महावितरणकडून दुरुस्तीकडे कानाडोळा

महावितरणकडून दुरुस्तीकडे कानाडोळा

ओझे । विलास ढाकणे | Ozhe

दिंडोरी तालुका (dindori taluka) हा तसा आदिवासी तालुका (Tribal taluka) असला तरी हळूहळू का होईना येथील आदिवासी शेतकरी (farmer) प्रगतीकडे वाटचाल करताना आता दिसून येत आहे.

त्यात तालुक्यात विजेच्या बाबतीत अनेक समस्या दिवसो दिवस पुढे येताना दिसत आहे. महत्वाची समस्या म्हणजे सिंगल फेज विज पुरवठ्याबाबत (Single phase power supply) तालुक्यात आजही बोटावर मोजण्या इतक्या गावासाठी सिंगल फेज योजना (Single phase plan) कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने गावठाण फिडर व कृषी फिडर (Feeders and agricultural feeders) असे दोन प्रकार आहे. फक्त गावात राहणार्‍या लोकांसाठी गावठाण फिडर हि योजना फक्त गावातील पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) व पिठ गिरणी गावातील सर्व कुटूंबासाठी स्वतंत्र्य गावठाण फिडरची निमित्ती केली आहे.

कृषी फिडरमध्ये गावशिवार म्हणजे मळयासाठी स्वातंत्र्य कृषी फिडर निर्माण करण्यात आलेले आहे. शिवार (मळ्यासाठी) विज उपकेंद्रातून स्वातंत्र्य सिंगल फेंज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे हि अतिशय चांगली व महत्वपूर्ण योजना आहे. मात्र तालुक्यात मळ्या वस्तीवर राहणा-या 50 टक्के लोकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. मळ्यात राहणार्‍या लोकांना आज मोठी जोखीम पत्कारावी लागत आहे. तालुक्यात शिवारात राहणारी जनता रात्री ट्रान्सफार्मरच्या (Transformer) चायनल वरती डिओ टाकून विज तयार करतात. त्यामुळे संपूर्ण ट्रान्सफार्मरला सप्लाय चालू राहतो. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पावसात तर चायनलवर डीओ टाकण्याची फार मोठी कसरत करावी लागते.

आजही महावितरणच्या (MSEDCL) सर्व अधिकार्‍यांना याविषयी माहिती असून यावर आतापर्यंत कुठलीही उपाययोजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही. भविष्यात आशा ट्रान्सफार्मवर डिओ टाकून वीज पुरवठा करण्याबाबत मोठा धोका असतो. यांमुळे तालुक्यातील प्रत्येक वीज उपकेंद्रामध्ये सिंगल फेज ट्रान्सफार्मर बसविण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. दिंडोरी तालुक्यतील अनेक गावामध्ये बिबट्याची (Leopard) मोठी दहशत निर्माण झाली असून अनेक ठिकाणी बिबट्याने अंधाराचा फायदा घेवून पाळीव प्राण्यांसह लहान मुले, माणसांवर हल्ले केले आहे.

यासाठी ज्या ठिकाणी सिंगल फेंज योजना नाही त्या ठिकाणी हि योजना चालू करणे फारच महत्वाचे असताना महावितरण कंपनीकडून दखल घेतली जात नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील उपकेंद्रामध्ये वाढीव पावर ट्रांसफार्मरची आवश्यकता आहे. लहान पावर ट्रान्सफार्मर असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो याची दखल घेणे आवश्यक आहे. तालुक्यात अनेक गावामधील 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष जुने (जीर्ण) झाले. विजेचे खांब, विजेच्या तारा शेवटीची घटका मोजत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आर्हे.

महावितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या शेतातून, बांधावरून विजेचे लोखंडी पोल (Electric pole) टाकण्यात आलेले आहे मात्र हे पोल जीर्ण झाल्यामुळे ठिकाणी वाकलेले तर काही ठिकाणी गंजून छिद्र पडलेले आहे. तारा जुन्या झाल्यामुळे उन्हाळ्यात गरम होऊन तुटतात.

त्यामुळे अनेक वेळा अपघात टळलेले आहे तर काही ठिकाणी तुटलेल्या तारामुळे ऊसाचे शेत (Sugarcane field) जळून गेल्याच्या घटना घडल्या आहे. ठिकाणी अगदी रस्त्याच्या कडेला विजेच्या तारा लोमकाळताना दिसतता तरीहि त्या तारा ओढल्या जात नाही. त्यांमुळे आशा जीर्ण झालेले पोल व तारा महावितरण कंपनी कधी बदलगार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील गावामध्ये लोक संख्या दिवसो दिवस वाढून घराची संख्या वाढत आहे. या ठिकाणी वाढीव पोलची गरज आहे मात्र आशा गावाचा सर्वे तयार का होत नाही.

आजही अनेक ठिकणी गावात घरावरून विजेच्या तारा गेलेल्या आहे. या सर्व बाबींकडे महावितरण लक्ष देण्यास तयार नाही तसे पाहिले तर घराचे विज बिल (Electricity bill) थकल्यास त्वरित विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात घरातील विज वापराचे बिल मोठ्या प्रमाणात थकत नाही. त्यामुळे गावातील विज पुरवठ्याकडे महावितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

दुसरीकडे विजेच्या बाबतीत शेतकर्‍यांची समस्या फार बिकट झाली आहे ती म्हणजे शेतकर्‍याच्या ट्रांसफार्मरवर काही बिघाड झाल्यास सर्व शेतकरी मिळून वर्गणी काढून आजही दुरुस्ती केली जाते. महावितरण कंपनीकडे आजही वेळेवर साहित्य उपलब्ध होत नाही. आणि झाले तरी खूप उशिर लागतो. त्यामुळे शेतकरी खाजगी ठेकेदारांकडून साहित्य विकत घेत आहे. महावितरण कंपनी साहित्य देण्या बाबतीत हात झटकून घेत आहे. शेतकर्‍यांना साहित्या बाबत मनस्ताप होत आहे. अनेक शेतकरी सध्या ठेकेदारांकडून महावितरण कंपनीला न सांगता काम करून घेताना दिसत आहे.

तालुक्यात सध्या अनेक हार्डवेअर दुकानांमध्ये ट्रान्सफार्मरचे साहित्य विकण्यासाठी उपलब्ध होत आहे. हे सत्य महावितरण कंपनीला नाकारून चालणार नाही. शेतकर्‍यांचे ट्रांसफार्मर जळाल्यावर लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक खाजगी कंपन्यामध्ये हे ट्रांसफार्मर विकण्याचे काम चालू असल्याचे बोलले जात असून ही अतिशय गंभीर बाब महावितरणच्या लक्षात येणे तितकेच गरजेचे आहे.

काही कर्मचार्‍यांना माहिती होऊनही याकडे हेतुपुरस्कर डोळेझाक होताना दिसत आहे यांमुळे महावितरण कंपनीच्या कारभारावर भविष्यात प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महावितरण कंपनीने जळालेले ट्रांसफार्मर शेतकर्‍यांना त्वरित उपलब्ध करून दिल्यास आशा चुकीच्या घटना कदाचित घडणार नाही. यांची दखल घेतली गेली पाहिजे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या थकीत बिलाचा प्रश्न गाजत आहे. परंतु सर्व पक्षाचे जाहिरनामे पाहिल्यास शेतकर्‍यांचे थकीत वीज बिल माफ करू असे सांगितले जाते. त्यामुळे आज शेतीची बिले थकली आहे. थकीत बिलाचा मोठा फुगवटा झाल्यामुळे शेतकरी ऐवढे बिल भरू शकत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्‍यांची कनेक्शन कट केल्यास चार ते पाच हजार शेतकरी भरताना दिसत आहे. महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील विजेच्या समस्या जाणून घेवून त्यावर त्वरित अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com