वन्यजीवांचे रक्षण करुया....

वन्यजीवांचे रक्षण करुया....

किरण विठ्ठल पाटील

अपल्या आसपासच्या सृष्टीतील प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची विविधता थक्क करणारी आहे आजही नव्या प्राण्यांच्या जाती सापडत आहेत आपण निसर्गाची सतत कत्तल करून त्यांच्या जगण्याचे अधिकारच हिरावून घेत आलो आहोत पण एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे वन्यजीव जगले तरच आपण जगू...

आज जागतिक वन्यजीव दिवस आहे या जागतिक वन्यजीव दिवशी वन्य जीवांचे संरक्षण आणी संवर्धन करण्याचा संकल्प करूया सध्याचा काळ खूपच कठीण आहे विश्वात जागतिक महामारी आजार कोरोना सर्व जगात पसरलाय त्यामुळे आज आपले जीवन धोक्यात आले आहे त्यातल्या त्यात प्राण्यांचे जीवन कसे वाचवायचे याच्या बद्दल सर्व मानवांनी वन्यजीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यकच आहे...

1970च्या दशकाला वन्यजीव वन्य प्राणी म्हणजे कोणते आहे? असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार असे वाटू लागले होते कारण वन्यप्राणी वन्यजीव आणि इतर घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की यापैकी बरेचसे वन्यजीव कायमचेच नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती याबाबत जनजागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीव दिवस ठरविला...

नामशेष होण्याच्या धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा 3 मार्च 1973 रोजी 180 देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्व आहे. जंगली पशू पक्ष्यांची शिकार तसेच त्यांच्या आणि दुर्मिळ वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजावले पाहिजे निसर्गाच्या साखळीतील प्रत्येक घटक सर्वात लहान किड्या पासून तर सिंहा पर्यंत पृथ्वी वरील जीव सृष्टीसाठी महत्वाचा आहे ही बाब सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे...

मूक वन्यजीव प्राणीसाठी आम्हाला दया खुप येत आहे यांची वाईट दशा बघून मन आमचे तुटते आहे वन्यजीव यांचे जिवन अनमोल आहे सर्वांचे अस्तित्व आपल्याला टिकवायचे आहे वनातील सर्व जिवमात्रावरआम्हाला दया दाखवायची आहे वन्यजीव हे अमूल्य धरोधर आहे यांची रक्षा करणे आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी आपल्याला वन्यजीवांचे रक्षण करणे आवश्यकच आहे थोड्या लालशेपोटी सुखासाठी आपल्याला आपले मनाला दुर पळवयाचे आहे या सृष्टीसौंदर्य विश्वाचे स्वर्ग समान आम्हाला परत मिळवायचे आहे....

त्यांचे जीवन आपल्या हाती आपले जीवन त्यांच्या हाती वन्यजीवन हे मानव जीवना इतकेच महत्वाचे आहे सर्वजण मिळून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायलाच हवे. पृथ्वीवर उपस्थित वन्यजीव वन्यप्राणी आणि वनस्पतींचे सुंदर विविध प्रकार साजरे करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिवस वन्य प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन व्हावे व पृथ्वीवरील त्यांच्यापासून मिळणार्‍या फायद्याविषयी जागरूकता वाढवते.

भारतात सुद्धा वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे नामशेष होत चाललेल्या वन्य पशू पक्ष्यासोबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे वन्यजीवानी मानवी प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहे आजच्या कोरोना काळात आपल्याला आपले जीवन तर वाचवायचे आहेच त्या शिवाय सर्व वन्यजीव यांचेही जीवन अस्थित्व वाचवायचे आहे.

वन संपदेमुळे सर्व प्राणी वन्यजीव यांच्या साठी आवश्यक असलेला ऑक्सिजन मुबलक प्राणी आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी मदत होते त्यामुळे जंगलातील सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे वन्यजीव प्राण्यांच्या रक्षणासाठी पोषक वातावरण तयार करून त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश आहे सध्या मोठमोठ्या वनक्षेत्रामध्ये वन्य जीव वन्य प्राणी यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे त्यामुळे त्यांच्या संवर्धन साठी सर्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहेच...

चला तर मग आजच्या या कठीण कोरोना काळात वन्यजीव यांचे जिवन अस्तित्व वाचवूया. वन्यजीव यांचे करुया कल्याण तेव्हाच सर्व मानव जीवन होईल महान... वन्यजीव जैव विविधता यांचे सन्मान करा तेव्हाच मानवता वर अभिमान करा...

(लेखक हे जळगाव येथील भगीरथ इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक आहेत)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com