
- अरुणा सरनाईक
लौकिक अर्थान पाहू जाता मीरा वरवर साधी सरळ स्त्री वाटते. कृष्णवेडानं भारावलेली आहे. सारं जीवन कृष्णार्पण करणारी वाटते. मात्र मीरा Meera समजणं ङ्गार कठीण आहे. ती तर्क नाही, ज्ञान नाही, समजून घेणारा अभ्यासणारा ग्रंथ नाही... कविता नाही... काव्य नाही... वेद नाही... पुराण नाही.... ती आहे एका अत्यंत सुंदर पण दर्दभरी प्रितीची, प्रेमाची आर्त अनुभती. ती शब्दातित आहे. असंही वाटतं जणू परमात्म्याच्या अपार भक्तीचं त्याच्याच भक्तीसाठी भक्तीनं धारणं केलेलं स्त्रीरूप आहे.! कृष्णभक्तीच्या अपार आकर्षणानं घेतलेला तो स्त्रीजन्म आहे. ती भगवान कृष्णाचा श्वासंप्रश्वास आहे. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर ती म्हणते, म्हारो जनम-मरन के साथी| थाने नहिं बिसरू दिन-राती|
एवढ्यातच ओशोंचे ‘मीरा की मधुशाला’ पुस्तकं वाचण्यात आलं. मीरा Meera नव्यानं कळली! मनात विचाराचं मोहोळ गजबजून गेलं! भक्तीचं, समर्पणाचं दुसरं नावं मीरा! द्वेष, मत्सर जेलसी इर्शा, नसलेली सुंदर आरसपानी नितळ मीरा! राधेला श्यामा म्हणणारी मीरा! जी श्यामरंगात रंगून गेलेली आहे. जिला श्यामाशिवाय अस्तित्वच दुसरं नाही ती राधा! मीरा आपल्या भजनांमध्ये राधेला श्यामा याच नावाने संबोधते. निव्वळ समर्पण भाव म्हणजे मीरा. एक तरल निर्मळ आतबाहेर श्यामरंगात नटलेली जणू आकाशातील वीजेची रेघ म्हणजे मीरा! कृष्णाची मीरा!
लौकिक अर्थान पाहू जाता मीरा वरवर साधी सरळ स्त्री वाटते. कृष्णवेडानं भारावलेली आहे. सारं जीवन कृष्णार्पण करणारी वाटते. मात्र मीरा समजणं ङ्गार कठीण आहे. ती तर्क नाही, ज्ञान नाही, समजून घेणारा अभ्यासणारा ग्रंथ नाही... कविता नाही... काव्य नाही... वेद नाही... पुराण नाही.... ती आहे एका अत्यंत सुंदर पण दर्दभरी प्रितीची, प्रेमाची आर्त अनुभती. ती शब्दातित आहे. असंही वाटतं जणू परमात्म्याच्या अपार भक्तीचं त्याच्याच भक्तीसाठी भक्तीनं धारणं केलेलं स्त्रीरूप आहे.! तिचा श्वास प्रश्वास सारं काही भगवान कृष्णाला Lord Krishna अर्पण आहे. जणू तो, वाहता असणारा एक भक्तीप्रवाह आहे जो प्रत्यक्ष परमेश्वराच्या हृदयातून वाहत परत त्याच्यापाशीच मिळणारा. मधला प्रवाह, ङ्गक्त वाहता राहण्यामागचे निमित्त आहे. हा मधला प्रवाह म्हणजे मीरा Meera! किंवा कृष्णापर्यंत पोचण्यासाठी आपण मीरा Meera या भावनेचा भक्तीच्या साकवासारखा म्हणजे पुलासारख उपयोग करू शकतो.
मुळातचं स्त्री भावनाशील असते. कृष्णाचे पुरुषभक्त श्रेष्ठच आहेत. पण मीरा म्हणजे अंतर्बाह्य भक्ती. अशी भक्ती Devotion जी स्वतःला स्वतःचा विसर पाडून परमात्म्याजवळ पोहोचू इच्छिते. तिच्या सगळ्या जीवनाचं सार्थक ङ्गक्त कृष्ण आहे. तो जसा आहे तसा तिला तो प्रिय आहे. अगदी राधेसकट! कारण त्याच्याशिवाय ती अस्तित्वहीन आहे. त्याला ती आपला जन्मोजन्मीचा साथीदार मानते. तिच्या मते तो तिच्यापसून विलग नाही. जो तिच्या जन्मापूर्वी तिच्यासोबत होता... जो मृत्यंनंतर दूर जाणार नाही असा! त्याचे तिला कधीच विस्मरण होता नाही. कारण विस्मरण होण्यासाठी स्मरणातून ती व्यक्ती जायला हवी. कृष्ण तिचा प्राण आहे. श्वास आहे. कृष्ण म्हणजे ती आणि ती म्हणजे कृष्ण. हे असं घट्ट समीकरण आहे. हे मीरेचे तत्वज्ञान माहिती असलं तरी नव्यानं उलगडलं.
तिचा साथीदार जन्मोजन्मीचा सखा शाश्वत जोडीदार त्याला ती भगवान म्हणते. म्हणूनच मग राणाजीकडून विषाचा पेला ती सहज पिवून जाते. कारण देहाचं नश्वरत्व तिला चांगले ठावूक आहे. जो आज सोबत आहे, तो कालही होता, उ़़द्याही आहेच. मग ओझं कशाचं बाळगायचं. ङ्गक्त शरीररूपी वस्त्र बदलणार आहे. इथेही पुन्हा कृष्णाचचं तत्वज्ञान ! ‘वासासि जिर्णानि’ म्हणत ती विषाचा पेला सहजी पिवून टाकते. कृष्णासारख्या श्वावत साथीदारामुळे मीरा अश्वावत साथी, सहोदर जे ङ्गक्त जन्मामुळे तिच्याशी जोडले गेले आहेत जे तिच्या मृत्युनंतर तिच्या सोबत राहणार नाहीत त्यानंा दूर सारते. त्यांची साथसोबत सोडताना तिला दुःख होत नाही. यात तिचे आप्त होते, रक्ताचे नातेसंबंध होते, आई वडील भाऊ होते. मैत्रिणी- सख्या होत्या, सासरचं गणगोत होतं; पण मीरानं यातून स्वतःला मुक्त करवलं.
ओशो अशा लौकिक नातेसंबंधाला ङ्गार छान नांव देतात. ते म्हणतात कागदी होड्यांचे संबंध! खोलवर विचार केला तर खरंच आहे. असे कागदी संबंध असतात म्हणूनच त्याला कायदेशीर नाती मानतो. ती तुटतातही लवकर. एका सहीनं संबंध जुळतात आणि एकाच सहीनं ती तुटतात देखील. आजच्या घडीला कागदी होड्यांचे संबंध ही संकल्पना शंभर टक्के सत्यात उतरलेली आहे. पावसाळ्यात प्रत्येकाने एकदा तरी पाण्यात कागदी होड्या सोडलेल्या आहेत. जी होडी स्वतःच पैलतीरावर पोचू शकत नाही, कोणाला पल्याड करू शकत नाही ती होडी काय कामाची? तशीच नाती जी मृत्युनंतर बरोबर येत नाही ती काय कामाची? मग अशा नात्यांचं ओझं का वाहायचं आणि तुटली तर दुःख तरी का करायचं? मीरानं हे तत्वज्ञान किती आधी जाणलं, अंगी बाणलं आणि आचरणात आणलं! तिचा कृष्णाशिवाय जगविस्तार नव्हता. आत बाहेर ङ्गक्त कृष्ण कृष्ण! अशी भावना होती म्हणूनच मीरा अजरामर ठरली! तिच्या भावना, तिची पदं अविस्मरणिय ठरली.
वेद जसे अपौरषेय आहेत, स्वयमेव आहेत तशीच मीरेची पदं भजनं आहेत ती तिने कुठे बसून नाही लिहीली. ती उस्ङ्गूर्त आहेत. सहज उमटलेली आहेत. त्यांचे प्रवचन किंवा किर्तनं नाही झालं. ती पद तिचे सहजोद्गार आहेत. मनाच्या मस्तीत, थिरकणारे... या पैंजणातून आणि वीणेच्या झंकारण्यातून आपोआप ती उमललेली आहेत. त्यात अश्रू आहेत, वेदना आहेत, मिठा मिठा दर्द आहे. नाही आहे तो शिळेपणा आणि नाही ती कृत्रिमता! सच्चेपणा आहे. कृष्णभक्तीची अपार ओढ! द्वेष नाही राग नाही. आहे ती ङ्गक्त करूणा! मी हात जोडते, दिनरात तुला स्मरते, ङ्गक्त एकदा तरी तु माझे स्मरण कर ना रे! तुझ्या मला स्मरण करण्यानं माझी ही भावयात्रा सङ्गल होईल. कृष्णाला ती श्याम म्हणते आणि कृष्णासोबत राधेला ती स्मरते. तिला ती श्यामा म्हणते. कारण राधा कृष्णात समर्पित आहे. त्यांचं अद्वैत तिला मान्य आहे. तिच्या मते, राधा कृष्ण आणि ती एकचं आहेत !
मीरा हसरी आहे. दुःखी नाही. तिचा विरह हसरा आहे. मुळात तो विरह नाहीच मुळी. कृष्णाशी धरलेला रूसवा आहे. तिच्या पदांमध्ये ताजेपणा, आशावाद, आर्त आहे. वाट बघण्याची अनिवार ओढ आहे. ती देवाला हसत आळवते. त्याच्याशी बोलते. प्रसंगी रूसते. हा मधुराभक्तीचा प्रकार आहे. तिच्या पदात नृत्य आहे. झोपाळ्याला एक झुला द्यावा तसा आनंदाचा झुला मीरा कृष्णाला देते. तिच्या सोबत झुल्यावर कृष्ण असतो. मीरा अंतर्बाह्य उत्साही आहे. उन्मादी आहे. बाह्य जगाचे विस्मरण झालेली आहे. तो तिच्याशी बोलतो खेळतो, तिची छेड काढतो. हे आपल्याला तिच्या पदांवरून जाणवतं. कृष्णभक्तीच्या अपार आकर्षणानं घेतलेला तो स्त्रीजन्म आहे. ती भगवान कृष्णाचा श्वासंप्रश्वास आहे. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर ती म्हणते, म्हारो जनम-मरन के साथी| थाने नहिं बिसरू दिन-राती|