Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदूरावस्थने हातगड हतबल

दूरावस्थने हातगड हतबल

हतगड । लक्ष्मण पवार | Hatgad

महाराष्ट्र (maharasgtra) ही गडकिल्ल्याची (Fort) भूमी आहे. या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे. तसाच वैभवशाली वारसा ही आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असंख्य किल्ले आहेत. काहींचा वारसा जगासमोर आला तर बरेचसे किल्ले विकासाची वाट बघतात. दूरावस्थेने हतगड किल्ला (Hatgad fort) हतबल झाला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) दक्षिणेकडे महाराष्ट्र (maharashtra) व गुजरात (gujrat) सीमेलगत सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) हतगड हे छोटे ऐतिहासिक व निसर्गसौंदर्य लाभलेलं गाव आहे. येथे 3000 हजारच्या वरती लोकवस्ती असलेलं गाव आहे. या गावाला दर सोमवारी बाजार भरतो.

या बाजारात महाराष्ट्र व गुजरात मधून व्यापारी व लोक येत असतात. पर्यटकांना जेवणाच मनमुराद आनंद देणारे हॉटेल (hotels) व बार (Bar) आहेत. ग्रामपंचायत कार्यालय (Gram Panchayat Office), अंगणवाडी (Anganwadi), शाळा (school), उपआरोग्य केंद्र, फॉरेस्ट रेस्ट हाऊस, देवीदेवतांची धार्मिक मंदिरे आहे.

येथे पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरेची संपन्नता लाभलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना हतगड आकर्षित करतो. शिवाय किल्ल्यावर 15 ऑगस्ट व 26 जानेवारी, 1 मे रोजी आपले तिरंगा लहरत असतो. परराज्यातून पर्यटक आवर्जून हतगड किल्ला बघण्यासाठी येत असतात. परंतु हतगड किल्ला विकासापासून कोसो दूर होत चालला असल्याने पर्यटकांसाठी त्यांचे मन रमून जावे असे सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पर्यटक नाराज होऊन परतावे लागते. पर्यटकांसह ग्रामस्थांकडून अशी मागणी केली जात आहे की किल्ल्यावर पर्यटकांना खासकरून मुतारी आवश्यक आहे.

पर्यटकांच मन रमाव म्हणून गार्डन असावे, त्यात आराम करण्यासाठी छोट्या झोपड्या असाव्यात, किल्ल्यावर जाण्यासाठी जो गाड रस्ता आहे. त्याला पर्यटकांच्या गाडीला अपघात होऊ नये म्हणून संरक्षण कठडा हवाय. विद्यूतची सोय हवी, असे विविध विकास कामे व्हायला पाहिजे परंतु या सुविधा पासून किल्ला भकास दिसत आहे. तरी संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी या किल्ल्याचा विकास करण्यासाठी चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या