Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedटाऊनशिप : जीवनशैलीप्रमाणे घरांचे स्वरूप बदलणार!

टाऊनशिप : जीवनशैलीप्रमाणे घरांचे स्वरूप बदलणार!

: सुशील बागड

सध्या जिवनशैलीत झपाट्याने बदल होत आहे. यानूसार भविष्यात घरं तयार करतांना अनेक बारीकसारीक गोष्ठींमध्ये बदल करावेच लागणार आहेत. यामध्ये घरातील किचनसह बहुमजली पार्कींग, एका इमारतीत दोन किंवा त्या पेक्षा जास्त लिफ्ट, आधुनिक डिजीटल रूम, मोफत वायफाय झोन व लहान मुले-मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रुम या सोयी असतील.

- Advertisement -

बदलत्या जीवनशैलीला अनुसरून पुढील पंचवीस वर्षात घर घेताना ग्राहक पुढील विचार नक्कीच करतील. जसे घर हे किमान दोन किंवा तीन बेडरूमचे असावे, घरामधील किचनला लागून एक वॉशिंग प्लेस असावी, एक स्टडी रूम म्हणजेच वर्किंग प्लेस लहान का असेना पण ती असावी, टेरेस किंवा किमान बाल्कनी असावी.

येणार्या काळात लोक घर घेताना ठराविक काही सोयी सुविधा अपेक्षित करतील. त्यास इमारतीत दोन लिफ्ट असाव्यात, ज्याच्या मधली एक लिफ्ट ही स्ट्रेचर लिफ्ट असेल, तसेच अंध व दिव्यांग लोकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना राहील, वयोवृद्ध व्यक्तींना कॉमन एरियात व्हीलचेअरवर फिरता येईल असे रॅम

इमारतीमध्ये कॉमन एक सर्वंट रुम असेल.त्याच प्रमाणे दोन बेडरूम किंवा तीन बेडरूम घर घेणार्या परिवाराला किमान दोन कार पार्क आणि दोन टू-व्हीलर्सची जागा लागणार. बिल्डींग मध्ये येणार्या व्हिजिटर्सनादेखील स्वतंत्र पार्किंग लागणार.

त्यासाठी मल्टिपल लेवल पार्किंग म्हणजेच एक किंवा दोन मजली पोडियम पार्किंग किंवा बेसमेंट पार्किंग हे गरजेचे होणार. कुठल्याही बिल्डिंगचा आराखडा बनवताना त्या मध्ये घराचे स्वयंपाक घरहा फार महत्त्वाचा घटक असतो त्याच्यामध्ये पुरेसे व्हेंटिलेशन, किमान चार ते सहा लोकं एकत्र बसू शकतील अशी डायनिंगटेबल ची जागा, वॉशिंग प्लेस या गोष्टी गरजेच्या आहेत.

सध्या आधुनिक जगात प्रत्येक जण हा डिजिटल होत आहे त्यासाठी लागणारे नेटवर्क कनेक्शन उत्तम दर्जाचे असणे हे खूप गरजेचे आहे. इमारतीच्या सार्वजनिक जागेत फ्री वाय फाय झोन ही काळाची गरज असणार आहे. आगामी 25 वर्षातले बदल पाहीले तर जिवनशैलीबरोबर राहण्याच्या जागा, घरांमध्ये देखील खुप बदल अपेक्षीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या