पृथ्वी दिनी वसुंधरेची जोपासना करूया आणि अध्यात्मिक रूपे विकसित होऊया

jalgaon-digital
2 Min Read

‘पृथ्वी दिवस’ हा आपल्या सर्वांकरिता पृथ्वीच्या प्रति आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण की, ही पृथ्वी आपल्याला कित्येक प्रकारची प्राकृतिक संसाधनं उपलब्ध करून देते. ही सर्व संसाधनं केवळ आपल्या करिताच नव्हे तर, आपल्या पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच आपण सर्वांनी या संसाधनांचा उपयोग फार काळजीपूर्वक केला पाहिजे.

या संसाधनांचा सदुपयोग करण्यासाठी आणि धरणी मातेला सन्मान देण्याकरिता आपणास अहिंसेचा मार्ग स्वीकारावा लागेल. ज्यामध्ये आपल्या पृथ्वीवरील राहणाऱ्या सर्व जीवांचा आणि प्राकृतिक संसाधनांचा आपण प्रेमपूर्वक वापर केला पाहिजे. यामध्ये मानवापासून तर सर्व जनावरांपर्यंत वनस्पती तसेच झाडेझुडपे सम्मिलीत आहेत. केवळ असाच विचार केल्याने आपल्याला प्रसन्नता वाटते, या विशाल अंतरिक्षामध्ये पृथ्वी या ग्रहाला फार सुंदर रत्नाप्रमाणे बनविले आहे, ज्यामध्ये आपण सर्व एका परिवारातील सदस्यां प्रमाणे आहोत. म्हणून आपल्याला असे कार्य केले पाहिजे ज्यामध्ये आपण एकमेकांना परस्पर सहाय्य करून प्रेमाने आणि शांतीपूर्ण जीवन जगू शकू.

या भूतलावर आपण रहात असतांना स्वस्थपणे आपले जीवन यापन करावे, जेणेकरून आपला परिवार आणि संपूर्ण विश्वभरात वर्तमान काळात पुढे येणाऱ्या भविष्यात सुद्धा ही संसाधनं भरपूर प्रमाणात उपलब्ध राहतील.

याकरिता आपण या भूतलाचे संवर्धन करीत असताना शारीरिक, मानसिक आणि आत्मिकरित्या विकसित झाले पाहिजे. ज्याकरिता आपल्याला शाकाहारी भोजन पद्धती आपल्या जीवनात आणावी लागेल आणि त्याच बरोबर आपल्या आत्मिक उन्नतीकरिता जीवनामध्ये सदगुणांना धारण केले पाहिजे. ज्यामध्ये आपण दुसऱ्याची सेवा करून ध्यान-अभ्यासाद्वारे प्रभू सत्तेशी जोडले जाऊन, अध्यात्मिक रित्या विकसित होऊ शकतो.

दुसऱ्यांची सेवा करणे आणि मिळून-मिसळून राहणे, हे आध्यात्मिकतेचे एक अंग आहे. इतरांबरोबर मिळून-मिसळून राहून, या पृथ्वीचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, कारण या सृष्टीतील कणाकणांमध्ये परमात्मा विद्यमान आहे.

चला तर, अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होत असतांना आपण या पृथ्वीवरील झाडे-झुडपे ,जनावरं आणि मानवांची काळजी करीत, आपण ‘पृथ्वी दिवस’ साजरा करूया आणि पृथ्वी कडून प्राप्त झालेल्या बहुमूल्य बक्षिसांचा सर्वोत्तम उपयोग करूया !

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *