Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedटाऊनशिप : टाऊनशिपसाठी नाशकात भरपूर वाव

टाऊनशिप : टाऊनशिपसाठी नाशकात भरपूर वाव

: शुभम राजेगावकर

नाशिकमध्ये टाऊनशीपसाठी मोठा वाव आहे. नागरिकांना सुविधा देण्याची क्षमता टाऊनशिपमध्ये असल्याने येत्या 25 वर्षात भविष्याची गरज म्हणून हे क्षेत्र विकसित होणार आहे. पायाभूत सेवा, सुविधा, अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षितता, सुसंवाद, समन्वयन, कार्यान्वयन आणि स्वच्छ, पर्यावरणपूरक उंच दर्जाचे जीवनमान देणारी जीवनशैली हे एकाच ठिकाणी टाऊनशीपमध्ये सहज शक्य होते.

- Advertisement -

टाऊनशिप म्हणजे अशी मोठी आणि विस्तारीत घर-व्यावसायिक प्रकल्पांची वसाहत. येथे राहण्यासाठी सर्व अद्ययावत आणि आधुनिक सोई-सविधा, प्रणालीसह तंत्रज्ञानानेयुक्त रहिवासाची सोय असते.

टाऊनशिपमध्ये शाळा, कॉलेज, दुकाने, मॉल, उद्याने, कम्यूनिटी हॉल, चित्रपटगृह, जीम, स्विमिंगपूल, जॉगिंगपार्क यांस सर्व अत्यावश्यक सुविधांचा अंतर्भाव असतो. सार्वजनिक जागा, उद्याने, मैदाने या जागा त्या त्या उद्देशासाठी राखिव ठेवल्या जात असून टाऊनशीपमध्ये नागरिक अधिक सुजाणपणे आपली कर्तेव्य बजावतात.

नाशिकमध्ये टाऊनशीपसाठी मोठा वाव आहे. टाऊनशीपमध्ये नागरिकांना खासगी कार, दुचाकींवर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण कामाचे ठिकाण, शाळा-महाविद्यालय जवळच असल्याने कारशिवाय नागरिकांना कामावर वेळत जाता येणार असल्याने गर्दी, वाहतूक कोंडी या गोष्टींना आळा बसेल. नवीन ऊर्जा, अभिनव ज्ञान असलेल्या ऊर्जावान तरुणाईसाठी टाऊनशीप हे केंद्रबिंदू ठरेल.

आर्कीटेक्ट :

भविष्यातील टाऊनशिपमध्ये व्हर्टीकल शेजार पाहायला मिळतील. तीन उद्दीष्टांकरीता इमारतींचा ङ्गउपयोगफ केला जाईल. नगरीतील इमारती परस्परांशी सलग्न असतील. त्यामध्ये नागरिकांचा रहिवास, ऑफिसेस, शाळा-कॉलेज या या गोष्टी सहज पूर्ण होऊ शकतील. पायाभूत सेवा, सुविधा, सुरक्षितता, सुसंवाद, समन्वयन, कार्यान्वयन आणि स्वच्छ, पर्यावरणपूरक उंच दर्जाचे जीवनमान देणारी जीवनशैली हे एकाच ठिकाणी टाऊनशीपमध्ये सहज शक्य होते.

तंत्रज्ञान, डिजीटल प्रणाली :

टाऊनशीपमध्ये सुरक्षा, अंतर्गत संपर्क, दळणवळण यासह इतर सेवांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेट, डिजीटल उपकरणे, साधनांचा पुरेपूर वापर केला जाईल. हायस्पीड नेटवर्कचे प्रभावी जाळे तयार असेल. लोकांच्या राहणीमान, आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी ङ्गलाईफ डिजीटल सोल्यूशन्सफप्रणीत लाईफ इंडिकेटर्स, गुन्हे रोखण्यासाठी ङ्गक्राईम मॅपिंगफ प्रणाली, सुरक्षेचे जाळे टाऊनशिपचा भाग असतील.

नागरिकांनी ऊर्जेचा वापर किती केला, त्याचे मूल्य किती येईल हे दर्शवणारी ङ्गस्मार्ट डिजीटलफ यंत्रणा घरे, कार्यालयात कार्यान्वित असतील. मोबाईल-इंटरनेटचा वापराने अर्थव्यवस्था अधिक समृद्ध आणि सुलभ केली. याचा अधिकाधिक आणि पुरेपूर वापर टाऊनशिपमध्ये केला जाईल. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी डिजीटल-ऑनलाईन पद्धतीचा वापर अधिक प्रभावीपणे केला जाईल. वस्तुंचा साठा, देखभाल करण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका होईल.

पर्यावरणपुरक आल्हादायी वातावरण:

टाऊनशीपमधील प्रकल्पात नागरिकांना स्वच्छ, प्रदुषणमुक्त हवा, भरपूर सूर्यप्रकाश, इष्ट तपमानात जीवनजगण्याची संधी मिळेल. कारण सर्व इमारती पर्यावरणपूरक (ग्रीन बिल्डींग्स) असतील. ग्रामीण भागातील शेतकर्यांसोबत सहकार्याने त्वरीत पोहच आणि अतिउत्तम दळवणवळ यामुळे नागरिकांना ताजा निरोगी आणि स्वच्छ भाजी-फळांचा पुरवठा घरपोच शक्य होईल.

समन्वय, संपर्क यंत्रणा :

टाऊनशीमधील स्तरआधारित आणि तत्काळ उपलब्ध होणारी साधने, प्रोटोकॉल्स, सेवा संपर्क आणि सामुहिक संपर्क-संवादामुळे येथे कुठल्याही गोष्टींसाठी सुसंवाद, सुनियोजीतता आणि समन्वय सहज शक्य असेल. कला. क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, आध्यात्मिक उपक्रमांसाठी प्रशस्त आणि मोठी जागा, मैदान, सभागृह सर्वांच्या गरजेनुसार उपलब्ध असेल. मानव निर्मित आणि निसर्गाच्या कुठल्याही आपत्ती, संकटांवर मात करणारी अत्याधुनिक एकात्मिक कार्य करणारी प्रणाली 24 तास तत्पर असेल.

एका कॉल, संदेशावर तत्काळ एकात्मिक प्रणाली उपलब्ध होऊन संकटे, आपत्ती दूर करण्यास उपलब्ध असेल. ङ्गक्लायमेट सेन्सॉरफ, ङ्गकोअर सिटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टिममद्वारे आणि सिटी एजन्ट-सेवकांच्या तत्काळ सेवेतून सर्व आपत्ती, संकटावर मात केली जाणारी पद्धती असेल. वीज, पाणी आदी अत्यावश्यक सेवा बाधित, खंडित झाल्यास त्यावर तत्काळ उपाय देणारा सर्वसाधायुक्त चमू 24 तास सेवा देईल.

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता :

टाऊनशीपमध्येसंसर्गजन्स आजार तसेच अस्वच्छता पसरवणारे घटकांना येथे थारा नसेल. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मलजल नि:स्सारण वाहिन्या, बाजारपेठा आणि रहिवाशी कॉलनी, रस्त्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे अधिक स्वच्छ, निर्जंतुक राहण्यासाठी आर्दश आणि प्रमाणित केलेले नियम असतील ते पाळणे बंधनकारक असेल. येत्या 25 वर्षात ही गोष्ट प्रत्येक टाऊनशीपमध्ये अधिक प्राधान्याने आणि काटेकोरपणे पालन केलेली दिसून येईल.

टाऊनशीपसाठी शंभर-दिडशे हेक्टर जागा लागत असल्याने नाशिकमध्ये टाऊनशिपसाठी मोठा वाव आहे. येत्या 25 वर्षात शहराच्या 25 ते 50 किमी परिघात मोठ्या प्रमाणावर टाऊनशीप विकसित झालेल्या दिसून येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या