Thursday, April 25, 2024
HomeUncategorized3 वर्षांत 22 हजार रुग्णांची प्राणदूत

3 वर्षांत 22 हजार रुग्णांची प्राणदूत

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

करोना काळात (corona) जीवनवाहिनी (Lifeline) ठरलेल्या 108 या रुग्णवाहिकेने (Ambulances) नुकताच 22 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोना काळात खर्‍या अर्थाने ग्रामीण तसेच शहरी भागात ही रुग्णवाहिका प्राणदूत ठरली आहे.

- Advertisement -

ज्या काळात कोणी कोणाला स्पर्श करायला घाबरत होते, त्या काळात रुग्णवाहिका आणि रुग्णवाहिका कर्मचार्‍यांनी अनेकांना करोना सेंटरमध्ये (corona center) दाखल करून त्यांचे प्राण वाचवले होते, अशी माहिती 108 रुग्णसेवेचे झोनल व्यवस्थापक डॉ. आश्विन राघमवार (Zonal Manager Dr Ashwin Raghamwar) यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाच्या पहिल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेमध्ये देखील भीतीपोटी रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यास कोणी तयार होत नव्हते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर (doctor) आणि चालक यांनी 24 तास सेवा देत आपले कर्तव्य बजावले होते. याच रुग्णवाहिकामुळे अपघातग्रस्त 2 लाख 73 हजार 116 रुग्णांना जीवदान मिळाले आहे. करोना (corona) काळात एकूण 46 रुग्णवाहिका जिल्ह्यात कार्यरत होत्या. यातील 11 रुग्णवाहिकांमध्ये अतिरिक्त लाईफ सपोर्ट (Life support) असल्याने अतिगंभीर रुग्णांना कोविड सेंटरपर्यंत वेळीच पोहोचवता येत होते. या 108 रुग्णवाहिकांमध्ये 108 चालक आणि 106 डॉक्टर्स सेवा देत होते. पिपिई कीट (PPE Kit), मास्क (mask), ग्लोव्ज्स (Gloves) मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले होते.

2020 मध्ये 18 हजार 292 रुग्ण, 2021 मध्ये 3 हजार 882 रुग्ण तर 2022 मध्ये आतापर्यंत 115 रुग्णांना 108 या रुग्णवाहिकेने आधार दिला आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 लाख 73 हजार 116 रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या