Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअंबा बैसली सिंहासनी हो!

अंबा बैसली सिंहासनी हो!

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

गेली दोन वर्ष करोनामुळे (corona) स्तब्ध झालेले सण, उत्सव (festival) आता सुरू झाले. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला (navratrotsav) प्रारंभ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील (nashik district) विविध देवी मंदिरे यंंदाच्या नवरात्रासाठी सज्ज झाली आहे. या उत्सवावर अनेकांंचे अर्थकारण अवलंबून आहे.

- Advertisement -

म्हणूनच यंदाच्या उत्सवातून मिळणार्‍या रोजगारासाठी अनेकांनी देवीला साकडे घातले आहे. विविध व्यावसायिकांनाही यातून रोजगार उपलब्ध होणार आहे. वणीची सप्तृशृंगी देवी (Sapthrisringi Devi), चांदवडची (chandwad) रेणुका माता, कोटमगावची जगदंंबा माता, इगतपुरीतील (Igatpuri) घाटनदेवी, भगुरची रेणुका देवी, नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता चरणी जवढे जास्तीत जास्त भाविक नतमस्तक होेतील, तेवढी चालना व्यवसायाच्या भरभराटीस मिळणार आहे. म्हणूनच यंदाचा उत्सव शांततेत, निर्वीघ्न व उत्साहात पार पाडवा हीच प्रत्येकाची इच्छा आहे.

दोन महिन्यांपासून बंद असलेले सप्तशृंंग मंदिरही आजपासून दर्शनासाठी खुले होत आहे. देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर मूळ रूपातील देवी दर्शनाची भाविकांमध्ये असलेली उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. व्यवसायाच्या भरभराटीसाठी स्थानिक व्यवसायिकही कामाला लागले आहेत. देवीचे मूळ रुप डोळ्यांत साठविण्यासाठी भाविक, पर्यटक (tourists) नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने गडावर येतील, यात शंका नाही. जिल्ह्याच्या प्रसिध्द विविध देवी मंदिरांमध्ये नाशिकचे (nashik) ग्रामदैवत कालिका मातेचा नवरात्रोत्सव नाशिकच्या वैभवातील मानाचे पान आहे.

या देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी इ. स. 1705 च्या सुमारास केला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा येथे भरू लागली. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिकामाता मंदिरापर्यंत येऊ लागली. तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले. ती परंपरा आजही कायम आहे.

येवल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोटमगाव (kotamgaon) येथे नारंदी नदी काठावर जगदंबामातेचे मंदिर वसलेले आहे. कोटमगावची देवी जागृत असून, ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीचे मंदिर उंचवट्यावर आहे. जिल्हाभरात कोटमगावच्या मंदिरासारखे मंदिर क्वचितच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकारातून जीर्णोध्दार झालेल्या चांदवड (chandwad) येथील रेणुका देवी मंदिराचे स्वरूप सोई सुविधांमुळे पूर्णपणे पालटले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) चांदवडपासून तीन किलोमीटर अंतरावर हे अतिप्राचीन मंदिर आहे.

मंदिराचा जीर्णोध्दार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 1735 ते 1795 च्या दरम्यान केला. अहिल्याबाईंनी देवस्थानचा विकास केला. मंदिराचे काम करताना किती दूरदृष्टी दाखवली, त्याची प्रचिती येथे येते. घाटनदेवी मंदिर हे इगतपुरीतील लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर घाटनदेवीला समर्पित आहे, ज्याला स्थानिक लोक घाटांचे संरक्षक मानतात. भव्य दरीत वसलेले हे मंदिर भक्तांसाठी लक्षवेधी देखावा सादर करते. हरिहर, दुर्वर उत्वाद आणि त्र्यमक ही भव्य शिखरे या मोहक मंदिराला आकर्षक बनवतात.

भगूर येथील देवी मंदिर रेणुका देवीचे मंदिर म्हणूनच ओळखले जाते. भगूरच्या पंचक्रोशीतील भाविक तर यासाठी भगूरला येतातच, परंतु मुंबई-पुण्याकडचे भाविकही येथे येतात. भगूर हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. देश पारतंत्र्यात असताना ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे!’ हे अजरामर स्फूर्तिगीत लिहिणार्‍या सावरकरांच्या भगूरची देवी प्रेरणादायी आहे. या देवतांच्या दर्शनासाठी भाविक आले तरी दोन वर्षांची कसर यातून निघाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या