प्रशिक्षणाच्या तासाची वेळ चुकली?
USER

प्रशिक्षणाच्या तासाची वेळ चुकली?

नाशिक | दाखल |विजय गिते Nashik

केंद्र शासनाकडून (central government) पंधराव्या वित्त आयोगाचा (finance commission) निधी (fund) जिल्हा परिषदेला (zilla parishad) भरभरून मिळाला आहे. या निधीचे नियोजन कसे करायचे याबाबातची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागील आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती (panchayat samiti) सदस्यांसाठी ‘प्रशिक्षणाचा तास’ ठेवला होता.

या तासाला शंभराच्या वर पंचायत समिती सदस्यांनी हजेरी लावत भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी अशी परिस्थिती पहायला मिळाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आयोजित प्रशिक्षणास 72 जिल्हा परिषद सदस्यांपैकी अवघ्या 22 सदस्यांनीच हजेरी लावली. 22 पैकीही प्रत्यक्षात पंधराच सदस्य प्रत्यक्षात हजर होते. बाकी सही करून मोकळे झाले अन सभागृहाबाहेर पडले. त्यातही उपस्थितांपैकी महिला सदस्यांची हजेरी लक्षणीय होती.

सदस्यांसाठी आयोजित हे प्रशिक्षण प्रशासनाला केवळ प्रशिक्षणाचे सोपस्कार करायचे म्हणून आयोजित केले होते की, खरोखरच मार्गदर्शन करायचे होते? हा संशोधनाचा भाग आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणाच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती.एकविसाव्या शतकातही अमावस्या, पौर्णिमा या गोष्टी पाळल्या जात आहेत. त्यामुळेच सदस्यांनी या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली अशी चर्चा आहे.

पहिल्या दिवशी गर्दी होते अन दुसर्‍या दिवशी एक पंचमांश सदस्यही हजेरी लावत नाही. त्यामुळे प्रशासनही प्रशिक्षणाची वेळ अन तारीख ठरवितांना चुकलेच! असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचे चार हप्ते मिळाले आहेत. यापूर्वी दिलेला निधी खर्च करा त्याशिवाय पुढचा निधी मिळणार नाही, असा कठोर निर्णयच सरकारने घेतलेला असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून निधी नियोजनाचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सदस्यांना विकास आराखडा तयार करणे, बंधित निधी, अबंधित निधी, कामांची निवड, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर प्रस्तावित करावयाची कामे याबाबत माहिती मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने 5 व 6 ऑक्टोबरला अनुक्रमे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. त्यात पंचायत समिती सदस्यांनी या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद दिला.

शासन व प्रशासन ही एकाच रथाची दोन चाके आहेत. ही चाके एकाच गतीने चालत राहीली तर प्रगतीला गवसणी घालणे अशक्य नाही. त्यासाठी मात्र दोन्ही चाके मजबुत असणे आवश्यक आहे.त्यातही प्रत्येक चाकाची गती सारखी असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगापोटी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधी नियोजनासाठी सदस्य, पदाधिकार्‍यांसाठी प्रशासनाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवायची आणि नियोजन होत नाही म्हणून प्रशासनाच्या नावाने बोटे मोडायची.

असा दुटप्पीपणा पदाधिकारी आणि सदस्यांनी करणे योग्य नाही. जिल्हा परिषदेचा कारभार हाकण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे शासनाचे प्रतिनिधी म्हणून अधिकार्‍यांवर निश्चित करण्यात आली आहे, तशीच ती जनतेचे प्रतिनिधी म्हणून पदाधिकारी सदस्यांवरही आहे. त्यामुळे सदस्यांनीही आता काय आपला कार्यकाळ ऊणे अधिक अवघ्या तीन महिन्यांचा राहिला आहे, असे समजून प्रशिक्षणाकडे पाठ फिरविणे म्हणजेच विकासापासून दूर जाणे यातलाच एक भाग आहे.

नाही म्हणायला प्रशासनाची ही प्रशिक्षणाचे तारीख ठरविताना चूक झाली असे म्हणावे लागेल आपण एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी अमावास्या पौर्णिमा या बाबींवर अनेकांचा विश्वास आहे. जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती त्यामुळे घरी कार्यक्रम असेल म्हणून म्हणा किंवा अमावस्या म्हणून या प्रशिक्षणाला हजेरी लावलेली जबरी असा सदस्यांचा गैरसमज झाला असावा त्यामुळे प्रशासनाची ही तारीख निश्चित करताना वेळ चुकली असेच म्हणावे लागेल.

कर्तव्याची जाणीव हवी

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सकाळी साडेदहा वाजता मुख्यालयातील विविध खात्यांना भेटी देऊन अचानक केलेली पाहणी. त्यात गैरहजर असलेल्या अधिकारी, सेवकांची संख्या पाहता रथाच्या दोन्ही चाकांपैकी एका चाकाची अवस्था लक्षात येते. ही झाली एक बाजू , ती तितकीच शोचनीय आहे.

दुसरीकडे प्रशासनाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी 72 पैकी प्रशिक्षणास जेमतेम 15 सदस्य अन पदाधिकार्‍यांनी हजेरी लावत प्रशिक्षणाकडे फिरविलेली पाठ पाहता सदस्यांमधील विकासाप्रती असलेली जाणीव किती क्षीण झालीय याचा प्रत्यय येतो.त्यामुळेच एकीकडे सेवकांना त्यांच्या शासकीय कर्तव्याची जाणीव करून देताना सदस्य, पदाधिकार्‍यांना देखील त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. ही जाणीव का करून देणे गरजेचे आहे, हे नुकत्याच झालेल्या निधी नियोनाच्या पत्र अदलाबदलीच्या खेळावरून लोकप्रतिनिधींच्या लक्षात यावे.

Related Stories

No stories found.