Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedपोळी हिरावून भात वाढवला?

पोळी हिरावून भात वाढवला?

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

करोना (corona) काळात सर्वसामान्यांची परवड होऊ नये म्हणून गरीब कल्याण पॅकेज (Poor welfare package) जाहीर केले. 1 लाख 70 हजार कोटी रुपयांंची तरतूद केली. देशातील 80 कोटी तर राज्यातील 7 कोटी लोकांना पुरेसे अन्नधान्य मिळेल, असे जाहीर केले. अजून चार महिने त्याची मुदत असतांंना आता त्यातील गव्हात कपात करुन मायबाप सरकारने शेवटी रेशनवर (Ration) जगणार्‍या गरिबांच्याच ताटातील पोळी हिरावून भात वाढवला आहे.

- Advertisement -

रेशनकार्ड (Ration card) धारकांना नियमित धान्याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) 5 किलो मोफत धान्य (Free grain) दिले गेलेे. सप्टेंबर अखेरपर्यंत ते मिळणार होते. मात्र, आता रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धामुळे देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या योजनेतंर्गत राज्याला देण्यात येणार्‍या गव्हाच्या नियतनाला कात्री लागली. सर्वसामान्यांना आधार असलेला रेशनचा मोफत गहू तीन ऐवजी एकच किलो मिळणार आहे.

त्याऐवजी चार किलो तांदूळ (Rice) देणार आहे. सरकारने जिल्ह्याचे गव्हाचे नियतन घटवले. त्याएवेजी तांदळाचे नियतन वाढवून रोज रात्री खिचडी खाऊनच झोपा, असेच अप्रत्यक्ष सािंंगतले आहे. तीन किलो गहू (Wheat) आणि दोन किलो तांदूळ दिले जात होते. त्याऐवजी आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देणार आहे. अंत्योदयसाठी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत होता. आता दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जाईल.

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम

युक्रेन-रशिया युद्धामुळे (Ukraine-Russia war) देशात गव्हाची टंचाई (Wheat scarcity) निर्माण झाल्याने बाजारात गव्हाच्या किमती वाढल्या आहेे. 35 रुपये किलोने गहू खरेदी करावा लागत आहे. सर्वसामान्यांना स्थितीत रेशनवर मिळणारा गहू आधार ठरला होता. तोच गहू हिरावला गेला आहे. एकीकडे खुल्या बाजारातील गहू परवडत नाही. दुसरीकडे रेशनचे धान्य काळ्या बाजारात कसे पाठवले जाते हे गेल्या आठवड्यात पवन नगरच्या जागृत ग्राहकांनी व्हिडिओ क्लीपद्वारे (video clip) निदर्शऩास आणून दिले. त्यावर पुरवठा खात्याचे निंयत्रण हवे तर तेथेेही निरीक्षक दर्जाचे अधिकारी लुडबूड करुन हस्तक्षेप करुन स्वार्थासाठी काळा बाजार करणाऱांना पाठींशी घालतात.

प्राधान्य कार्डवाल्यांची शासनाला काळजी असल्याने त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून त्यांची रेशनवरची साखर बंद करण्यात आलेली आहे. अंत्योदय कार्डधारक यांनाच ती मिळत आहे. पूर्वी युती सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तू रेशन दुकानात मिळत होत्या. त्यात कपात करत करत आता फक्त गहू, तांदुळ शिल्लक राहिला असतांना त्यातही गव्हात कपात सुरु झाली आहे. शेवटच्या घटकांच्या दीनदयाळ अंत्योदयच्या गप्पा करता करता त्यांच्याच ताटातील पोळी हिरावून सकाळ, संध्याकाळ भात, इडली, खिचडीच खा, असेच जणू सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या