Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedराज्यातील सत्ता बदलाचा फायदा मनसेनेला?

राज्यातील सत्ता बदलाचा फायदा मनसेनेला?

नाशिक | फारूक पठाण | Nashik

महाराष्ट्राच्या (maharashtra) इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांची बंडखोरी (Rebellion of MLAs) पाहायला मिळाली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Senior Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी हा पक्षातील उठाव असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ (Chief Minister’s Oath) घेतली. यामुळे 30 जून रोजी राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले.

हिंदुत्वाच्या (Hinduism) मुद्द्यावर तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा सरकार आपण आणल्याच्या दावा शिंदे यांनी केला आहे. सध्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याबाबतची एक लढाई सुरू आहे. तरी या संपूर्ण घटनाक्रम मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला (Maharashtra Navnirman Sena Party) फायदा होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याचप्रमाणे थेट परिणाम आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत (Nashik Municipal Election) देखील ती शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नाशिक मनपात मनसेना कमबॅक करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची (election) धुरा राहणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी नाशिकवर फोकस देखील केल्याचे दिसून आले आहे. मागील काही काळामध्ये अमित ठाकरे यांचे चार दौरे नाशिकमध्ये झाले आहे. यामध्ये नव्याने शाखाप्रमुख असो की हर घर झेंडा आदी उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शाखाप्रमुखांच्या नेमणुकाच्या वेळी तर ठाकरे यांनी तब्बल सुमारे साडेसातशे युवकांच्या मुलाखती देखील दोन दिवसांत पूर्ण केल्या होत्या. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) युवकांच्या जोरावर यंदा चमत्कार करण्याच्या तयारीत असल्याचे देखील जाणकारांचे मत आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना (shiv sena) अगोदरपासून कामाला लागली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आहेत तर त्यांचा नाशिकवर विशेष लक्ष असते. म्हणून त्यांनी ज्येष्ठ शिवसैनिक (shivsainik) जे इतर पक्षात गेले होते त्यांना पुन्हा पक्षात आणून पक्षाची कोर कमिटी स्थापन केली तसेच शहराध्यक्षांसह इतर काही महत्त्वाच्या पदाधिकारी यामध्ये बदल करून चांगला संघटन उभा केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते, यामुळे शिवसेनेला परिस्थिती अनुकूल होती.

म्हणून पुढचा महापौर (Mayor) शिवसेनेचाच होणार असा दावा देखील करण्यात येत होता आताही त्याच पद्धतीने दावा करण्यात येत आहे, मात्र मागील एक महिन्यातील घडामोडी पाहिल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील हा वातावरण पूरक असल्याचे दिसून येईल. शिवसेना (shiv sena) हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तयार झालेले संघटना असल्याचे बोलले जात असले तरी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जो आकडेवारीचा चित्र निर्माण झाला त्याचा फायदा घेत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी (Bharatiya Janata Party) फारकत घेत काँग्रेस (congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) बरोबर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार करून थेट राज्याची सत्ता काबीज केली.

तसेच मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांनी शपथ घेतले. यामुळे यामुळे शिवसेनेचा ज्वलंत हिंदुत्वाचा नारा होता तो काहीसा मावळल्याचे चित्र निर्माण झाले विशेष म्हणजे औरंगाबादचे नामांतर असो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा अशा गोष्टींमध्ये बोलताना शिवसेना नेत्यांची अनेक वेळा अडचण झाल्याचे देखील दिसून आले. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत याच मुद्द्याच्या आधारे नवीन सरकार स्थापन केले. राज्यसह देशात सध्या जो हिंदू हीत की बात करेंगा वही देश के राज करेगा, या पद्धतीने राजकारण सुरू आहे.

यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तसेच अमित शहा (Amit Shah) यांच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ या पद्धतीने आपले उमेदवार नसताना प्रचार करणारे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका देखील राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आल्यावर बदलल्याचे अख्या जगाने पाहिले आहे. मध्यंतरी त्यांनी लाऊड स्पीकर (Loud speaker) वरून होणारी अजानचा विषय चांगलाच लावून धरला होता. यामुळे देखील महाविकास आघाडी सरकारची थोडी गोची झाली होती. दरम्यान आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही तसेच हिंदुत्वाचे मुद्द्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या गट तोडून राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माध्यमातून काबीज केली आहे.

यामुळे राज्याचे वातावरण पुन्हा बदलले आहे या बदललेल्या वातावरणात राज ठाकरे यांच्या सारख्या कळवट हिंदुत्व पक्षला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे आजारी आहे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली तसे पाहिले गेले तर या दीड तासाच्या भेटीमध्ये भरपूर राजकीय चर्चा झाल्या आहेत.

मात्र कॅमेरासमोर कोणीही बोलायला तयार नाही तरी सध्याच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल पेंडिंग असला तरी भारतीय जनता पक्ष तीन गोष्टींवर काम करत असल्याचे देखील जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे भविष्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्याय म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेला तयार ठेवण्यासाठी देखील भेटीगाठी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक शिवसेना पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देखील बालेकिल्ला मानला जातो. मनसेनेचा महाराष्ट्रात पहिला महापौर देखील नाशिकमध्ये बसला होता तर शहरातील चारपैकी तीन आमदार तसेच तब्बल 40 नगरसेवक नाशिकमध्ये होते. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र मनसेना कमबॅक करण्याची शक्यता नकारता येत नाही. पक्षाची सुरू असलेली वाटचाल तसेच हिंदुत्वाच्या मुद्दा यासह अनेक विषयांमुळे मनसेनेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, महिला, विद्यार्थी आघाडी जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या