Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमराठमोळ्या नवतरुणाची स्वाभिमानी धडपड...

मराठमोळ्या नवतरुणाची स्वाभिमानी धडपड…

धुळे – अनिल चव्हाण Dhule

माे.नं.98222 95194

- Advertisement -

धुळे शहर अनेक अर्थाने वैशिष्टपुर्ण आहे. या शहरातील वेगवेगळे विभाग आणि त्यांची ओळख हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यातल्या त्यात गल्ली, खुंट यांचीही वेगळी ओळख आहे. काटकोनी गल्ल्यांमध्ये वसलेल्या या शहराची रचना, इथली संस्कृती आणि पुर्वी प्रत्येक खुंटावर असलेल्या व्यायामशाळा, हे धुळ्याचे वैभव मानले जाते. म्हणूनच शहराला कुस्तीची पंढरी असेही म्हटले जाते.

आजोबा प्रख्यात मल्ल स्व.रामभाऊ करनकाळ वडील या शहराचे प्रथम महापौर भगवान करनकाळ यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा जपणारा करनकाळ कुटुंबियांच्या तिसर्‍या पिढीतील सदस्य सिध्दार्थ करनकाळ याने आपली वाट निवडली आहे. मराठमोळ्या या नव तरुणाने व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेवून ‘हॅप्पी मार्ट’च्या माध्यमातून चांगली सेवा देत धुळेकरांना हॅप्पी करण्याचा मानस निश्चित केला आहे. हे करतांना करनकाळ कुटुंबियांच्या नावलौकीकात आणखी भर घालण्याचा, हा वारसा समर्थपणे पेलण्याचा त्याचा प्रयत्न असावा. त्यासाठी डोक्यावर बर्फ अन जिभेवर साखर हा मुलमंत्र त्यानेही जपावा.

स्व.रामभाऊ करनकाळ हे या शहरातील नव्हेतर त्याकाळी महाराष्ट्रभर गाजलेले मल्ल. आपल्या सामाजिक कामासह दानशूरतेमुळे रामभाऊंचा आदरयुक्त दबदबा होता. अनेकांचे तंटे यांच्या ओट्यावर बसून मिटत असे. त्यांच्या शब्दात कमालीचे वजन होते. म्हणूनच प्रचार न करता ओट्याव बसलेल्या रामभाऊंना त्याकाळी धुळेकरांनी निवडून पालिकेत पाठविले.

घरातून मिळालेले आई शांताबाईचे संस्कार अन् वडिलांनी दिलेले सामाजिक कार्याचे बाळकडू घेवून भगवान करनकाळ अर्थात बापूजी यांनीही सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले. गल्ली नं. 6 मधील भांग्या मारोती विजय व्यायामशाळेची पार्श्वभूमी, कसलेल्या मल्लांची साथ आणि विधायक हेतूने जोडलेले हजारो तरुण, या बळावर भगवान बापूजी हे नाव देखील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठ्या ताकदीने उदयास आले. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यानंतर धुळे महापालिकेचे प्रथम महापौर होण्याचा सन्मान बापूजींना मिळाला. यामुळे करनकाळ कुटुंबियांच्या लौकीकात मानाचा तूरा रोवला गेला. या कुटुंबाने शहरातील नव्हेतर खानदेशातील नामांकीत कुटुंब म्हणून ख्याती मिळविली.

अनेकांचे अडलेली कामे असो की, अहोरात्र मदतीसाठी धावून जाण्यासह यात भगवान बापूजी अग्रभागी राहिलेत. त्यांनी ठरविले असते तर या शहरात वेगवेगळ्या वास्तुंच्या माध्यमातून मालमत्ता आणि गडगंज पैसा कमविला असता. परंतू त्यांनी श्रमाला प्राधान्य दिले. आपल्या परिवाराचे नावलौकीक कमी होणार नाही. असाच सातत्याने प्रयत्न केला. अर्थात यासाठी त्यांना असंख्ये संकटे झेलावी लागली. संघर्ष करतांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. आपण जे भोगले ते आपल्या पुढच्या पिढीच्या वाटेला येवू नये, हा विचार चिंता बनून बापूजींना कायम भेडसावत राहिली. म्हणूनच त्यांनी आता गल्लीची वहिवाट सोडून वेगळ्या दिशेने आणखी विधायक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना मार्गही सापडला. अर्थातच त्यासाठी साथ मिळतेय ती पुत्र सिध्दार्थची.

वसा आणि वारसा आजोबा आणि वडिलांच्या सामाजिक व राजकीय कामांचा वारसा असलेल्या सिध्दार्थ भगवान करनकाळ उर्फ सिध्दू, यास हा वसा पुढे नेणे, म्हटले तर तेवढे सोपेही नाही. 90 वर्षांची करनकाळ कुटुंबियांची परंपरा कुठलाही डाग न लागू देता पुढे नेण्यासाठी आज सिध्दार्थ सज्ज असला तरी त्याला प्रत्येक पाऊल अत्यंत सावधतेने आणि विचारपुर्वक टाकावा लागेल.

वाणिज्य शाखेचे शिक्षण घेवून पदवीधर असलेल्या सिध्दार्थने ‘हॅप्पी मार्ट’च्या माध्यमातून व्यवसायात पदार्पण केले आहे. देवपूरातील वाडीभोकर रोडवर एकाच छताखाली किराणा मालासह धान्य, स्टेशनरी, कटलरी याचा व्यवसाय करुन धुळेकरांना चांगली सेवा देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या व्यवसायाचा श्रीगणेशा होतो आहे. वाडवडिलांची पुण्याई अन् संस्कारांच्या माध्यमातून व्यवसायात प्रामाणिकपणे उतण्याचा त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे. भट्टीत शेकले जावून अस्सल कसदार सोने ठरण्याचे त्याचे मनोधैर्य हे त्याच्या संस्काराचे प्रतिबिंब ठरणार आहे.

खरेतर करनकाळ कुटुंबियांमध्ये किराणा मालाच्या व्यवसायात आजपर्यंत कोणी उतरलेले नाही. ही हिम्मत या परिवारातील तिसर्‍या पिढीचा सदस्य असलेला सिध्दार्थ करतो आहे.

सुपर शॉपीच्या माध्यमातून व्यवसायात उतरु पाहणार्‍या सिध्दार्थला यातील यश सिध्दीसाठी कमालीचे परिश्रम घ्यावे लागतील. संयम ठेवावा लागेल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून ग्राहकांशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. ग्राहक हेच आपले सर्वस्व असे मानून झोकून काम करावे लागेल. अर्थात क्षेत्र कोणतेही असो त्यात परिश्रम, जिद्द आणि प्रामाणिकता ही त्रिसूत्री असेल तर यश निश्चित मिळते. त्याच्यातर नावातच स्वत:ला सिध्द करण्याची ‘सिध्दता’ आणि पाठीशी ‘भगवान’ आहे. त्यामुळे त्याने निवडलेली ही वेगळी वाट निश्चित यशाचा मार्ग ठरेल यात शंका नाही.

सिध्दार्था… हेही लक्षात ठेव

असे म्हणतात, देवाने चोच दिली तर दाण्यांची व्यवस्थाही करेल. परंतू ही व्यवस्था घरात खाटेवर बसून होत नसते. त्यासाठी धडपड करावी लागते. करनकाळ कुटुंबियांमध्ये तू वेगळी वाट निवडली आहे, याबद्दल तुझे कौतुकच आहे. पण उभ्या खानदेशात नव्हेतर अर्ध्या महाराष्ट्रात करनकाळ कुटुंबियांचे नाव आहे. आजोबांचा अन् वडिलांचा तुला वारसा आहे. वडिल भगवान करनकाळ यांनी असंख्य संकटे छातीवर झेलून तुला ढाल बनून संरक्षण दिले आहे. आपल्या कुटुंबाचे हे लौकीक जपतांनाच वाडवडिलांच्या नावाला कुठेही छेद जाणार नाही असेच तुझे प्रयत्न असावेत. तसा तू समजदार आहेस. सिध्दार्था.. मोठ्ठा हो, पार्था!

- Advertisment -

ताज्या बातम्या