहे. राज्यात नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात या प्रकल्पाची उभारणी केंद्र राहणार आहेत.सुरत-चेन्नई हा ग्रीनफील्ड महामार्ग राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेशकरणार असून अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे राज्यातील शेवटचे टोक राहणार आहे. सुरत-चेन्नई हे एक हजार 600 किलोमीटरचे अंतर एक हजार 250 किलोमीटरवर येणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या